डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी 'विक्रम चिंच' हा संशोधीत वाण दुष्काळी भागात वरदान ठरेल एक आशा

ज्याप्रमाणे थायलंड चिंच ही अधिक चविष्ट, गर मांसल असतो त्यापेक्षाही जास्त या चिंचेत आहे. ही चिंच आंबट गोड न म्हणता गोड आंबट अशी म्हणावी लागेल. त्या गराला एक वेगळा स्वाद (Aroma) असून याच्या गरात चोथा राहत नाही आणि अनेक प्रकारात जसे सांबार, भेळीला वापरले जाणारे चिंचेचे पाणी या प्रकारात या चिंचेचा वापर उत्तम व उपयुक्त ठरेल. कारण याला गोड चव, चिंचेच्या गरासारखा गर्द रंग आहे. चिंच साधारण ३ पेरापासून ५ ते ६ पेरापर्यंत येते. ५ - ६ व्या वर्षात चिंच येऊ लागतात. पहिल्यांदा थोड्या कमी येतात, मात्र ७ व्या वर्षापासून उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते. याला वाढण्यासाठी त्याची लागवड १५ x १५ फुटावर करावी. वाढीच्या काळात कल्पतरू २५० ते ५०० ग्रॅम वर्षातून २ वेळा द्यावे व सप्तामृत फवारावे. याला जुलै व ऑगस्टमध्ये फुले लागतात व चिंच शिमगा - होळीपर्यंत पक्व होतात. काढणी शिमगा ते गुढीपाडवा या काळात पुर्ण होते. चिंच पुर्ण सुकल्यावर बांबूच्या दांड्याने टरफले काढून सहज वेगळी करता येते. ही चिंच वाळल्यानंतर त्याचा गर व बी वेगळे करता येते. चिंचेचा आकडा हा आकर्षक, गोड, मोठा व गराचे प्रमाण अधिक असते. बी हे मोठे साधारण चौकोनी असते. याच्या गराला मोठी मागणी आहे. तेव्हा दुष्काळी भागात एक आशेचा किरण निर्माण होईल. परंतु याचे प्रयोग विविध हवामानाच्या भागात व जमिनीत करावेत म्हणजे अधिक भाष्य करता येईल. याला 'विक्रम चिंच' असे नाव देण्यात आले आहे. याचे उत्पन्न चालू होईपर्यंत यामध्ये 'सिद्धीविनायक' शेवग्याचे आंतरपीक घेऊन त्याचे उत्पादन घेता येईल. ही चिंच २५ ते ३० वर्षापर्यंत उत्पन्न देऊ शकेल. याचे उपपदार्थ हवाबंद डब्यात भरून निर्यात करता येतील.

Related New Articles
more...