५० रू. किलो शेंदरी डाळींब, ६ एकरात ४२ टन

श्री. आण्णासाहेब दामोदर भोर,
मु. पो. वडगाव लांडगा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर,
मो.९४२२२२४१३३ (शेती - मिरापूर)



मी एअरफोसॅमधून १९९३ मध्ये निवृत्त झाल्यानंतर २००४ मध्ये मिरापूर येथे जमीन घेऊन त्यामध्ये शेंदरी डाळींबाची लागवड १२' x ८' वर केली. त्याला शेणखत व इतर रासायनिक खते वापारून किटकनाशके व बुरशीनाशकांच्या फवारण्या घेत असे. मध्यंतरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे 'कृषी विज्ञान' मासिक माझ्या वाचण्यात आले. त्यावरून मी डॉ.बावसकर तंत्रज्ञान डाळींबाला वापरायचे ठरविले. यासाठी कंपनीचे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी श्री. पंडीत अदाते (९३७०२७८९०७) यांच्याशी संपर्क साधून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊन औषधांचा वापर केला.

सहा एकर बागेचा चालू वर्षी मृग बहार धरला होता. फळांचे सेंटिंग झाल्यानंतर प्रतिनिधींची भेट झाल्याने तेथून पुढील मालाचे पोषण होण्यासाठी सल्ल्यानुसार थ्राईवर, क्रॉंपशाईनर, न्युट्राटोन या औषधांची एक फवारणी केली. त्याने मालाची फुगवण चांगली झाली. फळाला चकाली आली. तसेच एरवी जे ह्या अवस्थेत फळांवरती डाग पडतात ते अजिबात आले नाहीत. नंतर दुसरी फवारणी क्रॉंपशाईनर, राईपनर आणि न्युट्राटोनची केली. त्याने साल मऊ पडून फुगवण अधिक होऊन, गोडी व वजन वाढले. ३५० ग्रॅम ते ६०० ग्रॅमपर्यंत वजन भरत होते. सरासरी जास्तीत जास्त माल ५०० ग्रॅमचा होता.

मालाची विक्री मुंबई, जयपूर, दिल्ली या बाजारपेठेत केली. सरासरी बाजारभाव ५० रू. प्रति किलो याप्रमाणे मिळाला. एकूण ४२ टन उत्पादन मिघाले. हा दुसरा बहार आहे.

या अनुभवावरून आता तिसर्‍या बहाराला संपूर्ण डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरणार आहे.

वांगी १ वर्षापूर्वी लावलेली आहेत. ती अजून चालू आहेत. ऑगस्टच्या दरम्यान त्यावर सप्तामृताची एक फवारणी घेतली तर तोड्यात वाढ झाली. मालाचा दर्जा सुधारला. त्यामुळे तेथून पुढे सतत १५ ते २० दिवसांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या घेत आहे. नवीन निघालेली फुट वाढीस जोम येण्यासाठी सध्या कल्पतरू सेंद्रिय खत वापरण्याच्या विचारात आहे.