ढोबळी मिरचीची लागवड
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
                                लवंगी मिरचीच्या कुळातील म्हणजे सोलानेसी (Solanaceac) असलेली ब्राझील मध्ये उगम पावलेली
                                ढोबळी मिरची आहे. महाराष्ट्रात रब्बी आणि उन्हाळी भाजीपाला पीक म्हणून घेतले जाते. ढोबळी
                                मिरचीस सिमला मिरचीही म्हणातात. याचे शास्त्रीय नाव आहे कॅप्सीकम फ्रुटेन्सीनस (Capsicum Fruitensens)
                                युरोपियन लोकांच्या आवडीची भाजी म्हणून ही उपयुक्त आहे. भारतातील थंड हवामान असलेल्या
                                प्रदेशात प्रामुख्याने उत्तर भारतात या पिकाची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये
                                पश्चिम पट्ट्यात पुणे, नाशिक आणि सातारा जिल्ह्यामध्ये तर
                                कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात रब्बी हंगामात ही मिरची घेतली जाते.
                                
यामध्ये 'अ' आणि 'क' जीवनसत्व भरपूर प्रमाणत आहे. नेहमीच उन्हाळ्यामध्ये भाजीपाल्यास बाजारभाव चांगला मिळतो. त्यामध्ये ढोबळी मिरचीस तर वर्षभर जास्तीती जास्त चांगले बाजारभाव मिळतात. ही मिरची भारतामधून आखाती देशांमध्ये निर्यात केली जाते. मागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आखाती देशांमध्ये निर्यात केली जाते. मागणी मोठ्या प्रमाणांत असल्यामुळे आखाती देशांमध्ये निर्यातीस आणखी भरपूर वाव आहे. नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने पश्चिम घाट पट्ट्यामध्ये भातपिकानंतर रब्बी, उन्हाळी हंगामात ढोबळी मिरचीची लागवड केली जाते.
                                
हवामान : ढोबळी मिरची हे समशितोष्ण हवामानात येणारे नाजूक पीक असून बदलत्या हवामानातले कडक ऊन, ढगाळ हवा, झिमझिम वा मुसळधार पाऊस, धुई, धुके, कडाक्याची थंडी अथवा ढगाळ हवेतील गरम व दमटपणा या पिकास मानवत नाही. मिरचीच्या बहुतेक संकरित जातींना महाराष्ट्रातील सुरुवातीचे दोन महिन्याचे पावसाळी हवामान व मार्च / एप्रिलचे हवामान अनुकूल असते.
                                
जमीन: हलकी ते मध्यम खोलीची, तांबूस करड्या रंगाची सुपीक जमीन असावी. काळी जमीन शक्यतो ढोबळी मिरचीच्या लागवडीसाठी वापरू नये. कारण काळ्या जमिनीत कॅल्शिअम कार्बोनेट (CaCo3) चे प्रमाण जास्त असल्याने जमीन तापते व कॅल्शिअम कार्बोनेटमुळे फळांवर चट्टे (Collor Rot) पडतात. हा प्रकार (रोग ) टोमॅटो, वांगी या पिकांवरही पडतो.
                                
जाती : सुधारित जाती :
                                
१) कॅलीफोर्निया वंडर : या वाणामध्ये झाडे मध्यम आकाराची असतात, फळांची लांबी १० सेंमी आणि व्यास ९ सेंमी असतो. झाडे मध्यम उंचीची व उभट असतात. फळामध्ये गर भरपूर असून फळे चवदार असतात.
                                
२) यलो वंडर : या वाणाची झाडे मध्यम उंचीची व उभट असतात. फळे आकराने मोठी असून चवीला रुचकर असतात. फळांचा आकार १० x ८ सेंमी, सरासरी वजन १५० ग्रॅम असते. फळांची साल जाड असते. त्यामुळे टिकाऊपणा अधिक वाढतो.
                                
३) भारत : बेंगलोर येथील 'इंडो अमेरिकन' कंपनीने विकसित केलेला संकरित वाण आहे. खरीप आणि रब्बी होनही हंगामात लागवडीस योग्य आहे. एका फळाचे वजन सर्वसाधारण १५० ग्रॅम असते. या वाणाच्या मिरचीची साल जाड असून अधिक उत्पादनक्षम वाण आहे.
                                
