खरिपातील कडधान्यांचे मुल्यवर्धन

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


कापूस, डाळींब, संत्री, मोसंबी, काही प्रमाणात द्राक्ष, तृणधान्य ज्वारी, बाजरी यामध्ये जर कडधान्य (तूर, मुग, उडीद) केली तर ती चांगली येतात. मटकी, हुलगा, काही प्रमाणात चवळी ही पिके हलक्या जमिनीत येतात. मूग, मटकी, हुलगा, चवळी हे अतिशय पौष्टिक आहेत. मटकी, हुलगा, मूग हे गरीब लोकांचे अन्न आहे. हुलग्याचे माडगे बाळंतीण स्त्रियांना चालते. उन्हाळ्यात नेमक्या भाज्या महाग होतात. म्हणून घरी मटकीला मोड आणून स्वस्तातली भाजी तयार होते. याचे पोषणमूल्य चांगले आहे. मटकीचा वापर पावभाजी, मिसळपाव, ओली भेळ तसेच हॉटेल, ढाब्यावर मोठ्या प्रमाणात होतो. देशामध्ये व महाराष्ट्रात हलक्या, वरकस, मुरमाड जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत. अशा जमिनीवर जर पाऊस सकाळी पडला तर दुपारी त्या जमिनीवरून चप्पल किंवा बुट घालून सहज चालता येते. त्या मातीत फक्त चप्पल किंवा बुटाचे ठसे दिसतात, टाळीला मात्र चिखल माती लागत नाही. अशी ही अतिशय निकृष्ट जमीन मोठ्या प्रमाणात आहे. तेव्हा अशा जमिनीत कडधान्याची मुळे ही वरच्या थरात राहत असल्याने व ती काटक असल्याने आणि ५ ते १० - १२ इंच पाऊस पडतो अशा ठिकाणी याचे उत्पादन चांगल्याप्रकारे येते. कोकणामधील जमीन लोह व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अधिक असलेली असल्याने या जमिनीतील मटकी चविच्या दृष्टीने सरस व अधिक पोषणमुल्ययुक्त असते. त्यामुळे या गावरान मटकीला भाव अधिक मिळतो.

चवळीचे मुल्यवर्धन

चवळी हे अतिशय हलक्या जमिनीत येणारे पीक आहे. मृगाचे १ - २ पाऊस झाल्यावर वाफस्यावर सलग अथवा पट्टा पद्धतीत कापूस, ज्वारी व खरीप धान्यवर्गीय पिकामध्ये घेता येते. चवळी हे पीक इतर कडधान्याच्या मानाने झपाट्याने वाढणारे असून याची पाने ही गर्द हिरवी, अधिक हरितद्रव्य निर्माण करणारी असतात. खेडेगावात शेळीला गरिबांची गाय असे संबोधले जाते अशा शेळ्यांना किंवा दुभत्या जनावरांना दूध वाढीसाठी, वासरांच्या वाढीसाठी तसेच जाड कामाच्या बैलांना हा चारा अधिक पौष्टिक असतो. ज्यावेळेस याचे शेंडे मारावे लागतात तेव्हा ते शेंडे करडांना व वासरांना दिले असता ते अतिशय उपयुक्त पौष्टिक खाद्य ठरते. याची लागवड दोन ओळीत १।। ते २ फूट व २ झाडात १ फुट अंतरावर करावी लागते. त्याच्या हिरव्या शेगांना बाराही महिने भाव असतो. इतर कडधान्यांच्या ओल्या शेंगांच्या मानाने चवळीच्या ओल्या दाण्यांचे पोषणमुल्य अधिक असल्याने ३ वर्षाच्या आतील लहान मुलांना व बाळंतीण स्त्रियांना याची शेंगदाणे लावून केलेली भाजी पोषक आणि पाचक असते. ओल्या चवळीचा भाजीचा गरोदर व बाळंतीण स्त्रियांच्या आहारात समावेश करावा. त्यामुळे नवजात बालकाला दूध भरपूर मिळते. त्यामुळे वरच्या दुधाची आवश्यकता राहत नाही. नवजात बालकाला जर्सी, होलेस्टीयन फ्रिजीयन गाईचे दूध देऊ नये. वाटल्यास देशी किंवा गिर गाईचे दूध द्यावे.

सुकलेल्या चवळीचे दाणे पचण्यास जड असतात. गरोदर बाळंतीण स्त्रिला ते देवू नयेत. याने गॅसेस होतात. परंतु बाराही महिने हलक्या जमिनीत अल्पभुधारकाला ही लागवड फायदेशीर ठरते. शक्यतो प्रस्थापित स्थानिक वाण हे अनेक वर्षे त्या हवामानात व जमिनीत स्थिरावलेले व उन्नत झालेले असल्याने ते पौष्टिक, सकस ठरते. म्हणून विकास अधिकारी, कृषी सहाय्यक, संचालक, संचालक, उपसंचालक, ग्रामसेवक, मामलेदार, जिल्हा अधिकारी यांनी ग्रामीण पातळीवर काम करताना शेतकऱ्यांचे स्थानिक वाण उन्नत करून त्याचा प्रसार व त्याचे वाटप करावे. संकरित बियाणे हे महाग आणि आपल्या जमिनीस संयुक्त्तीक नसल्याने त्याचा वापर शक्यतो टाळावा.

