व्यापारी पिकांचे निर्यात नियोजन - देशासमोरील एक मोठे आव्हान
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
कापूस निर्यात
मोसमी पावसाची सुरुवात २ महिने अशिरा झाल्याने खरिप पिकांचे नियोजन पुर्ण कोलमडले होते. कापूस पिकाच्याही अशा पुर्णपणे मालवल्या होत्या. नंतर मात्र कपाशीच्या वाढीच्या दरम्यान ऑगस्ट ते ऑक्टोबर असे पावसाने बऱ्यापैकी सातत्याने साथ दिली. अशिरा लागण केलेल्या कापसाला या पावसाची साथ लाभली. त्यामुळे उशिरा लागणीच्या कापसाचे एकरी ८ ते १० क्विंटल. उत्पादन अशी सरासरी मिळाली.
एप्रिल महिन्यात ठिबकवरील अगोदर लावलेली कपाशी ही मात्र पावसात सापडली. त्यामुळे एका वेचणीचा कापूस वाया गेला. नंतर सर्वच प्रकारच्या कापसाला लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. ज्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे तंत्रज्ञान वापरले त्यांना लाल्याचा प्रादुर्भाव झाला नाही. वेचणी सुरळीत होऊन त्यांचा कापूस 'ए' ग्रेड मध्ये गेला. सप्तामृतातील कॉटन थ्राईवर, क्रॉंपशाईनर आणि न्युट्राटोन वापरल्यामुळे कैऱ्या व बोंडे पोसण्यास मदत झाली. या कापसास ४५०० रू. क्विंटल भाव सरासरी मिळाला. गेल्यावर्षीपेक्षा ही विक्री साधारण दीड हजार रू. प्रति क्विंटल. जास्त दराने झाली. याला कारण म्हणजे पाकिस्तान व चीनमधील परिस्थिती. या दोन्ही देशातील पूर परिस्थितीने कापसाचे प्रचंड नुकसान झाले. देशातील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना चढा भाव देऊन संधीचे सोने केले. उच्चतम दर ५१०० रू. क्विंटल असा दिला गेला.
फडदड (खोडवा) चे पीक उत्तम
दिवाळीनंतर जो पाऊस झाला तो अपेक्षेपेक्षा जास्त झाला आणि कपाशीचा खोडवा (फडदड) अनपेक्षी तपणे घेणे वातावरण पोषक असल्याने शक्य झाले. महाराष्ट्रातील खानदेश, विदर्भ, मराठवाडा येथील शेतकऱ्यांनी फडदडला कल्पतरू व आवश्यक तेथे रासायनिक खतांचा व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून मोसमी हंगामापेक्षा अधिक कैऱ्या व बोंडे लागल्याचे आम्हास कळविले. त्यामुळे हंगामापेक्षा फडदड कापसाचे उत्पन्न अधिक येईल याची खात्री झाली हा या तंत्रज्ञानाचा कापूस उत्पादकांना बदलत्या परिस्थितीत नुसता आधारच नव्हे तर डबल 'बोनस' ठरला, जरी या काळामध्ये दव जादा पडले तरीही क्रॉंपशाईनरमुळे या दवाचा विपरीत परिणाम कापसाच्या बोंडांवर झाला नाही. उलट या तंत्रज्ञानाने कैरी जबरदस्त भरून कापूस दर्जेदार निर्माण होण्यास मदत होईल. अशा रितीने फडदडचे उत्पादन जास्त येऊन कापसाचा एकूण वार्षिक उतारा २० ते २२ - २५ क्विंटल. एकरी जाईल. हे प्लॉट देशातील इतर शेतकऱ्यांना उत्पादनासाठी मार्गदर्शक ठरतील. कापसाच्या तुटवड्यामुळे आणि जगातील मार्केटमध्ये मागणी वाढल्यामुळे व बदलत्या परिस्थितीमध्ये पावसाच्या अवकाळी अगमनामुळे फडदड कापसास पोषक ठरल्यामुळे खोडव्याचे उत्पादन वाढल्याने आता या कापसाच्या भावाने ६ हजाराची पातळी गाठली आहे. गेल्या ५० वर्षामध्ये अशा अभुतपुर्व बदलत्या वातावरणाचा फायदा कापूस उत्पादकांना कधीही मिळाला नव्हता. प्रकर्षाने तो आत्महत्येचा बळीच ठरला होता. मात्र या अनाकालनीय परिस्थितीत आत्महत्या करणारा शेतकरी पहिल्यांदाच सुखावला आहे. त्याच्या हातात रोख पैसा खेळू लागल्याने कापूस उत्पादन होणाऱ्या शेतीचे भाव एकरी ५ ते ७ लाख रू. झाले आहेत. शेतकरी अशा जमिनी घेण्यास उत्सुक आहे. मात्र जमिनी आता विकत मिळत नाहीत. सोन्यापेक्षा अधिक भाव जमिनीला आला आहे.