४) अर्का गौरव : कॅलीफोर्निया वंडर या जातीत सुधारणा करून हा वाण विकसित केला आहे. फळे गर्द हिरव्या रंगाची असून फळाचे सरासरी वजन १८० ग्रॅम असते. सुमारे १४० दिवसाच्या कालावधीत एकरी ६ ते ७.५ टन उत्पादन मिळते. झाडांची वाढ अखेरपर्यंत होत राहते.
                                
५) अर्का मोहिनी : बुटकी जात. फळे गर्द हिरवी आणि आकराने चौकोनी तसेच मोठी असतात. फळांचे सरसरी वजन १८० ग्रॅम असते. १२५ दिवसाच्या कालावधीत एकरी ६ ते ८ टन उत्पादन मिळते.
                                
६) अर्का वसंत : उंच वाढणारी, फळांचा आकार त्रिकोणी अशी जात आहे. पिकाचा कालावधी १३० -१५० दिवस असतो. चवीला अतिशय रुचकर आहे. उत्पादन एकरी ६ टन देते.
                                
७) ग्रीन गोल्ड : महिको कंपनीची संकरित जात आहे. एकरी १५ टन उत्पादन मिळते. ८) मास्कोनी मॅरोन : लहान आकाराची फळे, झाडांची उंची ७० ते ९० सेंमी एवढी असते. मध्यम देणारी जाता आहे.
                                
९) बेल बॉय : हळवी जात, फलधारणा लवकर होते. फळांची लांबी जास्त असते. (११ सेंमी x ५ सेंमी आकाराचे फळ लागते ) झाडाची उंची कमी ५० ते ६० सेंमी असते.
                                
याखेरीज सिंजेंटा कंपनीच्याही काही जाती आहेत -
                                
१) इंद्रा : झाड जोमदार, मध्यम उंचीचे डेरेदार असते. हिरव्या रंगाची दाट पाने असल्याने फळाचे उन्हापासून रक्षण होते. खरीप हंगामाच्या शेवटी किंवा फेब्रुवारी, मार्च महिन्यात रोपाची लागवड करावी. रोपांना आधार देऊन उत्तम प्रकारचे जास्तीत जास्त उत्पादन घेता येते. लागवडीनंतर ५० ते ६० दिवसातच रोपाला फळ लागते.
                                
गडद हिरव्या रंगाची मिरची, जाड, चमकदार आवरण असलेली असून फळाची लांबी साधारण १० ते १२ सें.मी. तर रुंदी साधारण १० सें.मी. असून ३ ते ४ उंचवटे असतात. सर्वसाधारण इंद्रा सिमला मिरचीचे वजन १२५ ते १७५ ग्रॅम एवढे भरते. अधिक दिवस फळ ताजे, टवटवीत राहत असल्याने दूरच्या भाजी मंडईत पाठविण्यास योग्य. फळ चांगल्या गुणवत्तेचे असल्याने निर्यात होण्याची शक्यता अधिक आहे.
                                
२) बॉम्बी : मजबूत, जोमदार वाढ व लवकर येणारी जात असून विस्तारीत फांद्या व पानांमध्ये फळे झाकलेला असल्यामुळे उन्हापासून फळांचे संरक्षण होते. झाडांना आधार देवून उत्तम प्रकारचे जास्तीत जास्त उत्पादन घेता येते.
                                
फळे गडद हिरव्या रंगाची, जाड चमकदार सालीची व पक्क झाल्यानंतर आकर्षक लाल रंगाची असतात. सर्वसाधारणपणे फळांचे वजन १३० ते १५० ग्रॅम असते. फळांची लांबी १० ते ११ सेंमी तर जाडी १० सेंमी असून ३ ते ४ कप्पे असतात. अधिक दिवस फळ ताजे, टवटवीत राहत असल्याने दूरवरच्या बाजारपेठेत पाठविण्यास योग्य.
                                
