सौर ऊर्जेचा ब्रेक - थ्रू, विकासाचा केंद्रबिंदू
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
देशाची प्रगती ही रस्ते, पाण्याचा वापर, वीज निर्मिती व त्याचा विनियोग या गोष्टींशी
फारच निगडीत आहे. रस्त्यांमुळे दळणवळण व माल वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो. पाण्याला
जीवनच मानले आहे, तर वीज ही शेती व औधोगिक विकासासाठी मुख्य घटक ठरत आहे. इस्त्राईलसारखे
पाणीविरहीत, राजकीयदृष्ट्या घरघर लागलेले राष्ट्र ज्या ठिकाणी ४ इंचच पाऊस पडतो, अशा
ठिकाणची फुलशेती आणि फळशेती (संत्री, मोसंबी, लिंबू, द्राक्ष), गव्हाची शेती हे
मैलोगणती ठिबक किंवा तुषार सिंचनावर फार यशस्वी ठरली आहे. तेथून कृषी मालाची साऱ्या
जगभर लाखो डॉंलरची निर्यात केली जाते. हे सर्व अवलोकन आम्ही १९९६ च्या अॅग्रीटेक इस्त्राईल
प्रदर्शनात केले.
त्यावेळेचे भारताचे इस्त्राईलमधील अंबॅसेडर श्री. चंद्रशेखर व त्यावेळचे
इस्त्राईलचे कृषीमंत्र्यांनी भेट झाली तेव्हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या कार्याचे त्यांनी
तोंडभरून कौतुक केले. या राष्ट्राला एकच नदी आहे आणि भारतात एवढ्या नद्या, पाऊस भरपूर,
मुबलक सुर्यप्रकाश, पर्यावरण समृद्ध असूनही केवळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि 'आमजनतेसाठी'
शेतकऱ्यांसाठी तळमळ नसून केवळ मानव निर्मीत प्रश्न निर्माण करून आपले स्वत:चे उपद्रवमुल्य
वाढवून देशाची हाकाटी चालली आहे. त्यामुळे देशाच्या विकासामध्ये औद्योगिक कृषीपुरक
व्यवसाय आणि विजेवर आधारित पुरक उद्योग हे मुद्दाम दुर्लक्षित आहेत.
स्वातंत्र्यानंतरचा गेल्या ६० वर्षाचा जर आढावा घेतला तर असे आढळते की , खाणीतील कोळसा, नद्यांचे पाणी अडवून पाण्याच्या श्रोतांना वळवून केलेली हायड्रॉलिक वीजनिर्मिती, पेट्रोल, डिझेल हे भूगर्भीत ज्वलनशील घटक मर्यादित असून हे १० ते २० वर्षात कधीतरी संपणारे आहेत,हे समजूनही त्याची हेराफेरी करतो. याच्यावर कडी म्हणून फ्रान्स, अमेरिका, रशिया अशा अणुपरमाणू क्षेत्रात स्वत:ला पारंगत समजतात आणि ते भारतासाररव्या बलाढ्य राष्ट्राला अणुऊर्जेचा श्रोत हा परवडणारा आहे अशी पोपटपंची करून धुळफेक करून अब्जावधी डॉंलरचे प्रकल्प भारताच्या माथी संगनमताने मारतात आणि जैतापूर असो, वा केरळमधला मोठा प्रकल्प असो, पर्यावरणाचा असमतोल वाढवून त्यावर घ्यावयाच्या कर्जावरील व्याज भारताने भरून भारताने सतत कर्जाच्या डोहाच्या चक्रात अनेक अफ्रिकन राष्ट्रांप्रमाणे बुडत्याचा पाय डोहात असा करून म्हणजे भारताची ही प्रगती नसून त्यावर गेल्या ६० वर्षात झालेला खर्च हा Mile Stone (आदर्श) नसून तो Falls Stone म्हणून अधोगतीचा कळस म्हणून ६५ वर्षाच्या स्वातंत्र्याच्या काळातील देशाचे उत्पन्न आणि खर्च यातील ताळेबंद अशा (?) प्रकारचा आहे.