निसर्गाच्या चमत्काराने 'उत्तम नोकरी' कनिष्ट शेती' हे समीकरण बदलून 'उत्तम शेती व कनिष्ट नोकरी' हे पहिले ब्रीद वाक्य साक्षात अनुभवास येऊ लागले आहे. त्यामुळे बरेचसे चाकरमाने व्ही आर एस घेऊन नवीन जोमाने शेतीत पदार्पण करू लागले आहेत. त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वसा पुर्णपणे साथ देईलच.
केंद्रीय कृषी मंत्री ना. शरद पवार यांनी कापूस निर्यातीस होकारार्थी पाऊल टाळल्याने कापूस उत्पादक खऱ्या अर्थाने सुखी होईल. फक्त सरकारने या निर्यातीमध्ये सातत्य ठेवून ५ वर्षासाठी कापूस निर्यातीचे धोरण व्यवस्थित आखावे. म्हणजे पुढील २ - ३ वर्षात कापूस क्षेत्रात वाढ होऊन जरी उत्पादन वाढले, तरी भाव कोसळणार नाहीत व हल्लीचा ५ ते ७ हजार रू. क्विंटलचा निर्यातीचा दर देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटीचे बाहू देईल.
कांदा निर्यात
कांदा उत्पादक शेतकरी हा पारंपारिक शेतकरी असल्यामुळे कितीही तोटा आला आणि कितीही हवामानाने दगा दिला तरी कांदा लागवड तो सोडत नाहीच. खरीप हंगामातील उशीरा पावसाची सुरुवात झाल्याने लागवडीखाली न येणारे हळव्या कांद्याचे क्षेत्र हे कमी न होता ते अबाधित कसे राहील हे शास्त्रज्ञ, शासनकर्ते, विकास अधिकारी आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणाऱ्यांनी व्यवस्थित रूजवून व बिंबवुन बदलत्या परिस्थितीत उत्पादन अधिक व दर्जेदार कसे येईल हे पाहणे सामुहीक जबाबदरी ठरेल. ज्याप्रमाणे क्षार जमिनीत येणाऱ्या भाताच्या जाती, कमी पाण्यावर येणाऱ्या तांबेरा प्रतिबंधक जाती शास्त्रज्ञांनी शोधून काढल्या, त्याप्रमाणे कांद्याच्या एका पाण्यावर येणाऱ्या जाती शोधून काढण्याचे आव्हान हे जागतीक शास्त्रज्ञांनी आहे. प्रगतीशील शेतकरी श्री. पोपट जगदाळे, मु. पो. न्हावरे, ता. शिरून, जि. पुणे यांनी एका पाण्यावर नव्हे तर फक्त आंबवणी- चिंबवणीवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने उत्पादन घेतल्याचे उदाहरण देशातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक, प्रबोधन करणारे ठरले आहे. (संदर्भ - कृषी विज्ञान, जानेवारी २००५, पान नं. ८ )
ज्याप्रमाणे कांदा कमी पाण्यावर येऊ शकतो हे आम्ही सिद्ध केले आहे. कमी पाण्यावर हवामानाच्या बदलातही उत्पादन दर्जेदार येऊ शकते हे आम्ही सिद्ध केले आहे. तसे धो - धो कोसळणाऱ्या पावसात कांदा यशस्वी होतो. हे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अनुभवायचे आहे. प्लॅन्टब्रिडर्सनी (Plant Breeders) अशा दर्जेदार उत्पादन देणाऱ्या