कमी पाण्यावर ९५० भगव्यापासून १८ टनाचे ९ लाख
श्री. पोपट मोतीराम आहिरे,
मु. पो. तळवाडे दिगर, ता. सटाणा, जि. नाशिक.
मोबा.
९४२०३६१५४५
माझी २॥ एकर भगवा डाळींबाची बाग आहे. यावर्षी कसमा पट्ट्यात पाऊस कमी पडल्यामुळे पाण्याची
तीव्र टंचाई भासू लागली. डाळींबाच्या बागेला व भाजीपाला पिकालाही पाणी पडत असे.
१३ ऑक्टोबर २०११ रोजी मी डाळींबाची छाटणी केली. छाटणी झाल्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सटाणा शाखेतील प्रतिनिधींशी भेट झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टेक्नॉंलॉजीचा वापर डाळींब बागेस करायला लागलो. डाळींबाची बाग ५ वर्षाची असून हा चौथा बहार आहे. १८ ऑक्टोबरला पानगळ केल्यानंतर म्हणजे १०० % पानगळ झाल्यानंतर मी २८ ऑक्टोबरला डाळींबाच्या बागेला पहिले पाणी दिले व ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली सप्तामृत औषधांचा व कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर केला. डाळींबाला पाणी दिल्यानंतर जर्मिनेटर १ लि. चा २०० लि. पाण्यातून स्प्रे केला. फवारणी झाल्यानंतर ५ ते ६ दिवसांनी जर्मिनेट र ड्रिपमधून सोडले. त्याचप्रमाणे १४ ते १५ दिवसांनी थ्राईवर, क्रॉंपशाईनरची फवारणी केली. त्याने पानांची साईज व भोवरी तयार झाली. त्यानंतर १८ ते २१ दिवसांनी थ्राईवर व प्रिझमची फवारणी केली. यामध्ये मावा, तुडतुडे, अळीच्या नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकाची फवारणी केली व सेंटिंग अवस्थेत न्युट्राटोन १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. अधून - मधून रासायनिक खते व औषधे वापरत होतो. कल्पतरू सेंद्रिय खत प्रत्येक झाडास १ किलो बहार धरतेवेळी दिले होते. नंतर कलर येण्यासाठी ० - ० - ५ ० व राईपनरची फवारणी केली. फुगवण होण्यासाठी न्युट्राटोनची फवारणी केली. एवढ्यावर कमी पाण्यावर देखील बाग व्यवस्थित आली.
झाडावर सर्वसाधारण १ ते १। क्रेट ( २० ते २५ किलो) माल आहे. पाणी कमी झाल्याने शेवटचे तीन महिने ६ दिवसाला फक्त २ तास पाणी देत होतो. तासाला ८ लिटरचा डिस्चार्ज आणि प्रत्येक झाडाला २ ड्रिपर म्हणजे तासाला १६ लि. x २ तास असे प्रत्येक झाडास ३२ लि. पाणी ६ व्या दिवशी देत असे. अशा परिस्थितीदेखील मालाची फुगवण चांगली होऊन आकर्षक कलर आला आहे. २१ मे २०१२ रोजी सरसकट ५० रू. किलोप्रमाणे माल जागेवरून व्यापार्याला दिला आहे. तरी ९५० झाडांपासून १८ ते २० टन माल निघेल.