परवल लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


परवल ही तोंडल्यासारखी दिसणारी एक भाजी आहे. हे पीक बहुवर्षीय भाजीपाला पीक असून बिहार, ओरिसा, बंगाल, आसाम आणि गुजरात राज्यात या पिकाची लागवड केली जाते. महाराष्ट्रात या पिकाची लागवड गुजरात राज्याच्या सिमेलगत भागात काही प्रमाणात दिसून येते. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील हवामान या पिकाच्या लागवडीकरिता चांगले आहे. मुंबईच्या बाजारपेठेत या भाजीला चांगली मागणी असल्याने परवलच्या उत्पादनास भरपूर आहे.

परवलच्या फळांमध्ये कार्बोहायड्रेटस, फॅटस, जीवनसत्त्व 'अ' आणि 'ब' तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह इत्यादी खनिजे मोठ्या प्रमाणावर असतात. परवलच्या फळांची भाजी पचनास सुलभ असते. परवलची भाजी पित्तनाशक समजली जाते.

परवल दोन प्रकारची असतात. एक गोड परवल व दुसरे कडू परवल. परवल,पाचक हृदयास हितकारक, उष्ण, रक्तदोष व त्रिदोषावर गुणकारी ठरते. पांडुरोगाच्या रुग्णांना ते आरोग्यदाय असते. परवालाची भाजी खाल्ल्याने पचनशक्ती वाढते. आजारी माणसांसाठी परवल गुणकारी असते. हे पौष्टिक व बलवर्धक असते.

त्याचारोगावर परवलाचे सेवन फायदेशीर असते. त्वचारोगावर परवलासह गुळवेल द्यावे. तसेच त्याच्या पानांच्या रसाने शरीराला मालिश करता येते.

गळवांचा त्रास होत असल्यास कडू परवल आणि कडुनिंबाचा काढा करून त्याने गळवे धुतल्यास जंतुनाशक काढ्यामुळे गळवे स्वच्छ होतात.

डोक्याच्या त्वचेला कडू परवलाचा रस चोळल्याने डोक्याच्य त्वचेचे विकार दूर होतात.

हवामान आणि जमीन : परवल या पिकास उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. कडाक्याच्या थंडीत तपमाना ५ डी. सें. पेक्षा कमी असल्यास परवलच्या वेलांची पाने गळतात आणि वेल सुप्तावस्थेत जातात. तापमान वाढल्यावर वेलांना पाणी दिल्यास वेल पुन्हा वाढू लागतात.

या पिकास पाण्याचा उत्तम निचरा होणारी रेताड पोयट्याची किंवा मध्यम काळी जनीन मानवते. भारी काळ्या जमिनीत पाणी साठून राहत असल्याने अशा जमिनीत या पकाची वाढ चांगली होत नाही.

सुधारित जाती : परवलमध्ये फळांच्या आकारावरून गोल आणि लांबट असे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. व्यापारी तत्त्वावर लागवड करण्यासाठी परवलच्या खालील जाती विकसीट करण्यात आल्या आहेत.

१) एक. पी. १ : परवलच्या या जातीची फळे गोल आकाराची असून हिरव्या रंगाची असतात. फळांवर पांढरे पट्टे असतात. या जातीचे एके फळाचे सरासरी वजन २० ते ३० ग्रॅम इतके असते.

२) एक. पी. ३ : परवलच्या या जातींची फळे आकाराने मोठी आणि ६ ते ८ सें. मी. लांबीची असतात. फळांच्या सालीवर हिरव्या आणि पांढर्‍या रेषा असून गाभा पिवळसर पांढरा असतो. या जातीच्या एका फळाचे वजन सरासरी २५ ते ३० ग्रॅम भरते.

३) एक. पी. ४ : परवलच्या या जातीचे फळ ८ ते १० सें.मी. लांबीची असून फिक्कट हिरव्या रंगाचे असते. फळाचा गाभा पांढर्‍या रंगाचा असतो. एका फळाचे सरासरी वजन २० ते ३० ग्रॅम असते.

४) एक. पी ५ : परवलच्या या जातीचे फळ मध्यम आकाराचे असून ६ ते ८ सें.मी. लांबीची असते. फळाचा रंग फिक्कट हिरव्या रंगाचा असून त्यावर पांढर्‍या रेषा असतात. या जातीच्या एका फळाचे वजन २० ते २५ ग्रॅम असते.