पावसाळ्यात जेव्हा आभाळ येते, थंडीत धुके येते व सुर्यप्रकाश कमी असतो चवळीच्या शेंड्यावर फुलांच्या आगऱ्यावर काळा मावा येतो. याकरिता प्रोटेक्टंटचा वापर करावा. म्हणजे माव्याचे नियंत्रण होऊन मिळणारे उत्पादन विषारी होत नाही. तसेच सप्तामृताच्या २५० मिली, ५०० मिली, ७५० मिली अशा पहिली पीक वाढीच्या काळात, दुसरी फुल लागण्याच्या अवस्थेत आणि तिसरी शेंगा पोसण्याच्या अवस्थेतील वापराने चवळीचे उत्पादन २ ते ३ महिने चालू राहते आणि ५ ते १० गुंठ्यामध्ये १५ ते २० हजार रु. सहज मिळतात. तसेच हे पीक नुसते कडधान्य नसून मुळांवर हवेतील जैविक नत्र स्थिरीकरण होत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. स्त्रियांचे आरोग्य सुधारते. लहान मुलांची शरीरयष्टी बळकट करते. दुधाची गरज भागवते.

व्यवस्थित नियोजन व डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर केला तर याचा पैसा कामधेनूसारखा किंवा 'एटीएम' सारखा मिळतो. ही हिरवी चवळी बलवर्धक, शक्तीवर्धक व आरोग्यवर्धक असल्याने आजार होत नाही. चवळीच्या बेवडावर रब्बीत गव्हाचे पीक चांगले येते. कडधान्यावर रब्बीत पुन्हा कडधान्य पीक उदा. हरबरा घेऊ नये. जर रब्बीत हरबरा घेतला तर त्यावर खरीपात उडीद, मूग, तूर घेऊ नये. मात्र हरबऱ्यावर कुळीथ (हुलगा), मटकी ही २।। ते ३ महिन्यात येणारी अत्यंत हलक्या फफुटायुक्त जमिनीत, हलका शिडकायुक्त पाऊस आणि गांडूळखत किंवा कल्पतरु सेंद्रिय खतावर अतिशय जोमाने हे पीक हरबऱ्यावरदेखील येते. तूर, उडीद, मूग यावर रब्बीत हरबरा न घेता रब्बी ज्वारी, गहू ही पिके घ्यावीत.

श्रावणी मूग

४५ दिवसामध्ये येणार श्रावण महिन्यातील मूग महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशमध्ये घेता येतो. हे एक अतिशय उपयुक्त कडधान्य सर्वदृष्ट्या म्हणजे पोषणमुल्य असल्याने आजारी असलेल्या माणसाला याची भाजी, खिचडी, लहान मुलांना याच्या डाळीचे वरण, ज्या लोकांना तुरीची डाळ वर्ज्य म्हणजे वात, पित्त आणि कफ प्रकृती असलेल्या लोकांना मुगाच्या डाळीचा वापर हा अतिशय तारक व उपकारक ठरतो. तेव्हा पावसाळी मूग जो मृगामध्ये लावला व २ - ३ पाऊस झाले आणि त्याला १ ते २ पोते कल्पतरू सेंद्रिय खत व २०० ते ५०० किलो गांडूळ हे जर दिले आणि जर्मिनेटरची बिजप्रक्रिया करून मूग पेरला तर ८ दिवसात अतिशय उत्कृष्ट उगवून येतो. त्यानंतर सप्तामृत २५० मिली + १०० लि. पाणी, ५०० मिली + १५० लि. पाणी आणि ७५० मिली + २०० लि. पाणी असे पहिला स्प्रे पीक २५ दिवसाने असताना वाढीसाठी, ३५ ते ४० दिवसात पीक फुलोऱ्यात असताना आणि ५५ ते ६० दिवसात शेंगा भरताना असे ३ स्प्रे दिले असता हा मूग श्रावण महिन्यात काढणीस येतो. म्हणून त्याला 'श्रावणी मूग' म्हणतात. तर वैशाखात काढणीस येणाऱ्या मुगास 'वैशाखी मूग' म्हणतात. या दोन्ही प्रकारातील मूग हिरवा असतो. शेंगा लांब, १२ ते १५ दाण्याच्या असतात. एरवी आखुड शेंगामध्ये ६ ते ८ पिवळसर, टणक दाणे असतात. त्याचा दाणा बारीक असतो. अशा मुगाची डाळ बारीक होते. याचे उत्पन्न कमी येते, कारण ह्या शेंगा गुच्छात येत नाहीत. सप्तामृताने दाणे वजनदार, पौष्टित व उत्पन्नाला साथ देतात.