जपानसारखे राष्ट्र याच काळात ३ वेळा बेचिराक होऊन पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन खंबीरपणे उभे राहून जगाला दाखवले आहे. रोज भुकंपाला व त्सुनामीला ते सामोरे जाते. भारतासारख्या ५० कोटी बुद्धीमान लोकांना स्व - सामर्थ्य, प्रामाणिक कष्ट, सत्य, तारतम्य आणि सुबुद्धी विचार याची जर सांगड घातली तर भारत देश साऱ्या जगाला तारेल, मग हे सुकाणू चालले कुठे याचे कोडे उलगडत नाही. इस्त्राईल, जपान हे बेचिराक झालेले देश फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा खंबीरपणे उभे राहतात आणि भारतासारखे राष्ट्र नैसर्गिकदृष्ट्या वैविध्यपुर्ण असूनही अधोगतीकडे जाते. हे देशातील राजकारण्यांना समजून न उमजलेले कोडे (उल्झन / Puzzle) झालेले आहे. ६० वर्षाच्या काळामध्ये वीजनिर्मितीचा कधी विचार केला गेला नाही. याचा वापर शेती. आमआदमी, घरेलू, कारखानदारीसाठी किती याचे कधी त्रैराशिक मांडले नाही. यामध्ये चोऱ्यामाऱ्या आणि साठमारी अधिक झाली आणि त्यामुळे या वीजनिर्माती क्षेत्राने देशाला अधोगतीचा झटका (शॉक) दिला. यामध्ये संबंधीतांनी पोळी भाजून घेतली. शेतकरी आणि आमआदमी मात्र यामध्ये होरपळला गेला.
भारतासारख्या खंडप्राय (Tropical) देशाला ३६५ दिवसांपैकी ३०० दिवस १२ तास सौरऊर्जा अखंडप्राय सतत उपलब्ध असूनही नेते, सरकारी शास्त्रज्ञ आणि परदेशातील कंपन्या ह्या सौरऊर्जेच्या प्रकल्पावर विचार न करता अणुभट्ट्या व तत्सम अधिक खर्चात पाडणाऱ्या उद्योगात झोकून देण्यास सांगन आहेत. ही देशाला फार नामुष्कीची बाब आहे. अनेकवेळा सौरऊर्जा ही प्रत्यक्षामध्ये मुबलक, स्वस्त व विनासायास उपलब्ध असताना ती महाग कशी आहे हे पांडीत्य जावई शोधासारखे आमजनतेला ऐकविले जाते. जगभरच्या प्रामाणिक आणि दुरदर्शी शास्त्रज्ञांनी सौरऊर्जेच्या श्रोतावर त्याच्या उपलब्धेतेवर आणि ते घटक महाग आहेत असे भासविले जाते. उदा. फोटोव्होल्टाईक (सेल) हे उपकरण अजून स्वस्त झाले आहे. त्या दृष्टीने सखोल संशोधन होणे गरेजेचे आहे. म्हणजे जर सर्व जगातील शास्त्रज्ञ एकत्र आले आणि सुरूवातीचा शोध जरी महाग वाटला तरी जसजसे पर्याय, साधन - सामुग्री आणि जुळवणी व जुंपणीने अविष्काराचे श्रोत हे सुलभ आणि सहजतेने वापरण्याच्या टप्प्यात परवडणारे होतात तेव्हा काही काळ जरी ह्या गोष्टी महाग वाटत असल्या तरी जसा वेळ जातो तसे नवीन पर्यायी सुलभ, स्वस्त शोधांचे उच्च तंत्रज्ञान (Hi - Tech) श्रोत निर्माण होतात. मानवी विकासाच्या पैलुंना ज्यावेळेस चकाकी येते तेव्हा काळाच्या कसोटीवर अशा उत्पादनांचा दर्जा आणि त्याची प्रगल्भता मानवाच्या आवाक्यात येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मोबाईल होय. पाहिलं मोबाईल आला तेव्हा ताची किंमत ३२,३५ -५० हजार रू. होती आणि इनकमिंग दर हा ८ -१० रू./मिनीट होता तर आऊटगोईंग २० ते ३२ रू. /मिनिट होता. तो आता काळ जसजसा गेला तसा स्वस्त होऊन इनकमिंग पुर्णत : फ्री होऊन आऊटगोईंगचा दर २ पैसे/मिनिट एवढा स्वस्त झाला आहे. म्हणजे काळ जातो तसे लोकांना हवेहवेसे वाटणारे तंत्रज्ञान अधिक प्रगत व स्वस्त होत जाते. असेच सौरऊर्जेच्या बाबतीत आहे. सौरऊर्जेमध्ये फोटोव्होल्टाईक (सेल) हे अधिक महाग होते. ते महाग आहे म्हणून अणुऊर्जेचे प्रकल्पाचे प्यादे चालवणे हे आमआदमीच्या विकासात जणीवपुर्वक (Deliberately) टाकलेले वाकडे पाऊल हे विकासाला खीळ घालणारे आहे.