कांद्याचे बिजोत्पादन करावे. हे जगापुढे फार मोठे आव्हान आहे. येणाऱ्या काळामध्ये हे शिवधनुष्य ते सहज पेलतील. येणाऱ्या ५ वर्षात अतिपावसात येणारे कांद्याचे वाण शोधले जाऊन निर्यातीस अनुकूल असणाऱ्या गरव्या व लाल, पिवळ्या, पांढऱ्या कांद्याचे कमी तिखट असणारे विशेषता युरोपीयन देशात याला मागणी आहे, परंतु सार्क व आखाती राष्ट्रात पारंपारिक गरवा, लाल टिकाऊ तिखट कांद्याची फार मोठी मागणी आहे. तेव्ह याचे एकरी अधिक उत्पादन घेऊन त्याचा दर्जा जागतीक मागणीच्या कसोटीला कसा टिकून राहील हे पहाणे शास्त्रज्ञांना फार मोठे आव्हान आहे. नवीन तंत्रज्ञानाने निर्माण झालेले दुष्काळावर मात करणारे हळव्या कांद्याचे वाण ज्या लोकांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केला त्याचे रूपांतर गरव्या कांद्यासारखे होऊन त्याचा शेतकर्यांना फार मोठा फायदा झाला. हळवा कांदा याचा टिकाऊपणा कमी असल्याने याचे लागवडीचे नियोजन व्यवस्थित करून देशांतर्गत गरज भागविण्यासाठी अधिकाधीक वापर करावा. म्हणजे गरवा कांदा हा टिकाऊ स्वरूपाचा असल्याने याची निर्यात ही सातत्याने चालू राहून ५ वर्षाकरीता याचे क्षेत्र, उत्पादन क्षमता व भाव ही त्रिसुत्री जर जमली तर हवामानामुळे उत्पादनात होणाऱ्या जोरदार घटीमुळे जागतीक मार्केटमध्ये व देशांतर्गर गरवी कांद्याचे भाव पुढील ५ वर्षात २० ते ३० रू. किलो जरी राहिले तरी भारतीय माणसांचे उत्पन्नाचे श्रोत वाढल्याने त्यांची खरेदीची ताकद वाढली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याला एकरी १२ टन जरी उत्पादन घेता आले तरी एकरी २ लाख ४० हजारापासून ३ लाख ६० हजारापर्यंत उत्पन्न गरव्या कांद्याचे मिळून तो आनंदी राहील. निर्यात व देशांतर्गत मार्केटमध्ये या कांद्याचे भाव जर स्थिर राहिले तर काही लोकांचाच कांदा निर्यात झाला व आपला कांदा देशांतर्गतच कांदा विकला याची सल त्याला लागणार नाही. तर दुसरी बाजू परदेशातील माणसालाही हा कांदा महाग वाटणार नाही, अशा रितीने स्वार्थातून परमार्थ व परमार्थातून स्वार्थ असा दुहेरी फायदा होईल.
मानव सर्वसाधारणपणे समाधानी राहील. कांदा उत्पादन, मागणी व भावातील चढ - उतार यामुळे कोसळणारी सरकारे स्थिरावतील. अनावश्य क पुनर्निवडणुकीच्या खर्चाचा बोजा सरकारी तिजोरीवर व नंतर विविध प्रकारचे टॅक्स लावून त्याच्या वसुलीत सामान्य माणुस भरडला जाणार नाही. देशातील केंद्र सरकार. कांदा उत्पादक राज्य सरकारे, प्रशासन व शास्त्रज्ञ यांनी वर उल्लेख केलेल्या टिपणीचा बोध प्रकर्षाने घेण्यानी गरज आहे.