भारतीय भाजीपाला पिके संशोधन संस्था, बाराणशी येथून परवलच्या खालील प्रगत वाणांचा विकास करण्यात आला आहे.

१) व्ही. आर. पी. १०१ : मऊ अधिक गराची, मध्यम आकाराची फळे, ५ -७ सें.मी. लांब, फळे दोन्हीकडे पातळ, धार नसलेली रंग हलका हिरवा, सरासरी उत्पन्न हेक्टरी २५ ते ३० टन.

२) व्ही. आर. पी. १०२: बियांचे प्रमाण खूपच कमी बिनधारेची मोठी फळे, फळांची लांबी ७ -८ सें.मी. सरासरी उत्पादन हेक्टरी २२ -२४ टन.

३) व्ही. आर. पी. १०३ : गोल आणि हिरव्या रंगाची फळे, धार असलेली, साठवण आणि लांबच्या बाजारपेठेत पाठविण्यास चांगली, उत्पादन सरासरी हेक्टरी सरासरी हेक्टरी १७ ते २० टन.

अभिवृद्धी : परवलची अभिवृद्धी बियांपासून अथवा फाटे कलम (कटिंग) वापरून करता येते. परवलच्या वेलांमध्ये फक्त मादी फुले येणारे व फक्त नर फुले येणारे असे वेलांचे दोन प्रकार असतात. परवलची बियांपासून अभिवृद्धी केल्यास असा वेल मादी फुलांचाच निपजेल याची खात्री नसते. म्हणूनच परवलची अभिवृद्धी फाटे कलमे (कटिंग) वापरून करतात. मात्र यासाठी मादी फुले येणार्‍या वेलीचीच कटिंग वापरणे आवश्यक असते.

परवलचे फाटे कलम निवडताना साधारणपाने एक वर्षाच्या अतिपक्क फांद्यापासून निवडावेत. फाटे कलमांची लांबी ४० ते ४५ सें.मी. असावी. फाटे कलमावरील सर्व पाने काढून टाकावीत. भरपूर प्रमाणात मुळ्या फुटण्यासाठी फाटे व कलमे ऑक्टोबर महिन्यात काढून १० लि. १०० मिली जर्मिनेटर + ५० ग्रॅम प्रोटेक्टंट या प्रमाणात द्रावण तयार करून त्यामध्ये ५ ते १० मिनिटे बुडवून पॅलीथीनच्या पिशवीत लावावीत.

यामुळे रोपांचे मरण्याचे प्रमाण कमी होते. रोपांना अधिक प्रमाणात मुळ्या फुटून १ महिन्यात रोपे कायम जागी लावण्यास तयार होतात. वेलांचा तूकडा उलटा लागणार नाही, याची काळजी घ्यावी.परागीकरण आणि चांगली फलधारणा होण्यासाठी शेतात १०% नर वेलांची लागवड करवी.

हंगाम आणि लागवड पद्धती : परवल हे पीक शेतात ३ ते ४ वर्षे राहत असल्यामुळे जमिनीची पुर्वमशागत चांगली करवी. जमीन उभी आडवी नांगरून नंतर २ ते ३ कुळवाच्या पाळ्य द्याव्यात. ढेकळे फोडून जमिन सपाट करावी. परवलची लागवड २ x २ मी. अंतरावर करावी. त्यासाठी १.५ x १.५ फुट आकाराचे खड्डे करवेत. लागवडीसाठी तयार केलेल्या शेणखत किंवा कंपोस्ट खत मातीत मिसळून खड्डे भरून घ्यावेत. तयार केलेल्या लागवड डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत करावी.

काही ठिकाणी ऑक्टोबर महिन्यात कटिंग्ज शेतात कायम जागी लावतात. अशी लागवड करताना दोन्ही टोके वर ठेवून कटिंग्ज जमिनीत पुरावीत. लागवड करताना तुकडे जर्मिनेटर आणि प्रोटेक्टंटच्या वरीलप्रमाणे द्रावणात बुडवून लावावीत. त्यामुळे पांढर्‍या मुळीची जारवा वाढून सर्व फाटे फुटून येतात. तसेच खोडकीड आणि इतर रोपापासून फाटे कलमांचे संरक्षण होते. साधारणपणे परवल पिकाच्या एक हेक्टर क्षेत्रावरील लागवडीसाठी मादी वेलांचे २२५० फाटे कलम आणि नर वेलांचे ५० फाटे कलम लागतात.

