द्राक्षाचे आरोग्यविषयी महत्त्व

श्री. केशव बाजीराव मोरे (पिंगळ) ,
मु. पो. अवनखेड, ता. दिंडोरी, जि. नाशिक.
फोने :(०२५५७) २२१४५७, मो. ९९२२५५५९९९


माझी १३ वर्षापुर्वींची जुनी द्राक्षबाग आहे. माझ्या या बातेत मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी गेली २ वर्षापासून वापरत आहे. ह्या टेक्नॉंलॉजीने पहिल्याच वर्षी मला माझ्या बेदाणा प्लॉटमध्ये ३६०० झाडात १७ टन बेदाणा उत्पन्न निघाले. यापुर्वी मला ह्या प्लॉटमध्ये जास्तीती जास्त ११ टन उत्पन्न मिळत असे. ह्या टेक्नॉंलॉजीवर मी १०,००० रू. खर्च करून ६ टन ज्यादा बेदाणा उत्पन्न मिळविले. त्यावेळी ६५ रुक किलो दर मिळाला. मला ही टेक्नॉंलॉजी वापरल्याने अनेक चांगले अनुभव आले. वाढ एकसारखी, लवकर होते. काडी मोठी, जाड व शेंडा कायम चालतो. पाने मोठी, जाड व तेलकट तयार होतात. रोगाचा कोणताही प्रादुर्भाव होत नाही. फुलगळ, कुजवा, ममीफिकेशन, सुकवा होत नाही. पाने शेवटपर्यंत हिरवीगार राहतात व काडी पुर्णपणे पिकते. साखर जास्त तयार होऊन बेदाणा उतारा जादा मिळतो. मला माझ्या ३६०० झाडात १४५०० पेटी माल निघाला व १७ टन बेदाणा उत्पन्न निघाले. सरासरी १२०० ग्रॅम प्रति ४ किलो द्राक्षापासून बेदाणा तयार झाला. बेदाण्यात फोलफट फक्त २ ते ३ % निघाली. पुर्वी १० - १५ % पर्यंत फोलफाटे निघत होती.