डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने बेदाणाचे दर्जेदार, अधिक उत्पादन

श्री. संदीप शिवपुत्र कोरे,
मु. पो. कवठेमहांकाळ, जि. सांगली.
फोन : २२२२१०


द्राक्ष - उत्पादन ३१०० पेटी, ३४५० किलो बेदाणा

द्राक्ष - तास ए गणेश

मी माझ्या तास ए गणेश प्लॉटवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वेळापत्रकानुसार दोन वर्षापासून वापरत आहे. ही तेक्नॉलॉजी वापरून मी माझ्या शेतीत आमूलाग्र बदल केला आहे. सुरुवातीस मी फक्त जर्मिनेटर वापरत होतो. पण ज्यावेळी तुमच्या प्रतिनिधींशी माझी भेट झाली, तेव्हापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी संपूर्ण टेक्नॉंलॉजी वापरली व मला अनके अनुभव, फायदे मिळाले.

माझी बाग एकसारखी फुटण्यापासून ते माल काढण्यापर्यंत अनेक समस्या ह्या टेक्नॉंलॉजीने कमी करून विक्रमी उत्पन्न घेऊ शकलो. बाग एकसारखी फुटली. काडी विक्रमी उत्पन्न घेऊ शकलो. बाग एकसारखी फुटली. काडी जोमदार निघून घड कुचीदार मोठे बाहेर आले. पाने मोठी, जाड व तेलकट निघाल्याने बाग दूरवरून तेल मारल्यासारखी हिसत होती. पानावर डाऊनी, भुरी यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव अतिशय नगण्य स्वरूपात झाला. करपा आलाच नाही. फुलोर्‍यात फुलगळ, कुजवा झाला नाही. सनबर्न, क्रेकिंग, ममीफिकेशन अतिशय कमी झाले. ही टेक्नॉंलॉजी वापरल्याने मला इतर औषधे फार कमी लागली. या टेक्नॉंलॉजीवर ३००० रू. खर्च करून इतर रासायनिक औषधांचा खर्च कमी झाला. कोणतेही टॉंनिक वापरले नाही. पाने माल काढणीपर्यंत हिरवी राहून काडी पुर्णपणे पिकली. मला मागील वर्षी ३३०० पेटीत ३७०० किलो बेदाण व यावर्षी ३१०० पेटीत ३४५० किलो बेदाणा मिळाला. मी ही टेक्नॉलॉजी वापरत नव्हतो तेव्हा ३२०० पेटीपासून ३००० किलो बेदाणा उत्पादन मिळत होते. सरासरी ही टेक्नॉलॉजी वापरल्याने प्रति ४ किलो पेटीपासून २५० ते ३०० ग्रॅम बेदाणा जादा मिळाला.