दरवर्षी नर्सरीची १ लाख रोपे
श्री. दिलीप जगन्नाथ गुजर, मु. पो. खर्दे, ता. शिरूर कासार, जि. बीड, फोन नं. (०२४४४) २८८२७९
गेली ४ वर्षापासून पपई, बांबू, लिंबू, रामफळ, सिताफळ, बदाम, शेवगा, गुलाब आणि गार्डनची
रोपे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने तयार करत आहे.
सुरुवातीला जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करतो. त्यामुळे रोपांची संख्या जास्त मिळते.
रोपांवर १५ -१५ दिवसांनी सप्तामृत औषधांची फवारणी करत असतो. रोपे दीड महिन्यात
७ - ८ इंच उचीची होतात. नंतर त्यांची विक्री करतो. शेवगा, पपईची १ महिन्यातच रोपे तयार
होतात.
पपईचे ८ ते १० रू. ला १ रोप, बदाम १० रू., बांबू ५ रू., गुलाब १० रू., याप्रमाणे विक्री
करतो. नर्सरीमध्ये एकावेळी १ लाख रोपे तयार होतात.
रोपांवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या केल्याने मर रोग होत नाही, बुरशी येत नाही,
खराब वातावरणातही रोपे टवटवीत तयार होतात. त्यामुळे गिऱ्हाईकांची मागणी वाढत आहे.
आता माझी नर्सरी पाहून परिसरातील नर्सरीवाले (सागर नर्सरी, एरंडोल, ग्रिनहाऊस) हे
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे वापरू लागले आहेत. त्यांनीही आम्हाला रिझल्ट चांगले
मिळत असल्याने कळविले.
रोपे तयार करताना पिशवीत गाळाची माती ५० %, शेणखत २० %, काळी माती २० %, तांबडी माती
१७ ते १८% आणि सुपर फॉस्फेट २ ते ३% यांचे मिश्रण तयार करून पिशव्या भरतो. त्यामध्ये
जर्मिनेटची बीजप्रक्रिया करूनच बी लावतो. अशा पद्धतीने हा व्यवसाय यशस्वीरित्या चालू
आहे.
Related New Articles
more...