३) लारियो : जलद येणारी (उगवणारी) संकरीत जात असून दाट पानांच्या जाळीत फळ झाकले जाते. रोपाला आधार देऊन जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचे उत्पन्न येण्याची शक्यता अधिक आहे. लागवड केल्यानंतर ५० ते ५५ दिवसात पहिले फळ तोडणीस येते.
                                
फळे मध्यम आकाराची, गडद हिरव्या रंगाची, जाड आवरण असलेली, रसरशीत गोलाकार असतात. फळांची लांबी, रुंदी ही साधारण ११ x ११ सेंमी व ३ -४ खाचा असलेली आकर्षक फळे असून वजन साधारण १२५ ते १५० ग्रॅम भरते. भरपूर फळे लागतात . जास्त दिवस ताजे, टवटवीत राहणारे उत्तम फळ असल्याने दूरच्या भाजी मंडईत पाठविण्यास योग्य जात आहे.
                                
४) ऑरोबेल : झाड मजबुत, जोमदार वाढणारे व लवकर येणारी जात असून विस्तारीत फांद्या व पानांमध्ये फळे झाकलेली असल्यामुळे उन्हापासून फळांचे संरक्षण होते.
                                
ह्या जातीची फळे गडद हिरव्या रंगाची, जाड चमकदार सालीची व पक्क झाल्यावर आकर्षक सोनेरी रंगाची असतात. फळांचे वजन सरासरी १३० ते १५० ग्रॅम असते. फळांची लांबी व रुंदी साधारण १० x १० सेंमी असून ३ ते ४ कप्पे असतात. फळ अधिक दिवस ताजे व टवटवीत राहत असल्याने दूरवरच्या बाजारपेठेत पाठविण्यास योग्य जात आहे.
                                
बियाणे : एकरी १२५ ते १५० ग्रॅम बियाणे वापरावे . बियाणे जर्मिनेटरच्या द्रावणात बुडवून लावल्यास संभाव्य मर व नतंर होणारे कॉलररॉट सारखे रोग टाळता येतात.
                                
रोप कसे तयार करावे : रोपांसाठी तयार कराव्या लागणार्या वाफ्याची जमीन भाजलेली असावी, म्हणजे पहिल्या पिकाच्या अवशेषात राहिलेली कीड व अंडी नाहिशी होतात. वाफ्यात बी टोकताना सर्व बाजूंनी समप्रमाणात व समपातळीवर पाणी बसेल या मापाने जमिनीच्या मगदुरानुसार उतार देण्यात येऊन वाफ्यांचा आकर (गाडी वाफा तयार करावा) ठरवावा.
                                
बीजप्रक्रिया : जर्मिनेटर २५ ते ३० मिली. + प्रोटेक्टंट १५ ते २० ग्रॅम + २५० मिली पाणी या द्रावणात १०० ते २५० ग्रॅम बी ३ ते ४ तास भिजवून सावलीत सुकवून रोपांसाठी टाकले असता वाळवी अथवा काळ्या किडींचा प्रादुर्भाव होत नाही. प्रोटेक्टंट हे आयुर्वेदिक औषच असल्याने थायमेटसारख्या विषारी औषधाला पर्याय ठरू शकते. तसेच जर्मिनेटरमुळे बियाची उगवण क्षमता वाढून मर रोगास आळा बसतो.
                                
रोपांच्या दोन ओळीतील अंतर ४ इंच दोन बियांतील अंतर १ इंच असावे. टोप सर्वसाधारणपणे ५ व्या - ६ व्या दिवशी उगवून येईल. वरील द्रावणाने हे शक्य होईल. रोप दोन पानावर आल्यावर त्याला दर दोन दिवसांनी झारीने जर्मिनेटर, थ्राईवर,क्रॉंपशाईनरची चूळ भरावी. असे चार - पाच दिवस केले असता टोप २० -२१ दिवसात लागवडीस येते.
                                
लागवडीचा कालावधी : फाल्गुन महिन्यात किंवा एप्रिल ते जुलै - ऑगस्ट महिन्यात लागवड केल्यास सप्टेंबर ते डिसेंबर अखेरपर्यंत ढोबळी मिरची तोडणीस येते.
                                