मुगाचा दुसरा उपयोग म्हणजे जे लोक स्थुल (Obesity) असतात त्यांना मूग रात्रभर भिजवून ओल्या फडक्यात बांधून मोड आलेले धान्य अतिशय पौष्टिक असते. हे मोड आलेले मूग, मटकी यांचा सकाळच्या न्याहरीत वापर करण्यास डॉक्टर (वैद्य) शिफारस करतात. म्हणजे शरीराचा स्थूलपणा ६ महिन्यात कमी होऊन माणूस सडपातळ, दक्ष, तल्लख, चपळ, सुद्दढ बनतो.

मुगाचे मुल्यवर्धन

मुगाची डाळ करणे सोपे असते व ही डाळ साध्या मुगापेक्षा अधिक पोषणमूल्ययुक्त असते. पोपटी व हिरवे कवच तंतुमय (Fiber) असल्याने बद्धकोष्टता होत नाही. या डाळीचा उतार चांगला असल्याने मूग आणि डाळ यांच्या भावात फार फरक नसतो. इतर कडधान्यात जसे २५ ते ३० रु. चा फरक असतो. तो मूग व डाळ याच्यामध्ये १० ते १५ रु. चा फरक असतो. महिला बचत गटामार्फत याची छोटी - छोटी पाकिटे करून विक्री केली असता गृहिणीला आर्थिक दुय्यम पाठबळ मिळू शकते. मोड आलेल्या मुगाचा वापर पाणीपुरीच्या भाजीत केला जातो. ज्यावेळेस सहलीला जातात तेव्हा पातळ पदार्थ नेणे शक्य होत नाही तेव्हा मोड आलेल्या मुगामध्ये टोमॅटो व चटणी टाकून केलेली भाजी ब्रेड, चपाती सोबत खाण्यास उपयुक्त ठरते. ऑस्ट्रेलिया खंडासारख्या देशामध्ये मोठ्या शहरात मोड आलेले मूग याच्या पोषणमुल्यामुळे मोठ्या प्रमाणात वापरले जातात. तेथे डबाबंद मोड आलेले मूग हे प्रचलित आहेत. तेव्हा याची निर्यात करून भारतीय शेतकऱ्याला एक मूल्यवर्धनाचा पर्याय उपलब्ध होतो.

मोठ - मोठे फरसाणाचे कारखानदार मुगाची तळलेली डाळ वेगवेगळ्या सुबक पॅकिंगमध्ये पॅक करून विकली जाते. अशी डाळ २ - ३ महिने चांगली राहते. याला अॅल्युमिनीयमी फॉईलच्या पाकीटात चांगल्या अॅकिंगमध्ये ५० ग्रॅम, १०० ग्रॅम, २५० ग्रॅम अशा पाऊचेसमध्ये मध्यम आणि अधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये जेथे मॉल, किराणा दुकान असते अशा ठिकाणी याचा खप चांगला राहतो. मुगाच्या डाळीचे धिरडे हे आजाऱ्याला पाचक असते. साधारण मध्यम वर्गीय, उच्च वर्गीय लोकांमध्ये नाष्ट्याच्या प्रकारात खोबऱ्याच्या चटणीत याचा वापर केला तर भाजीची गरज राहत नाही. निरनिराळे समारंभात (लग्न, पार्ट्यांत) मुगाच्या डाळीचा तुप टाकून केलेला शिरा हा एक प्रतिष्ठीत पदार्थ असतो. गाजराच्या हलव्याप्रमाणे हा शिरा (हलवा) आवडीने खाल्ला जातो. अशा प्रकारे मुगाचे मुल्यवर्धन होते. मूग, मटकी, तूर काढणीनंतर त्याचे कड दुभत्या जनावरांना आवडते. म्हणजे जेव्हा पेंड महाग असते. हल्लीच्या काळात सरकी पेंड, शेंगदाणा पेंड जनावरांना देणे परवडत नाही. शेंगदाणा पेंडीचे तेल काढल्यावर सॉलवंट वापरून तेल काढून ही पेंड परदेशात लहान मुलांच्या पुरक डबाबंद खाद्यपावडर पदार्थात वापरली जाते. तेव्हा असे काड जनावरांना पौष्टिक ठरते.

अशा पद्धतीने कमी पाण्यावर, हलक्या जमिनीत, कमी काळात शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात ही पिके एटीएमसारखे काम करतात. त्यातून घरखर्च, मुलांची शाळा, फी, पुस्तके यांचा खर्च भागतो.