खते आणि पाणी व्यवस्थापन : परवलच्या पिकास दर हेक्टरी १५ ते २५ टन कुजलेले शेणखत, २०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे. तसेच नत्र (१०० किलो), स्फुरद (५० किलो ), पालाश (५० किलो ) याप्रमाणे खते द्यावयाची झाल्यास ती मिश्र खतांच्या स्वरूपात द्यावीत. नुसते नत्र देऊ नये. त्याने अनावश्यक वाढ होऊन रोग - किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. खते दोन हप्त्यात विभागून द्यावीत. अर्धी मात्रा जून महिन्यात आणि उरलेली मात्रा नोव्हेंबरमध्ये द्यावी. खरीप हंगामात ८ दिवसाच्या अंतरने पाणी द्यावे.

आंतरमशागत : परवल वेलाच्या आळ्यातील तण खुरपणी करून काढून टाकावे. वेलाच्या बुंध्यांजवळील जमीन हलवून वेलांना मातीची भर द्यावी. उन्हाळा सुरू होण्यापुर्वी म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये परवलच्या वेलांची छाटणी करवी. छाटणी करण्यापूर्वी एक महिना आधी पिकांना पाणी देणे बंद करावे. वेल छाटताना मांडवाच्या उंचीबरोबर छाटावेत. मांडावावर पसरलेले वेल खाली उतरवून घेऊन संपूर्ण बाग स्वच्छ करवी. छाटणीनंतर हलके पाणी द्यावे.

वेलींना वळण आणि आधार देणे : परवलच्या पिकासाठी मांडव उभारणे आवश्यक आहे. वेल वाढू लागताच बांबुच्या आधाराने वेल मांडवावर चढवावा. मांडवाचा आकार ६ x ६ मीटर ठेवावा आणि उंची २ मीटर मांडवावर टाकण्यासाठी नायलॉन दोरी अथवा तार किंवा उपलब्ध असल्यास बांबूची शिडी यांचा वापर करावा. परसबागेत परवलचे वेल कुंपणावर किंवा जमीनीवर सोडता येतात, परंतु मांडव केल्यास फळाची प्रत चांगली मिळते आणि उत्पादनात वाढ होते.

किडी : परवल पिकावर फळमाशी खवले कीड, पाने खाणारी अळी, पिठ्या ढेकूण आणि मावा या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो.

रोग: करपा, केवडा, भुरी हे प्रमुख रोग आढळून येतात. तेव्हा वरील किडी व रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच वेलांची जोमदार वाढ होऊन फुलकळी अधिक लागण्यासाठी व उत्पादन, दर्जात वाढ होण्यासाठी सप्तामृताच्या खालीलप्रमाणे फवारण्य कराव्यात.

प्रयोगात्मक फवारणी : वेलांच्या वाढीसाठी लागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी तर उत्पादन चालू झाल्यावर फेब्रुवारी ते ऑक्टोबरपर्यंत फवारण्य १५ ते २० दिवसांनी घ्याव्यात.

१) पहिली फवारणी :जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १०० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : जर्मिनेटर ३०० ते ४०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २५० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी :थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : ( ८० ते ९० दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ४०० मिली + २०० ते २५० लि. पाणी.

काढणी आणि उत्पादन : परवलच्या पिकास मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये फळे येण्यास सुरुवार होते आणि ऑक्टोबरपर्यंत फळे मिळतात. फळांची काढणी फळे कोवळी असताना आणि आतील बिया जून (अतिपक्क) होण्यापुर्वी करावी. फळांची काढणी दोन ते तीन दिवसांनी करावी. या पिकापासून दर हेक्टरी २० ते ३० टनापर्यंत उत्पादन मिळते. दुसर्‍या आणि तिसर्‍या वर्षी या उत्पादनात वाढ होते. मात्र तीन वर्षानंतर या पिकाच्या उत्पादनात घट होते. तेव्हा सुरूवातीपासून वरीलप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर नियमित केल्यास ५ वर्षापर्यंत चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येते. तसेच मालाची प्रत सुधारून उत्पादनात याहून अधिक प्रमाणात वाढ होते.