डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे डाळींबास एकसारखी कळी, मधमाश्यांचे प्रमाण अधिक

श्री. अमित पवार,(मे. पवार अॅण्ड सन्स),
राजस्थान थिएटर समोर, मेन रोड, संगमनेर, जि. अहमदनगर.
मोबा. ९८५०१३३००६



श्री. बी. आर. वाघ, मु. पो. दोडी, ता. सिन्नर, जि. नाशिक यांची १॥ एकर भगवा डाळींबाची बाग आहे. मार्चमध्ये त्यांना कळी सेटिंग करायची होती. एकसारखी फुले येत नव्हती. यावर आम्ही त्यांना थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रोटेक्टंट, प्रिझम हे फवारण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी फवारणी केली. तर सर्व झाडांना एकसारखी फुले लागली. प्रोटेक्टंटमुळे मधमाश्यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे फळधारणा भरपूर झाली. त्याभागात बर्‍याच शेतकर्‍यांच्या प्लॉटला कळी लागली नाही. ज्यांच्या प्लॉटला कळी लागली ती एकसारखी लागली नाही. त्यांच्या बंधुंच्या बागेतील ४० डी. सेल्सिअस तपमानामुळे लागलेली कळी गळून गेली. त्यामुळे वर्ष वाया (खाली) जाण्याचा मार्गावर आहे. अशा परिस्थितीत बी. आर. वाघ यांच्या प्लॉटवर फळ सेटिंग १०० % चांगले झाले आहे.

श्री. राजेंद्र देशमुख, जवळकडलग, ता. संगमनेर हे डाळींब बागेस सुरूवातीपासून डॉ. बावसकर तंत्रज्ञान वापरतात. त्यामुळे त्यांचा प्लॉट गावात एक नंबरचा आहे. त्यांचे प्लॉट पाहून आता त्यांच्या गावातील शेतकरी आता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे घेण्यास आमच्याकडे येतात.