नुसती द्राक्ष निर्यात करण्यापेक्षा त्याचे बेदाणे करून जगभर निर्यात केली तर शेतकरी समृध्दीची फळे चाखू शकतील !

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


जसे केळी हे माणसाचे आरोग्य, वजन, वाढविणारे व व्हिटॅमीन ए देणारे फळ आहे. तसे लहान - मध्यम, मध्यम - मध्यम व उच्च वर्गात द्राक्ष या फळाला महत्वाचे स्थान आहे. परंतु द्राक्षाचा हंगाम हा डिसेंबर (नाताळ) पासून सुरू होतो. भारतात साधारण फेब्रुवारी ते मार्चपर्यंत गोड द्राक्ष ही (टेबल पर्पज) अधिक प्रमाणात मार्केटला येतात. या द्राक्षामध्ये व्हिटॅमीन सी व शर्करा याचे प्रमाण अधिक असते. द्राक्षामध्ये लांब मणी व चकाकी असलेल्या द्राक्षाला (सोनाका, माणिक चमन, तास - ए - गणेश) चांगली मागणी असते. आखाती व सार्क राष्ट्रात आशियाई लोक अधिक आहेत. त्यामुळे भारतात निर्माण होणारी द्राक्ष फेब्रुवारी - मार्च - एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात तिकडे निर्यात होतात. मे अखेर मालाच्या भावात घसरण होते. ऐन उन्हाळ्यात उष्णता वाढल्याने द्राक्ष क्वालिटीत मार खातात. तसेच या काळात आंबा मार्केटला आल्याने भाव ढासळतात. जांभळ्या रंगाच्या (शरद) किसमिस चोर्नी द्राक्षाला रमजान, नाताळमध्ये मार्केट चांगले असते. गेल्या १० - २० वर्षात ५५ ते ६० रू. असा तेजीचा भाव असायचा तो आता ९० रुपयावर स्थिरावला आहे. यानंतर थॉमसन हा ४० - ५० रू. ने सुरू होतो व तेजी वाढल्यावर ६० रू. वर जातो, तर निचांकीला ३० - ३५ रुपयावर खाली येतो. तास - ए- गणेश द्राक्षाला वरील द्राक्षापेक्षा १० - २० रू./किलो भाव अधिक असतो. सर्वात जास्त सोनाकाला भारतात दर जास्त मिळतो. याचे मणी साधारण पाऊण ते सव्वा इंच लांब, आकर्षक, वजनदार, पाकळ्या खुल्या असलेला, गोड असल्याने याला भाव अधिक राहतो. या सर्व जातींना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरल्याने सनबर्न, ममीफिकेशन, शॉर्टबेरीज, वॉटरबेरीज, पिंकबेरीज अशा विकृती येत नाहीत. हे हजारो शेतकऱ्यांनी अनुभवले आहे. युरोप, अमेरिका, केनडात मात्र गोल, हिरवी, अतिशय आंबट, घट्ट, काचेच्या मण्यासारखी कडक द्राक्ष, वजनदार, व्हिटॅमीन सी चे प्रमाण सर्वात अधिक असलेल्या द्राक्षास मागणी अधिक असते.

परदेशातील (चीली, इस्राईल, फ्रान्स, अमेरिका) जातींना बाराही महिने मागणी असते. यांचा रंग अधिकतर वाईन (तांबूस) कलरचा असतो. याचे दर १०० ते २०० रू. किलो असतात. रशिया, फ्रान्स, चिली, इस्राईल यांच्या जाती ह्या पल्प जास्त, गोडी कमी, व्हिटॅमीन - सी चे प्रमाण अधिक अशा असतात. ह्या जाती आड हंगामी येतात व याला १२५ - १५० रू./किलो भाव असतो.

