१८ महिन्यात ६० - ८० रोगमुक्त दर्जेदार डाळींब

श्री. दशरथ पांडुरंग कुंजीर,
मु. पो. वाघापूर, ता. पुरंदर, जि. पुणे.
मो. ९९२३५९५६५९



माझ्याकडे वाघापूर येथे ३ एकर मुरमाड प्रतीची जमीन आहे. एक एकर जमिनीची १४ - १४ फुटाच्या अंतराने जे. सी. बी. ने २ ॥ फूट खोल चारी घेऊन त्यामध्ये पालापाचोळा, सेंद्रिय खत टाकून चारी भरून घेतली. ऑक्टोबर २००६ मध्ये १४' x १०' अंतरावर भगवा डाळींबाची लागवड केली. एक वर्षापर्यंत सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर केला.

मी पुणे महानगर पालिकेमध्ये आरोग्य विभागात नोकरीला असल्याने शिवाजीनगरला अॅग्रोवन कृषी प्रदर्शनास नोव्हेंबर २००७ मध्ये भेट देताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या स्टॉंलला भेट देऊन 'कृषी विज्ञान' मासिकाचे अंक व डाळींब पुस्तक घेतले. त्याचे वाचन केल्यानंतर डिसेंबर २००७ मध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, पुणे ऑफिसला भेट देऊन माहिती घेतली.तेव्हापासून सर्व डाळींब प्लॉटला डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली.

नोव्हेंबरमध्ये ताण देऊन डिसेंबरला कल्पतरू खताच्या ४ बॅगा आणि निंबोळी पेंडीच्या ५ बॅगा शेणखताबरोबर देऊन पाणी दिले. त्यानंतर पहिली फवारणी जर्मिनेटर, प्रिझम यांची केली. त्याने फुट निघून फुलकळी लागली. नंतर १५ - २० दिवसांच्या अंतराने नियमित फवारण्य केल्या. फळधारणा समाधानकार झाली. १८ महिन्याच्या झाडावर ६० ते ८० फळे आहेत. एप्रिल महिन्यात रोगाचा तसेच सुरसा अळीचा प्रादुर्भाव झाला, तेव्हा सरांना भेटण्यास आलो होतो. सरांनी सांगितल्याप्रमाणे थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. आणि प्रिझम ५०० मिली व प्रोटेक्टंट ५०० ग्रॅमची कॅनॉनसह २०० लि. पाण्यातून फवारणी केली. त्याने करपा, सुरसा अळी पुर्णपणे आटोक्यात आली. आतापर्यंत जर्मिनेटर एकरी १ लि. २०० लि. पाण्यातून ठिबकद्वारे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सहा फवारण्या घेतल्या आहेत. सध्या (१२ / ०५/ ०८) फळे १५० ते २५० ग्रॅम वजनाची असून रंग, चमक चांगली आहे. आज सरांना भेटून डाळींब फळाचे आकारमान, वजन वाढीसाठी तसेच फळांत गोडी (साखरेचे प्रमाण) वाढीसाठी थ्राईवर, राईपनर प्रत्येकी १ लि. क्रॉंपशाईनर, न्युट्राटोन ५०० मिली, प्रोटेक्टंट १ किलो घेऊन जात आहे.