लागवड : सरी वरंब्यावर, दीड एक फुट अंतर ठेवून वरंब्याच्या मध्यावर लागवड करावी. इंडो अमेरिकन कंपनीच्या जाती,कॅलीफोर्निया वंडरची तसेच इतर खाजगी कंपन्यांच्या खात्रीशीर संकरित वाणांची लागवड केल्यास अधिक उत्पन्न मिळते.
                                
रोपांची लागण : रोपांची लागण करताना विशेष काळजी घ्यावी. रोपे हलकीशी उपटून जर्मिनेटर व प्रोटेक्टंटच्या द्रावणात बुडवून काढून, उपसून मग लावावीत. अंगठ्याने रोप लावू नये. अंगठ्याने रोप लावल्यास मुळी वाकडी होऊन पिकास अन्नपुरवठा होण्यास अडचण येते व त्यामुळे फळे न लागण्याची शक्यता निर्माण होते.
                                
पाणी केव्हा व कसे द्यावे : उन्हाळ्यामध्ये ४ थ्या - ५ व्या दिवशी पाणी द्यावे. झाडांवर भरपूर फळे येऊन जास्त माल निघत असेल तेथे पाणी आठवड्यातून दोनदा द्यावे. हिवांळ्यात पाणी आठवड्याने द्यावे. उन्हाळ्यामध्ये सकाळी ८ च्या आत पाणी द्यावे किंवा संध्याकाळी ६ नंतर पाणी द्यावे. कारण कडक उन्हामध्ये पाणी दिल्यास फ्रुट क्रेकिंग होण्याचा (फळे तडकण्याचा) संभव असतो. जमीन तापलेली असते, त्यामुळे विपरीत परिणाम होतो.
                                
खते : एकरी १ ते १।। टन शेणखत किंवा कल्पतरू सेंद्रिय खत लागवडीपुर्वी १०० ते १५० किलो द्यावे. नंतर १ महिन्याने साधारण पहिली खुरपणी झाल्यावर ५० किलो कल्पतरू खत गाडून द्यावे. खात शक्यतो जमि वाफश्यावर असताना द्यावे. खत दिल्यानंतर पुन्हा पाणी द्यावे.
                                
फुल व फळधारणा : साधारणपणे ३५ ते ४० दिवसात फुल लागते व ५० ते ६० दिवसात म्हणजे मार्च / एप्रिलमध्ये लागण केल्यास जूनमध्ये फळे काढणीस येतात. डॉ. बावसकर तंत्रज्ञानाने ढोबळी मिरची ७ -८ महिने चालविता येते.
                                
उत्पादन : जातीनुसार ढोबळी मिरचीचे उत्पादन कमीत कमी ८ टन ते जास्तीत जास्त ३० टनापर्यंत घेत येते. पिकांचे व्यवस्थित नियोजन जरून, कीड व रोग टाकून मोठ्या आकाराची, उत्तम दर्जाची ढोबळी मिरची बाजारामध्ये १५० ते ४०० रुपये १० किलो या दराने विकली जाते.
                                
पीक संरक्षण :
                                
१) मर : रोप बाल्यावस्थेमध्ये असताना उन्हाळ्यामध्ये मर होत असते. उगवण व्यवस्थित होऊन रोपातील मर टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून वरील प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. लागवडीस तयार झालेली रोपे नंतर पुर्णपणे जर्मिनेटरमध्ये बुडवून लावावीत. त्यामुळे रोपांची मर होत नाही.
                                
२) करपा : रोपे लहान असताना पहिल्या अवस्थेत पाने जाड हिरव्या रंगाची होतात. दुसर्या अवस्थेत पाने वाळू लागतात. तिसर्या अवस्थेत जुन्या पानांच्या खालील भागावर पिवळे ठिपके पडून करड्या रंगाची अनियमित छटा चकल्यासारखी दिसते. पानाचा तो भाग जळाल्यासारखा दिसतो. या डागांचे प्रमाण वाढत जाऊन पाने जळतात व झाड निकामी होते. काही वेळा रोगाची लागण रोपाच्या बाल्ल्यावस्थेत झाल्यास झाडांचा शेंडा पिवळसर होऊन खालच्या बाजूने पांढर्या रंगाची बुरशीही दिसू लागते.
                                