जगाची लोकसंख्या ही ६०० कोटी आहे. यातील ३०० कोटी लोक हे कमी क्रयशक्ती असलेले मध्यम खालच्या वर्गातील आहेत. हे लोक द्राक्ष खाऊ शकत नाहीत. उरलेल्यातील १०० कोटी लोक द्राक्ष ही त्या - त्या हंगामात खाऊ शकतात. तर २०० कोटी लोक हे अधून मधून खाऊ शकतात. जगातील पुर्वेकडील जपान, चायना अशा राष्ट्रात व उरलेल्या अर्ध्या आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका खंड, उर्वरीत आशियाचा भाग व युरोपमध्ये वाईन व दारू बनविण्यासाठी द्राक्ष पिकविली जातात. तेथे पाण्यासारखी ही वाईन वापरली जाते. तेथे वाईनचे मोठे कारखाने आहेत.

आता आपण भारतातील द्राक्ष लागवड व उत्पादनाकडे वळूया - भारतातील एकूण क्षेत्र ३४ हजार हे. (८५ हजार एकर) तर उत्पादन १० लाख टन विविध जातींचे होते व देशातील १४० कोटीपैंकी ४० - ४२% लोक हे टेबल पर्पल द्राक्ष ही ४० - ६० रू. किलो भाव असतो तेव्हा ते महिन्यातून ४ ते ८ वेळा खाऊ शकतात. नंतर जो ६०% तरूणवर्ग आहे तो २ ते ४ वेळां द्राक्ष खातो, परंतु त्यातील काही तरुणवर्गाचा कल हा दारू आणि वाईन घेण्याकडे असतो आणि ४०% तरुण हे द्राक्ष खातात. ३०% लोक हे दारिद्रय रेषेखाली असल्याने ते द्राक्ष खाऊ शकत नाहीत. भारतात वाईनसाठी द्राक्षना मागणी फारच नगण्य आहे. त्यामुळे भारतात टेबल पर्पजसाठीच्या जाती आहेत. जेव्हा मार्केटमध्ये द्राक्ष (खाण्यासाठी जास्त) येतात तेव्हा द्राक्ष भाव हे ४० - ५० रू. /किलो पर्यंत खाली येतो. सर्वसाधारण लोक यावेळी द्राक्ष खाऊ शकतात.

बेदाण्याचा प्रक्रिया उद्योग डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वीपणे बहरला !