साखर निर्यात
सर्वसाधारणपणे मोसमी पावसाचे मान चांगले झाले आणि आदल्यावर्षी उसाला चांगला भाव मिळाला तर पुढील वर्षी उसाखालील क्षेत्र हे हमखास वाढते. उत्पादन वाढते. ऊस शेतीमध्ये कमीत कमी क्षेत्र, कमी निविष्ठा, कमी काळ, अधिक उत्पादन हाय रिकव्हरी (High Recovery) आणि सुयोग्य साखर कारखान्यांचा आकडा असणे ही यशस्वी ऊस उत्पादक शेतकरी व साखर उत्पादन करणारे कारखाने यांचे अर्थशास्त्राचे समीकरण वरच्या समीकरणावर अवलंबून राहील, साखर कारखान्यांपेक्षा नेते अधिक झाल्यामुळे आणि शुगर लॉबी राजकारणावर नियंत्रण करते असा गोड समज झाल्याने ऊस उत्पादन करण्यासाठी अनुकूल अथवा प्रतिकुल परिस्थिती असली तरी राजकीय नेत्यांमध्ये साखर कारखाने काढण्याची अहमअमिका लागली आहे. त्यामुळे तोट्यात जाणाऱ्या साखर कारखान्यांची संख्य वाढत आहे. याला अनेक कारणे आहेत. शेतकऱ्याच्या उसाला २२०० ते २५०० रू. टनाचा भाव म्हणजे त्यला किलोला २ ते २।। रू. चा भाव ही शेतकऱ्यांची रास्तच मागणी आहे. साखर कारखान्याला त्याच्या खर्चाचे नियोजन आणि उसापासून साखर निर्मिती करताना साखरेचा दर, एक टन उसाचा दर, त्यापासून मिळणारी मळी, त्यापासून मिळणारा बगॅस, स्पिरीट, अल्कोहोल, वीजनिर्मिती व अन्य सेंद्रिय उत्पादने निर्माण केल्यावर १ टन उसापासून ११२ ते १२० किलो साखर व वरील अपरीमीत जमेच्या बाजू ऊस कारखानदारांना असताना कारखाना परवडत नाही. शेतकऱ्यांना उसाचा दर देणे परवडत नाही हे म्हणणे चुकीचे आहे. कारखान्यांनी आणलेली ऊस तोडणी यंत्रे मजुरांअभावी ऊस तोडणी करण्यामध्ये येणाऱ्या अडचणीवर रामबाण ठरतील. त्यामुळे मराठवाड्यातील शेतमजुर एरवी तोट्यात जाणारा कापूस, तूर, ज्वारी इ. आपल्या पारंपारिक शेतीवर जाऊन वरील प्रमाणे उत्पादन घेऊन तेथील उत्पादनात भर टाकेल.
वरील सूत्राचा अवलंब केल्यास ३ हजार रू. टनाचा भाव शेतकऱ्यांना देऊन साखर हे बायप्रोडॉक्ट म्हणून पाहिले तर वरील अनेक प्रकल्पांमध्ये साखर ही ५० पैसे ते १ रू. किलो जी ४० - ५० वर्षापुर्वी मिळत होती ती मिळेल. कारण पेट्रोलचे दर ११ महिन्यात ११ वेळा वाढतात. आणि प्रत्यक्ष दर १८ ते २० रू. असून त्यावर ३० ते ४० रू. प्रति लिटलला टॅक्स लागतो. त्या ठिकाणी जर इथेनॉलचा वापर केला तर साखर ही १ रू. पर्यंत मिळेल. पाणी हे पेट्रोल ला पर्याय ठरून जगातील सर्व ऑटो मोटारी जर पाण्यावर चालल्या तर भारत साऱ्या जगाला अन्नधान्य पुरवेल. ही भारताची ताकद आहे. हे सर्व घडून सर्व जगभर रामराज्य यायला ५ वर्षाचा कालावधी शास्त्रज्ञांना पुरेसा आहे. सुदैवाने असे शास्त्रज्ञ भारतात आहेत. त्यांची दखल जागतीक पातळीवर घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. युनायटेड नेशन्सने होकारार्थी पाऊल टाकून मानव कल्याणाच्या गरजांवर अधिक लक्ष देणे यथार्थ ठरेल.