३) चुराडा -मुरडा (बोकड्या ) : या विकृतीचा प्रादुर्भाव फुलकिडे, मावा, तुडतुडे, पांढी माशी आणि विषाणूंमुळे होतो. प्रादुर्भाव झालेल्या झाडावरील पाने आकसतात. त्यातील अन्नरस कमी होतो आणि झाडांची वाढ खुंटते. नवीन पालवी येत नाही.
                                
ढोबळी मिरचीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत, हार्मोनी फवारण्याची वेळ व प्रमाण -
                                
फवारणी (रोपांवर ) - बी उगवल्यानंतर ८ -८ दिवसांनी - (३० दिवसांत तीन वेळा) जर्मिनेटर २० मिली.+ थ्राईवर २५ मिली + क्रॉंपशाईनर २५ मिली. + प्रोटेक्टंट १ चमचा + प्रिझम २० मिली.+ १० लि.पाणी
                                
रोपांची लागवड करताना : २५० मिली जर्मिनेटर + १०० ग्रॅम प्रोटेक्टंट + १० लि.पाणी या प्रमाणात घेऊन रोपे त्यामध्ये संपूर्ण बुडवून सुकवून लावावीत.
                                
पुन : लागवडीनंतरच्या फवारण्य :
                                
१) पहिली फवारणी :(रोप लावल्यानंतर १५ ते २० दिवसांनी) : जर्मिनेटर ३० मिली.+ थ्राईवर ३० मिली + क्रॉंपशाईनर ३० मिली. + प्रोटेक्टंट ३० ग्रॅम + प्रिझम ३० मिली. + हार्मोनी १५ मिली + १५ लि.पाणी.
                                
२) दुसरी फवारणी : (रोप लावल्यानंतर ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ४० मिली.+ थ्राईवर ४० मिली + क्रॉंपशाईनर ४० मिली. + प्रोटेक्टंट ३० ग्रॅम + प्रिझम ३० मिली. + न्युट्राटोन २० मिली + हार्मोनी १५ मिली + १५ लि.पाणी.
                                
३) तिसरी फवारणी : (रोप लावल्यानंतर ४५ दिवसांनी) : थ्राईवर ५० मिली + क्रॉंपशाईनर ५० मिली. + राईपनर ३० ते ४० मिली + प्रोटेक्टंट ४० ग्रॅम + प्रिझम ४० मिली. + न्युट्राटोन ३० ते ४० मिली + हार्मोनी २० मिली + १० लि.पाणी.
                                
४) फळे काढणीच्या सुमारास व नंतर मिरची संपेपर्यंत (७ महिने ) वरील फवारणीनंतर दर ८ ते १५ दिवसांनी : थ्राईवर ५० मिली + क्रॉंपशाईनर ५० मिली. + राईपनर ४० ते ५० मिली + प्रोटेक्टंट ४० ग्रॅम + प्रिझम ४० मिली. + न्युट्राटोन ५० मिली + हार्मोनी २० ते २५ मिली + १५ लि.पाणी.
                                
ढोबळी मिरचीवरील फळकुजव्या कसा आटोक्यात आणाल ?
                                
अवस्था : उन्हाळा संपलेला असतो. वातावरणात ढग जमा होण्यास सुरुवात झालेली असते. उष्णता जास्त होऊन आर्द्रता वाढते आणि उष्णता कमी होत जाते आणि मग पावसाची चिन्हे दिसू लागतात. या चिन्हांचे रूपांतर धो - धो पाऊस पडण्यात होऊन या पावसाच्या पाण्याचे थेंब देठावर पडून तेथून सरकून देठाच्या बेचक्या (देठ व फळ जेथे जोडले जाते तेथे) शिरून फळ कुजण्यास सुरुवात होते.
                                