जेव्हा पीक जास्त येते तेव्हा मार्केटला मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्याने भाव कोसळतात. म्हणून द्राक्ष मार्केटला नेण्यापेक्षा त्याचे रूपांतर बेदाणा व किसमिस यामध्ये केले म्हणजे ४ किलो द्राक्षापासून पारंपारिक पद्धतीने १ किलो बेदाणा होतो. तर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने १२५० ते १३०० ग्रॅम बेदाणा मिळतो आणि गेल्या ५ ते १० वर्षात जो बेदाण्याचा भाव ८० ते १०० रू./किलो होता तो १४० ते १६० रू वर स्थिर झालेला आहे. परंतु सांगली जिल्ह्यात गेल्या १५ - २० वर्षात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने द्राक्षाचा दर्जा व उत्पादनात क्रांती झालेली आहे. जिथे भुरी, डावणी व इतर रोगांवर औषध फवारण्याचा खर्च इतर कंपन्यांची औषधे महागडी व रिझल्ट उशीरा आणि कमी येत असे. त्यामुळे ती वारंवार फवारावी लागत असे. यामध्ये अनावश्यक खर्चात वाढ होत असे. परंतु जेव्हा सांगली जिल्ह्यात गेल्या १५ - २० वर्षात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी तंतोतंत सातत्याने वापरल्याने शेतकऱ्यांना 'हार्मोनी' व 'स्प्लेंडर' वापरून इतर महागड्या औषधापेक्षा आपल्या द्राक्षाला जिवनाधार (Life Line) वाटला. इतर औषधापेक्षा कमी खर्चात परिणामकारक व वारंवारच्या फवारण्या टळून अनावश्यक खर्च वाचला, शिवाय दर्जा व उत्पादनात भरीव वाढ झाली. कमी पाण्यात द्राक्ष निर्माण करता येवू लागली आणि दर्जेदार विषमुक्त द्राक्ष साऱ्या देशभर या तंत्रज्ञानाने पिकवता येऊ लागली. त्यामुळे द्राक्षाची निर्यात क्षमता वाढवून शेतकऱ्यांना चांगला दर मिळू लागला. परंतु जेव्हा चिलीची द्राक्ष जागतिक मार्केटमध्ये उतरतात तेव्हा त्यांचा दर्जा कमी असल्याने भाव कमी होतो. त्यामुळे भारतीय द्राक्षाचा दर्जा चांगला असूनदेखील मार्केट तोडले जाते व भारतीय द्राक्षाची कोंडी होते. अशा विचित्र अवस्थेत ज्या ठिकाणी बेदाण्यासाठी हवामान अनुकूल आहे अशा ठिकाणी आता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने द्राक्ष उत्पादन करून ते मार्केटला न आणता किंवा निर्यात न करता त्याचा बेदाणा तयार करून त्याला २५० रू./किलो भाव (२०१४) होलसेल मार्केटमध्ये मिळू लागला आहे. त्यामुळे एकरी सर्वसाधारण १४ टन द्राक्ष उत्पादन मिळाले तर त्यापासून ३।। ते ४।। टन बेदाणा होतो. तो २५० रू./किलो दराने विकला म्हणजे एकरी ८ लाख ७५ हजार रू. ते ११ लाख २५ हजार होतात. या व्यतिरिक्त डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने एक किलो द्राक्षापासून १२५० ते १३०० ग्रॅम बेदाणा निर्माण होत असल्याने २५० ग्रॅम बेदाणा जास्त मिळून २ लाख रू. ज्यादा बोनस म्हणून मिळतात आणि साधी द्राक्ष जर मार्केटला नेली आणि ती मंदीत जर सापडली तर फार नुकसान होते. तेव्हा त्याचा बेदाणा तयार करून कोल्ड स्टोअरेजला ठेवून तो दिवाळी, रमजान, नाताळ अशा सणात विकला असता भाव अधिक मिळतो.

जी. आय. (भौगोलिक ओळख) :

Geographical Identification चे काम करणारे एक वकील त्यांचे सहकारी वाघ्या घेवडा (राजमा - सातारा कोरेगाव) जो उत्तर प्रदेश, दिल्लीला राजमाची पार्टी पाहुण्यांना पक्वान्न म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होतो. तेव्हा त्याविषयी माहिती घेण्यासाठी आमच्याकडे आले होते तेव्हा त्यांना ७ - ८ वस्तूंचा जी. आय. करा अशी सुचना केली होती. तेव्हा त्यात सांगलीचा बेदाणाही सांगितला आणि ६ महिन्यापूर्वीच सांगलीच्या बेदाण्यास (GI) त्या भागाची ओळख मिळाल्याचे वाचले. त्यामुळे दुधात साखरच पडली. सांगली जिल्ह्यात ८०% मालाचा बेदाणा केला जातो, सोलापुर (जुनोनी), नाशिक, लातूर, उस्मानाबाद येथेही बेदाण्याकडे शेतकरी वळाले आहेत. नाशिकमध्ये ५०% माल एक्सपोर्ट व देशांतर्गत मार्केट केले जाते. मध्यम मालास बांग्लादेशात जास्त मागणी आहे.

