डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने आपण भारतात 'प्रति इस्राईल' निर्माण केले - ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ जेपधा गेटस
श्री. दिलीप देशमुख, श्री. प्रल्हाद देशमुख,
मु.पो. पहुर, ता. जामनेर, जि. जळगाव.
मोबा. ९४२३७७३५१० /
९४२१५२३०७०
गेले १८ ते २० वर्षे आम्ही केळी, कापूस, गहू, हरभरा अशी विविध प्रकारची पिके आमच्या
ग्रुपमध्ये व पंचक्रोशीतील अनेक शेतकरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा माहितीपत्रकाप्रमाणे
योग्य पद्धतीने सतत वापर करीत आहोत. त्यामुळे विक्रमी दर्जेदार उत्पादन मिळत आहे.
आमच्या केळीची लागवड ५' x ५' वर असून आम्ही पाण्याचा वापर अतिशय काटेकोरपणे करतो. ३ डिसेंबर २०११ रोजी ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ जेपधा गेटस, मार्केट देव्हलपमेंट मॅनेजर युपूल गुणवर्धना व त्यांच्या सोबतच्या शिष्टमंडळाने आमच्या प्लॉटला भेट दिली, तेव्हा त्यांनी सांगितले, आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये तसेच इस्राईलमध्ये ७' x ७' वर लागवड केलेली पाहिली त्या केळीला तुमच्यापेक्षा जास्त पाणी वापरले जाते, तेव्हा कुठे अशी केळी तयार होते. तसेच आमच्याकडील तापमान २३ डी. ते ३२ डी. अंश सेल्सिअस असल्याने केळीस अनुकूल असते. मात्र तुम्ही एवढ्या कमी अंतरावर ही केली लावून तसेच अत्यंत कमी पाण्यावर ४० ते ४२ डी. सेल्सिअस तापमानात एवढ्या दर्जेदार केळीचे विक्रमी उत्पादन घेतले, हे फारच कौतुकास्पद आहे. याचे रसस्य काय, ते आम्हास सांगावे. तेव्हा आम्ही त्यांना सांगितले की, आमच्या पहुर गावचे डॉ. बावसकर सर हे मोठे शास्त्रज्ञ आहेत, ते पुणे येथून कार्य करतात. त्यांचे काम हे डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या इतकेच मोठे आहे. यावर ऑस्ट्रेलियचे शास्त्रज्ञ व त्यांचे सहकारी म्हटले की, " आपण इथे 'प्रति इस्राईलच' उभे केले आहे. त्यामुळे तुम्हाला इस्राईलला जाण्याची गरज नाही." हे एकून आमचा ऊर स्वाभिमानाने दाटून आला. आमच्याकडे रोज ५ - २५ शेतकरी विविध देशातील, राज्यातील भेट देत असतात व त्यांना आम्ही मार्गदर्शन करीत असतो. आमच्या पिकांचे प्लॉट पाहून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसते आणि त्यांना नवीन गोष्टी करण्याची ऊर्जा देते. आतापर्यंत आमच्या प्लॉटवर इराण, इराक, ऑस्ट्रेलिया, इस्राईल, जर्मनी, अमेरिका, टान्झानिया येथील मंत्री, शास्त्रज्ञांनी भेट दिली आहे आणि त्यांनी आमच्या कामाचे कौतुक केले. याचे सर्व श्रेय आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीला आहे असे सांगतो, तेव्हा सर्व अवाक होतात. (संदर्भ: पान नं. ८१ वरील फोटो)
दरवर्षी आमची ३० ते ३२ हजार केळीची लागवड असते. ५' x ५' वर एकरी साधारण १७०० झाडे असतात. ५ फुटाच्या ओळीमध्ये दोन्ही बाजूने दिड -दिड फूट माती ओडून तीन फूट रुंदीचा मातीचा उंच बोध तयार करू घेतो आणि त्यावर मधोमध प्रत्येक रोप लागवडीच्या ठिकाणी २०० ग्रॅम कल्पतरू खत देऊन तेथे केळीची एक टिचूभर (६ इंच) उंचीचे रोपे जर्मिनेटरच्या द्रावणात बुडवून लावतो व जर्मिनेटरचे ड्रेंचिंग (आळवणी) ही करतो. कमी उंचीची रोप लावण्याचे कारण म्हणजे या रोपांच्या मुळ्या जर्मिनेटरची प्रक्रिया केल्याने लगेच वाढीस लागून रोपे एरवी जी एक फूट उंचीची लावली जातात त्यापेक्षाही छोटी रोपे झपाट्याने वाढतात. मर होत नाही, असा आमचा अनुभव आहे. टिश्यू कल्चर आणि काही बेणे लागवडीची केली असते. केळीला लागवडीच्यावेळी हजारी कल्पतरू खताच्या ४ बॅगा आणि स्टेरामिल ५ - १० - ५ खताच्या ३ बॅगा असा डोस देतो. नंतर पुन्हा १।। ते २ महिन्याचा प्लॉट झाल्यानंतर वरीलप्रमाणेच डोस देतो आणि एकदा रासायनिक खताचा (सुपर फॉसफेटच्या ४ बॅगा, पोटॅशच्या २ बॅगा) असे तिन्ही डोस ४ महिन्यात पुर्ण करतो.