पवन ऊर्जा ही एक नवीन गुंतवणुकीचे साधन झाले आहे. त्यामुळे २ नंबरचा किंवा कमी वेळात अमाप पैसा मिळविणारे धनाढ्य उद्योगपती यांचा काळा पैसा पांढरा करण्याचे उद्दिष्ट साध्य करत आहेत. पवन ऊर्जा यंत्राद्वारे प्रत्येकी फक्त ४० मेगावॅटपर्यंत वीज निर्मीती होते. अशा परिस्थितीत देशाला अणुऊर्जेची गरज असल्याचे दाखविले जाते. मात्र त्यामुळे देशाच्या पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होऊन नैसर्गिक साधन संपत्ती, सौंदर्याचा त्याने ऱ्हास होईल.
अमेरिका, जपान, फ्रान्स, मॉरेसियस, थायलंड, सिंगापूर या राष्ट्रांचा निम्म्यापेक्षा अधिक पैसा पर्यटन उद्योगातून निर्माण होतो. कारण देशातील व परदेशातील पर्यटक तेथील नैसर्गिक वनराई, समुद्रकिनारी सौंदर्यस्थळे पाहण्यासाठी येत असतात. तेव्हा भारतातील नैसर्गिक सौंदर्य कसे अबाधित ठेवता येईल हे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी अणुऊर्जेच्या मागे न लागता सौरऊर्जा हा त्यावर फार मोठा पर्याय आहे.
जपान, अमेरिका, रशिया, फ्रान्स इटली या देशातील सौरऊर्जेचे संशोधन हे साऱ्या मानव जातीच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखे आहे. आज सौरऊर्जेच्या यंत्रणेच्या खर्चात ७० % पर्यंत घट झालेली आहे. ती काही काळाने होकारार्थी प्रयत्नांनी ७५ ते ८० % पर्यंत घट होऊ शकते. शिवाय हे सौर पॅनेल एकदा बसविल्यानानंतर ३० वर्षापर्यंत कोणताही देखभालीचा (Maintenance) खर्च येत नाही. सौरसेलचा खर्च, उभारणीचा खर्च, देखभालीचा खर्च हा सर्व शास्त्रज्ञांच्या आवाक्यात आहे आणि खर्चाच्या बाबतीमध्ये सहजतेने घेण्यासारखा आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी आय.आय.टी. त काम करणाऱ्या एका भारतीय शास्त्रज्ञाने या खर्चामध्ये भरीव बचत करून ३० ते ३५ खेड्यामध्ये परवडण्यासारखा पथदर्शक प्रकल्प स्वत:ची अमेरिकेत कंपनी प्रस्थापित करून आमजनतेला परवडेल एवढ्या रकमेमध्ये रस्त्यावरील वीज भारतात उपलब्ध केली. त्याच्या या संशोधनाला मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित केले आहे. अशा शास्त्रज्ञांनी पुढे येऊन शेती, औद्योगिक कारखाने, अंतराळ संशोधन या क्षेत्रामध्ये सौरउर्जेची निर्मिती व वापर याची सांगड जर घातली तर स्वस्त, सुलभ नैसर्गिक सौरऊर्जेचा पर्याय फार मोठा ब्रेक - थ्रू मिळणार आहे.