हवामान बदलल्याने रोग व विकृती वाढले आहेत. तसेच निविष्ठांचे दर वाढल्याने एकूण द्राक्ष उत्पादनाचा खर्च काही ठिकाणी १००% वाढला. त्यामुळे उत्पादन व खर्चाची तोंडमिळविणी करणे फार मेटाकुटीला येते. अशातच जर अवकाळी पाऊस, वादळ व गारपीट झाली तर शेतकऱ्यांचे १००% नुकसान होते. ते हतबल होतात. कारण द्राक्ष हे खर्चिक व बदलत्या हवामानास संवेदनशिल पीक आहे. याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी राष्ट्रीकृत व सहकारी बँकाकडून कर्ज घेवून हा खर्च करत असतात. यातून जर अशा अवकाळी परिस्थितीत द्राक्ष सापडली तर ती वाचवणे व त्यातून मार्ग काढणे फार अवघड होते. अशा परिस्थितीत बहुतेक शेतकरी हे द्राक्षापासून डाळींबाकडे वळले आहेत. विशेषकरून भगवा डाळींबास दर चांगले मिळत असल्याने त्याच्या लागवडी वाढलेल्या आहेत. परंतु येथेही तेल्या रोगाचा तसेच मर रोगाचा प्रादुर्भाव होवू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे. भांडवली खर्चात वाढ झाल्याने द्राक्ष बागा कमी होऊ लागल्या आहेत. शेतकरी याकरिता पर्यायी व्यापारी पीक शोधू लागलेला आहे. नुकत्याच डिसेंबर २०१४ मध्ये झालेल्या गारपीट व पावसाने द्राक्ष पिकाचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे द्राक्ष पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे द्राक्ष मार्केटला कमी आली. दर्जा कमी झाल्याने त्याचा दर ५० ते ८० रू./किलो झाला. नवीन खराब माल कमी दर्जाचा वाया गेला. ३० ते ४० रू./किलो भाव (डिसेंबर २०१४) मिळतोय. नवीन माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील ५००० एकरावरील द्राक्ष ही युरोपीयन मार्केटमध्ये निर्यात होण्याची शक्यता आहे.

सांगली भागातील द्राक्षांना गैरमौसमी डिसेंबर २०१४ मध्ये पावसाचा तडाखा इतर बागापेक्षा कमी बसल्याने येथील द्राक्षास मागणी बऱ्यापैकी आहे. मात्र नाशिक भागात त्याचा उपद्रव झाल्याने तेथील परिस्थिती ही अधिक नुकसानीने दोलायमान आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे उत्पादन कमी झाल्याने १२० रू. किलो भाव झाला आहे. (संदर्भ : ६ जानेवारी २०१५ ची टाईम्स ऑफ इंडिया, पान नं. ४ वरील बातमी) तेव्हा शास्त्रज्ञांपुढील व द्राक्षातील संशोधकांनी प्रतिकूल हवामानाला दाद देणाऱ्या द्राक्षाच्या जाती जागतिक लोकांची चव व गरज लक्षात घेवून निर्माण करणे गरजेचे आहे. बँका व नाबार्ड ने शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करताना परिस्थितीचा अभ्यास करून कर्ज पुरवठा वेळेवर करणे गरजेचे आहे व जेव्हा आपत्ती शेतकरी सापडतो तेव्हा विमा संरक्षण संरक्षणाचे कवच शेतकऱ्यांना विमा कंपन्यामार्फत व सरकारमार्फत देणे अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांना काही सबब सांगून त्यांना नाडणे काही संयुक्तीक होणार नाही. गेल्या २ - ३ वर्षात नैसर्गिक आपत्ती व वादळी वारा, पाऊस, गारपीटीने प्रचंड नुकसान झाले तर विशेषत: गारपिटीपासून पिकाचा बचाव करण्यासाठी हवामान खात्याचा अंदाज २ - ३ दिवसापर्यंत अगोदर उपलब्ध होत असून ती सुचना खरी ठरत असल्याने गारपीट व पावसापासून द्राक्ष वाचवण्यासाठी शेडनेट हे अगोदरच शेतात आणून ते वादळाची चाहूल लागायच्या १५ तासे ते १ दिवस अगोदर फळबागेच्या मांडवावर अंथरून घेतले कि नुकसान कमी होते, असे काही शेतकऱ्यांनी अनुभवले आहे.

यासाठी ७५ ते १००% अनुदानावर शेडनेट बँका सरकारने पुरवाव्यात अशी सुचना करावीशी वाटते. असे २ - ३ वर्षात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघेल व शेतकरी आर्थिकदृष्ट्या सबळ (Economically Viable) झाल्यावर हे अनुदान सरकारने काढून घ्यावे. नंतर बंद केले तरी चालेल. म्हणजे नंतर द्राक्षबागायतदार स्वत: गारपीटीपासून संरक्षणासाठी स्वखर्चाने शेडनेट घेतील.