सप्तामृत औषधांच्या ४ ते ५ फवारण्या लागवडीपासून ते माल काढणीपर्यंत करतो या फवारण्यांमध्ये २ - ३ किटकनाशक व बुरशीनाशकांच्या फवारण्य घेतो. सप्तामृताच्या सुरूवातीपासून फवारण्य व कल्पतरू खताच्या वापरने झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्मात होऊन वाढ झपाट्याने होते. लागवडीपासून १० व्या महिन्यात घड काढणीस येतात. घड सरासरी ४५ ते ६० किलोपर्यंतचे आपल्या तंत्रज्ञानाने मिळतात. ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ ६० किलो वजनाचे घड पाहून अचंबीत झाले. डॉ. बावसकर तंत्रज्ञानाचा वापर आणि वरील पद्धतीने मातीचा बोध तयार केल्याने केळी चांगल्या पोसतात. घडामध्ये १० ते १३ फण्या असतात आणि एका फणीमध्ये ३० ते ३६ केळी असतात. त्यामुळे एकरी ३० ते ३२ टन उत्पादन मिळते.
दुसऱ्या पिकापासून (केळीच्या खोडव्यापासून) १८ व्या महिन्यात ३४ ते ३७ टन उपादान मिळते आणि २७ व्या महिन्यात तिसऱ्या पिकाचे एकरी २८ ते ३० टन उत्पादन मिळते.
मुनव्यांपासून (बेण्यापासून) लागवड केलेली केळी १२ ते १३ महिन्यात काढणीस येते. याचे घडाचे वजन २८ ते ३५ किलो असते. एका घडात ९ ते १० फण्या असतात आणि फणीमध्ये २४ ते २८ केली असतात. बेण्यापासून एकच पीक घेतो. तर एकरी २५ टनापर्यंत उत्पादन मिळते.
गेल्या महिन्यात बेंगलोरच्या हिंदू या प्रसिध्द वर्तमान पत्राचे प्रतिनिधी येऊन त्यांनी आमची मुलाखत घेऊन ती इंग्लिशमधून प्रसारित केली आणि त्यांनी सांगितले, "तुमचे काम अतिशय वाखाणण्याजोगे आहे. ते जगभरातील लोकांना दर्जेदार व सेंद्रिय उत्पादन घेण्यास प्ररणादायक ठरेल, याकरिता आम्ही आपली ही मुलाखत घेतली आहे." आमच्या दोघा भावांची स्टार माझा या दूरचित्रवाहिनीने गेल्या महिन्यात सविस्तर मुलाखत घेतली त्यावेळी दर्जेदार केळी उत्पादनाचे रहस्य डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने साकार केली असे सांगितले. तेव्हा स्टार माझाच्या असंख्य शेतकऱ्यांनी फेब्रुवारीत एकवेळा आणि २३ मार्च २०१२ मध्ये २ -३ वेळा हा कार्यक्रम प्रसारित झाल्यावर पाहिल्यानंतर आम्हाला राज्यातून अभिनंदनाचे अनेक फोन आले. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये (१० मार्च २०१२) आमची केली दिल्ली मार्केटला आम्ही पाठविली. ५०० झाडाच्या घडमध्ये १५ टनाची गाडी भरली. माल अतिशय दर्जेदार आणि आकर्षक होता. परंतु उत्तर भारतात व दिल्लीच्या भागामध्ये होळी व रंगपंचमीचा माहोल असल्याने जरी आम्हाला भाव कमी मिळाला असाल तरी तो ८२५ ते ८५५ रुपये / क्विंटल मिळाला. एरवी तो १०५० रुपये पर्यंत मिळाला असता.
आम्ही डॉ. बावसकर तंत्रज्ञानाने गहू असो, हरभरा, तूर, पपई, केली, कापूस असो सर्वच पिकांपासून विक्रमी दर्जेदार उत्पादन घेण्यात यशस्वी होतो. आम्ही २० वर्षापासून आमच्या शेतातीलच उत्पादीत झालेला २१८९ गहू बियाणे म्हणून वापरतो. २० वर्षापासून गव्हाचे बी आम्ही विकत घेतले नाही. तरी देखील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरून या गव्हाचे उत्पादन बाजारातील बियाण्यापेक्षा अधिक व दर्जेदार प्रतिचे मिळत आहे. वजनदार, लांब ओंबीचा गहू मिळतो. या गव्हाचा कोंडा निघत नाही. चपातीला तेल, जळण (इंधन) कमी लागून ती मऊ व अधिक रुचकर लागते.