V.R.S. वा निवृत्तीनंतर यशस्वी केलेल्या डाळींब बागा

श्री. हिरोजी शंकर कुर्‍हाडे,
मु. पो. आळे (लवणवाडी), ता. जुन्नर, जि. पुणे.
फोन : (०२१३२) २६२१९७



V.R.S. नंतर डाळींबाचे यशस्वी उत्पादन

मी मुंबई येथे होलटास कंपनीत १९ वर्षे नोकरी केली. त्यानंतर व्ही.आर. एस. घेऊन आळे येथे गावाला आलो. शेती करण्यास सुरुवात केली, तेव्हा आमचे मित्र श्री. विजय विठ्ठल कुर्‍हाडे यांनी मला डाळींब हे पीक घेण्यास सांगितले. मी त्यांना म्हटलो मला त्यातील काहीच माहिती नाही. मग त्यांनी सांगितले, की आपल्याकडे डॉ.बावसकर सरांचे प्रतिनिधी येऊन मार्गदर्शन करतील, त्यावरून मी डाळींब लावण्याचा निश्चय केला.

१० सप्टेंबर २००३ मध्ये डाळींबाच्या शेंदरी वाणाची ३२५ रोपे वडगाव लांडगा (संगमनेर) येथून आणली. जागेवर मला ८ रू. हुंडी प्रमाणे (मिळाली). नंतर १० x ८ फुटावर १ x १ x १ फुटाचा खड्डा व त्या खड्ड्यात कल्पतरू सेंद्रिय खत, शेणखत, सुक्ष्म अन्नद्रव्ये मिसळून लागवड केली.

लागवडीनंतर १० दिवसांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे फवारली, त्यामुळे झाडाची वाढ दिसून आली, फुटवे भरपूर निघाले. त्यानंतर गरज पडेल तसे दर २० ते २४ दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ३० मिली + प्रोटेक्टंट १५ ग्रॅम प्रति पंपास घेऊन फवारले. त्याने सव्वा वर्षातच काड्या पक्क झाल्या, अन्नसाठा वाढला, झाडे निरोगी तयार झाली. त्यानंतर झाडांना ताण दिला.

मी मागील वर्षी २६ जानेवारी २००५ ला पाणी दिले. पाणी देण्याअगोदर शेणखत प्रतिझाड १ पाटी देऊन कल्पतरू १५० किलो + सुक्ष्म अन्नद्रव्ये २० किलो असा एकरी डोस दिला. त्यानंतर झाडे लवकर फुटण्यासाठी प्रिझम ५० मिली + जर्मिनेटर ३० मिली + पाणी १० लि. अशी फवारणी केली. त्यामुळे फूट एकसारखी, जोमात निघाली. फुले भरपूर निघाली. त्यानंतर निघालेली फुले गळू नये यासाठी थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ४० मिली + प्रोटेक्टंट २५ ग्रॅम अशी औषधे प्रति १२ लि. पाण्यात घेऊन फवारली. नंतर फळे सुपारी ते लिंबाच्या आकाराची झाल्यावर थ्राईवर ५० मिली + क्रॉंपशाईनर ५० मिली + राईपनर २५ मिली + किटकनाशक + पाणी १२ लि. अशी फवारणी घेतली. पुढे फळे चिकू ते पेरूच्या आकाराची झाल्यावर क्रॉंपशाईनर ६० मिली + राईपनर ५० मिली + १० लि. पाणी ह्याप्रमाणे फवारले. बहार धरल्यापासून डॉ.बावसकर तंत्रज्ञानाच्या एकूण सहा फवारण्या घेतल्या. त्यामुळे फळे ए - वन क्वालिटीची मिळाली. शायनिंग भरपूर आली. खराब माल फक्त ३ ते ४ % इतकाच निघाला. पहिल्याचा वर्षी ६५,००० रू. झाले. खर्च १०,००० रू. वजा करून मला ५५,००० रू. निव्वळ नफा मिळाला. डॉ.बावसकर सरांचे तंत्रज्ञानामुळे शेतीत खर्‍या अर्थाने यशस्वी होऊन एक नोकरदार उत्कृष्ट शेतकरी झाला.