बेदाण्याच्या प्रक्रिया उद्योगासाठी शेडसाठी अनुदान द्यावे व बेदाणे साठविण्यासाठी कोल्ड स्टोअरेजचे जाळे निर्माण करावे. हे काम सरकार, बँका बागायतदार यांनी एकजुटीने युद्ध पातळीवर करावे. म्हणजे द्राक्ष बागायदारांना चांगले दिवस येतील. चांगले दिवस येतील.

गेल्या अनेक वर्षातील हवामान व वातावरणातील संवेदनशील बदलाचा द्राक्ष पिकावर २०% पासून ८० ते १००% पर्यंत परिणाम होतो. यामध्ये आर्द्रता, धुके, तापमानातील बदल, अवेळी पाऊस, गारपीट याचा परिणाम द्राक्ष बागेवर होत असतो. यातून बागेवर डावणी, भुरीसारखे रोग व पिंकबेरीज, वॉटरबेरीज, ममीफिकेशन, शॉर्टबेरीज अशा विकृत येऊ नये म्हणून किंवा त्याच्या नियंत्रणासाठी जास्तीत जास्त विषारी, महागड्या किटननाशक व बुरशीनाशकांच्या फावाण्या केल्या जातात. त्यामुळे द्राक्ष घडांमध्ये, मण्यांमध्ये विषारी अंश आढळतात. असा माल निर्यातीत बाद/रद्द ठरवून परत पाठविला जातो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे २०१० मध्ये युरोपमध्ये क्वरंटाईन करून पाठविलेले असताना त्यातील क्लोरोमॅक्वेट क्लोराईड (Chloromequat Chloride -CCC) या विषारी घटकाच्या अधिक प्रमाणामुळे ३८५ कंटेनर द्राक्ष परदेशी (युरोप) पाठविल्यावर ८ महिन्यांनी ते बाद (Reject) होऊन भारतात परत आले. ती द्राक्ष शेतकऱ्यांना रस्त्यावर फेकून द्यावी लागली. यामध्ये शेतकऱ्यांने प्रचंड नुकसान झाले. ही देशाला मोठी नामुष्कीची बाब आहे. शेतकऱ्यांना अशा परिस्थितीतून उभे राहायचे म्हणजे तेथून सलग ५ वर्ष अनुकूल हवामान व सर्व परिस्थिती (आर्थिक दृष्ट्या) लाभली तरच शक्य होईल. परंतु ज्या शेतकऱ्यांनी रासायनिक बुरशीनाशके व किटकनाशकांऐवजी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केला त्यांनी देशांतर्गत मार्केटमध्ये, जागतिक मार्केटमध्ये एक नंबर भावात द्राक्ष विकली. हे तंत्रज्ञान फवारले तर द्राक्षामध्ये विषारी अंश (Residue) येत नाही आणि चुकून एखादी रासायनिक औषधांची फवारणी घेतली गेली असल्यास त्याचा द्राक्ष मालामध्ये असणारा विषारी अंश डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या नंतर केलेल्या फवारण्यांनी निघून जातो. ती विषमुक्त होतात. असे अनेक शेतकऱ्यांनी आम्हास कळविले. तेव्हा हे तंत्रज्ञान द्राक्ष पिकविणाऱ्या भागातील शेतकऱ्यांनी वापरावे.

ज्याप्रमाणे द्राक्षावर प्रक्रिया केल्यानंतर मुल्यवर्धन होते त्याचप्रमाणे इतर शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचा टिकाऊपणा (Shelflife), उपयुक्तता, आरोग्यता वाढवावी. प्रक्रियेमुळे वर्षभर त्याचा व्यापार चालतो. निर्यातीमुळे परकीय चलन मिळते. त्यामुळे कृषी अर्थव्यवस्था बळकट होते. रोजगार निर्मिती होऊन शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळतो. भारतीय शेतीला खऱ्या अर्थाने श्रमाच्या 'अर्था' चे पाठबळ मिळते.