हे ओळखायचे कसे ? तर फळाच्या तळाजवळ स्त्रिया कट केलेली नक्षीदार टिकली लावतात त्या आकाराची करड्या रंगाची रिंग (कड ) हळुवार ते स्पष्टपणे दिसल्याचे जाणवते. चांगले दिसणारे फळ घरी नेल्यावर तिसर्या दिवशीच सडते, नासते. असे पाऊस सुरू होताच दोन दिवसांमध्येच हजारो फळे सडतात व कुजतात. अशा वेळी टोमॅटो, ढोबली मिरचीच्या देठाच्या डाव्या बाजूस वरती खाकी, करड्या रंगाचा, पुस्तकाच्या ब्राऊन कव्हरच्या कलरचा, लहान, एक नवा पैस ते जुना ढब्बू पैशाच्या आकाराचा चट्टा व देठाजवळ उपसल्यानंतर करड्या रंगाची गोल रिंग हळूवार व स्पष्टपणे दिसल्याचे जाणवते. फळे तोडतांना चारही बोटे फळात जातात आणि मग शेतकरी व फळे तोडणारे फळात आळी झाली असे समजून अशा गैरसमजुतीमुळे किटकनाशके मारत राहतात.
                                
प्रत्यक्षात फळकुज झाल्याने, फळ मऊ होऊन आतील मगजावर अळी तुटून पडून गलेलठ्ठ होते. फळे तोडताना बायांची बोटे फळात जातात. सर्वांना अळी दिसते. पण फळकुजीनंतर अळी येते. त्याकरिता फळकुजच होऊ नये म्हणून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर प्रथमपासून करावा. रोग आल्यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीबरोबर कॅलेक्झीन घ्यावे व त्याचबरोबर आलटून पालटून किटकनाशक घ्यावे म्हणजे रोग, कीड आटोक्यात येईल. अधिक माहितीसाठी आमचे कृषी विज्ञान केंद्रास भेट देऊन तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य औषधांचा प्रमाणशीर वापर करावा.
                                
या रोगामुळे फळांवर उजवीकडे वरच्या बाजूस तपकिरी रंगाचा डाग लहान मुलांना तीट लावतात त्या आकाराचा दिसतो. यालाच 'देवी किंवा मूर' असेही म्हणतात. अशाच अनियमित मूर किंवा देवीची लक्षणे फळाला खालून एक बोट वरती दिसून येताच खालचा डाग वरच्या डागापेक्षा वेगळा असतो. ४ ते ५ दिवसांमध्ये संपूर्ण प्लॉट उद्ध्वस्त होतो. सुरूवातीपासून पंचामृत, प्रिझम, न्युट्राटोन औषधे वापरल्यास फलकुजव्या अजिबात होते नाही. रासायनिक खते या काळामध्ये वापरू नयेत. ऊन तपान्याच्या अगोदर, पावसाच्या अगोदर व भाद्रपद उन्हाच्या अगोदर (१५ दिवस ते १ महिन्यापुर्वी ) 'कल्पतरू' सेंद्रिय खताचा वापर एकरी १०० किलो या प्रमाणांत केल्यास जमिनीत गारवा निर्माण होऊन फळकुजव्या कमी होण्याची शक्यता आहे. जमिनीचे भौतिक, जैविक गुणधर्म सुधारण्याबरोबर 'कल्पतरू' या सेंद्रिय खतामुळे मुळकुजव्या टाळता येतो. याचे संशोधन झाले तर नवीन क्रांती झाल्यासारखी होईल.
                                
फळकुजव्या झालेल्या फालंची विल्हेवाट :
                                
फळकुजव्या झालेली फळे प्राथमिक लक्षणापासून प्रगत अवस्थेपर्यंत कधीही बहुतेक शेतकरी लाकडी / चहाची खोकी किंवा क्रेटस गावोगाव पाठविली जाऊन पालखीतल्या दिंडीसारखी परत गावोगाव प्रसार करतात आणि त्यामुळे अनेक रोगांचा प्रसार वेगाने,झपाट्याने अधिक प्रमाणात होतो म्हणून औषधे खपण्याचे प्रमाण वाढते व शेतकर्यांच्या पदरी नैराश्य येते. तेव्हा कुजलेली फळे प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये किंवा पिशवीमध्ये जाळून टाकून त्यावर एक फूट माती लोटावी. म्हणजे रोगाचा प्रसार होणार नाही. शेतकरी मात्र ही फळे बांधावर फेकून देतात. तरी शेतकर्यांनी ही वादळापूर्वीच धोक्याची सूचन समजावी आणि वरीलप्रमाणे खबरदारी घ्यावी.