सरांची पुस्तके वाचून सर्व फळबागांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरून उत्तम यश

श्री. दादासो महादेव दुबळ
, मु. पो. कुरवळी, ता. इंदापूर, जि. पुणे.
मो. ९९६००७२७६६



माझ्याकडे मध्यम प्रतीची ५ एकर जमीन आहे. त्यामध्ये २ वर्षापूर्वी डाळींब, लिंबू आणि केळीची लागवड केली आहे.

डिसेंबर २००७ मध्ये किसान प्रदर्शन मोशी येथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी स्टॉंलला भेट देऊन तेथून डाळींब, लिंबू व केळीची पुस्तके घेतली. तसेच 'कृषी विज्ञान' मासिकाची वार्षिक वर्गणी भरली. अंक नियमित येत असून त्याचे पुर्णपणे वाचन करत असतो. त्यावरून मार्चमध्ये डाळींबाचा बहार धरला. फळांचे सेटिंग झाल्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर व प्रोतेक्टंटचे २ स्प्रे १५ - २० दिवसांनी मे, जूनमध्ये घेतले. सध्या झाडावर ६ ते ७ डझन फळे आहेत. फवारण्यामुळे फळांचे पोषण होऊन फळांना तेजी (चमक, आकर्षकपणा) आला आहे. डाळींबाला पुर्ण तंत्रज्ञान वापरून पहिल्याच बहाराचे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी नियमित वापर करीप आहे. डाळींबानंतर लिंबू आणि केलीलादेखील हेच तंत्रज्ञान सुरू ठेवणार आहे.