दोन महिन्यानंतरही फुलकळीने बाग बहरली

श्री. सिताराम कुर्‍हाडे,
मु. पो. कातरणी, ता. येवला, जि. नाशिक,
फोन (०२५५१) २५४४०५



२ वर्षाची आरक्ता, शेंदरी डाळींबाची १० एकर बाग असून त्यामधील ६ एकराची सप्टेंबर २००५ मध्ये छाटणी केली. मात्र सप्टेंबर महिन्यातील पावसामुळे डाळींबाचे शूटस वाढले. त्यामुळे तब्बल २ महिने झाडांवर फुलकळी अवस्था दिसत नव्हती. नाराज झालो. कारण हा बहार जातो असे वाटत होते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या प्रतिनिधींचे मार्गदर्शन घेतले. त्यानुसार जर्मिनेटर १ लि. आणि थ्राईवर १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. त्यानंतर २ आठवड्याने मालकडीस फुलकळी निघण्यास सुरुवात झाली. त्यानंतर लगेच दुसरी फवारणी वरील प्रमाणातच डिसेंबर २००५ मध्ये केली. या दोन फवारण्यावर डाळींब बाग फुलकळीने बहरली. तेव्हा आमचा उत्साह वाढला. मग १२ व्या दिवशी लगेच तिसरी फवारणी थ्राईवर १ लि. आणि क्रॉंपशाईनर १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. त्याने पाने निरोगी, तजेलदार असून फुलकळी सतेज होती.

नंतर ढगाळ वातावरणामुळे मावा, थ्रीप्सचे प्रमाण वाढले आणि फुलकळी गळण्यास सूरूवात झाली. त्यामुळे ताबडतोब डॉ.बावसकर सरांना फोन केला. त्यांनी डाळींब बागेस पाणी वाढविण्यास सांगून चौथी फवारणी थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅमची २०० लि. पाण्यातून करण्यास सांगितली. त्यानुसार लगेच फवारणी केली, तर प्रोटेक्टंटच्या वापराने मावा, थ्रीप्सचे प्रमाण कमी झाले. तसेच फुलकळी गळणे बंद झाली आणि गाठ सेटींग चांगली झाली. फळे मोठी झाली, तडकली नाही, फळांवर काळे डाग अथवा खरडा अजिबात नाही. झाडांवर ७० ते ८० फळे असून फुगवण समाधानकारक आहे.