पाणी कमी असूनही दर्जेदार भगवा डाळींब भाव ४५ ते ५० रू. किलो
श्री. प्रवीण प्रताप काळे,
मु.पो. वाळवणे, ता. पारनेर, जि . अहमदनगर.
फोन :
(०२४८८) २४३५६१ मो. ९९२२४५२१५६
माझ्याकडे २ एकर जमीन असून त्यातील सव्वा एकरमध्ये भगवा
डाळींबाची ५ जून २००३ रोजी लागवड केलेली आहे. तर उरलेल्या जमिनीत कालीपत्ती चिकूची
३२ झाडे १५' x १५' वर आहेत. डाळींब १४' x ८' वर आहे.
चिकूला पाटाने पाणी देतो. डाळींबाला ठिबक केली आहे. स्वत्रंत्र बोअर आहे. मात्र पाणी
कमी असल्याने उन्हाळ्यात कमी पडते. या दोन्ही फळबागांना शेणखत, कंपोस्टखताबरोबर रासायनिक
खतांचाही वापर काही प्रमाणात केला.
सव्वा एकरात डाळींबाची ४२६ झाडे आहेत. त्यातील २०० झाडांचा डिसेंबर २००७ मध्ये चौथा बहार धरला त्याचवेळी ' डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी' ने दुष्काळावर मात करणारे डाळींब ' पुस्तक (दुसरी आवृत्ती) वाचण्यात आले. त्यानुसार डाळींबाची पानगळ झाल्यानंतर खते देऊन पाणी दिल्यावर जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी १ लि. ची फवारणी २०० लि. पाण्यातून केली. त्याने फुट एकसारखी निघाली. कळीही एकसारखी लागली. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी श्री. संतोष ढगे आमच्याच भागातील असल्याने त्यांना प्लॉटवर बोलावून पुढील फवारण्यासंबंधी सल्ला घेतला. त्यांच्या सल्ल्यानुसार दर १५ - २० दिवसांनी सप्तामृत औषधांच्या ५ - ६ फवारण्या घेतल्या. कल्पतरू सेंद्रिय खत मात्र वाहतुकीअभावी वापरू शकलो नाही. वातावरणातील बदलानुसार बुरशीनाशकांचा वापर केला.
आज रोजी (१७/ ७/ ०८ ) बाजारभावाची खात्री करण्यासाठी १२ क्रेट माल पुणे मार्केटला आणला होता. मालाला पुर्ण तंत्रज्ञान वापरल्याने पोषण होऊन सालीला आकर्षक चकाकी आली आहे. इतरांपेक्षा ५ ते १० रू. किलोमागे भाव अधिक मिळाला. ४५- ५० रू. किलोने विक्री झाली. मे तुकाराम तात्याबा कुंजीर यांच्या गाळ्यावर हा माल विक्री केला. प्रत्यके झाडावर १०० -१२५ फळे आहेत. अजून ५०- ५५ क्विंटल माल निघेल. तरी बागेतील सर्व माल पाहता एक लाख रू. सर्व साधारण अर्ध्या एकरात निश्चित होतील. उरलेल्या २२६ झाडांचा हस्त बहार डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचे घेणार आहे. चालू बहाराचे पाणी कमी असतानाही या तंत्रज्ञानाने फळांचे समाधानकारक पोषण झाले.