आले न लागता हाताच्या पंजाएवढे झाले

श्री. बागुल सिताराम महादु, मु. पो. बोरवठ, ता. पेठ, जि. नाशिक


७ जून २००८ रुजी वीस गुंठे क्षेत्रावर आले पिकाची लागण केली होती. बेणे प्रक्रियेसाठी जर्मिनेटर एक लिटर + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + १०० लि. पाणी या प्रमाणात मिश्रण तयार करून यामध्ये बेणे भिजवून लागण केली.

बेणेप्रक्रियेमुळे बेणे बावीस दिवसात १००% उगवले. इतर वेळेस चाळीस दिवस लागतात. हा सुरूवातीचा चांगला अनुभव आला. शिवाय रोपांची वाढ जोमदार झाली. उगवणीनंतर पंधरा दिवसांनी जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर ४०० मिली + क्रॉंपशाईनर ४०० मिली + १०० लि. पाणी या प्रमाणात फवारणी केल्यामुळे फुटावा होऊन रोपांची वाढ निरोगी व जोमदार होऊन प्लॉटवर काळोखी आली. उगवणीनंतर ३५ दिवसांनी आळवणी दिली.

याकरिता जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर ४०० मिली + १०० लि. पाणी या प्रमाणात द्रावण तयार करून ओलीवर हात पंपाने (नोझल काढून) आळवणी बुंध्यात ओतली. त्यामुळे पांढरी मुळीची वाढ चांगली होऊन एका रोपापासून कमीत कमी १० ते जास्तीत जास्त १५ फुटवे एकाच वेळी एकसारखे मिळाले.

यानंतर वेळापत्रकाप्रमाणे सप्तामृताच्या पुढील फवारण्या केल्या असता प्लॉटवर शेवटपर्यंत काळोखी टिकून होती, शिवाय रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. आले लागण्याचा जो प्रादुर्भाव एरवी होतो. तो सप्तामृतामुळे अजिबात झाला नाही. हे केवळ डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने शक्य झाले. सध्या आल्याच्या फण्या हाताच्या पंजासारख्या झालेल्या आहेत.