सरांच्या तंत्रज्ञानाने आले लागवड
श्री. कालिदास महादु शेडगे, मु. पो. म्हाळुंगे (पाडळे) ता. मुळशी , जि. पुणे.
फोने नं. (०२०) २७२९१७११
गेली दोन वर्षापासून पुर्ण सेंद्रिय पद्धती शेती करत आहे. आता १२ गुंठे आले लागवड करायची
आहे. त्यासाठी मी श्री. राजू मारुती वाधमारे, सातारा यांच्याकडे बेण्यासाठी गेलो असता
त्यांनी मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती दिली. ते आपले पुर्ण तंत्रज्ञान वापरून
प्रतिकूल परिस्थितीतही आल्याचे दर्जेदार उत्पादन घेतात. त्यांच्या सांगण्यावरून मला
आपल्या टेक्नॉंलॉजीने आल्याची लागवड करायची आहे. आले लागवडीसंबंधीत कृषी विज्ञानचे
अंक पाहिले. त्यानुसार वापर करणार आहे. आज रोजी लागवडीसाठी जर्मिनेटर १ लि. आणि प्रोटेक्टंट
१०० ग्रॅम घेऊन जात आहे. बीजप्रक्रियानंतरच्याही फवारण्या पुस्तकात दिल्याप्रमाणे
घेणार आहे.