तुरीचे मुल्यवर्धन

तूर हे जे पीक आहे त्यामध्ये अनेक जाती आहेत. यामध्ये हळवी, मध्यम गरवी व गरवी असे प्रकार असतात. एक अनुभव असा आहे की, जी गरवी तूर आहे तिची डाळ ही गोलाकार, फुगीर, लालसर, फिक्कट ते चमकदार, वजनदार असते. या तुरीचे उत्पन्न अधिक येते. डॉ. बावसकर टेक्नॉलॉजीने ७ ते १० - १२ क्विंटल पर्यंत उत्पन्न देऊ शकते. तुरीला ढगाळ हवा, झिमझिम पाऊस व अधिक पाऊस चालत नाही. कारण अशा वातावरणात पाने जर वाढली तर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. ही तूर उंच वाढते. फांद्या भरपूर, पाला हिरवागार असून ५५ ते ६० दिवसात फुल लागते. फुल लागले की लगेच शेंगा गुच्छात लागतात. ही तूर जातीपरत्वे ९० दिवसापासून १२० ते १४५ दिवसात तयार होते. या तुरीचा दाणा भरीव असतो. जूनमध्ये पेरली तर ऑगस्टमध्ये फुल लागून ऑक्टोबरमध्ये वाध्य लागतात आणि दिवाळीत शेंगांचे दाणे भरतात. ओल्या शेंगांच्या दाण्यांची भाजी करतात. ती खेडेगावात प्रसिद्ध असते. ती भाकरीबरोबर चवीने खातात. ओल्या शेंगा ह्या उकळत्या मिठाच्या पाण्यात मिसळून उकडल्यावर चविष्ट लागतात. तालुक्याची शहरे, जिल्ह्याची शहरे येथे अशा ओल्या शेंगा ४० रु. पासून ८० रु. किलो भावाने विकल्या जातात. संदर्भ: श्री. सुदर्शन संभाजी कोलते, मु. पो. कोथळे, ता. पुरंदर, जि. पुणे. या प्रगतीशील तरुण शेतकऱ्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या एकाच फवारणीत आलेल्या तुरीच्या ओल्या शेंगा मुंबई मार्केटला ४० रु./ किलो भावाने विकून २० गुंठ्यातून ८० हजार रु. मिळविले.

ह्या तुरीला साधारण फुल लागण्याच्या काळात बारीक पाऊस, धुके असते तेव्हा बुरशी भुरी आणि फुलांना कीड लागते. पाने खाणाऱ्या आळीचा व शेंगा भरू लागल्यावर शेंगा पोखरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव होतो. तेव्हा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भुरीसाठी हार्मोनी व आळीसाठी प्रोटेक्टंट व स्प्लेंडरचा वापर करावा. म्हणजे कीड - रोगाचे नियंत्रण होऊन फुलांवर मधमाश्या अधिक येऊन पीक उत्पादन अधिक व सकस येईल. सेंद्रिय उत्पादन झाल्याने अशा तुरीच्या डाळीला जागतिक मार्केटमध्ये भाव मिळेल आणि मुल्यवर्धन होईल व अशा मुल्यवर्धनाची गरज देशाला आहे. तेव्हा असे शेती उत्पादनाचे मुल्यवर्धन करून त्यातून पैसे मिळतील.

विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागात कापसाच्या पट्ट्यात तुरीचे पीक घेतले जाते किंवा इतर पिकात सुद्धा याचे पीक फक्त खरीपात घेतले जाते. परंतु जसे वैशाखी मूग उन्हाळ्यात घेतला जाते त्या पद्धतीने तुरीचा खोडवाही उत्पादन देतो. सौ. विजया कुलकर्णी सोलापूर, यांनी खरीपातील तुरीचे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने अधिक यशस्वी उत्पादन घेऊन त्याचा खोडवा घेऊन परत २ महिन्याने त्याला शेंगा लागल्या. अशा रितीने खोडवा यशस्वी करून दाखविला. तेव्हा अशा पद्धतीने तुरीची वर्षातून २ पिके मिळू शकतात. यामध्ये तिसरे पीक घेण्यावर अजून प्रयोग करावेत. सरीच्या दोन्ही वरंब्यावर हे पीक लावून मधल्या सरीतून किंवा ठिबकने ताशी ३ लि. डिसचार्ज हा आठवड्यातून २ वेळा असे या पिकाला ३ - ४ संरक्षीत पाणी दिले तर खरिपापेक्षा खोडव्याचे उत्पादन चांगले येते असा प्रायोगिक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. असे कमी खर्चात अधिक उत्पादन व मुल्यर्धन होईल असे प्रयोग करावेत. या तुरीला लागवडीच्या वेळी कल्पतरू खताच्या २ बॅगा आणि फुलावर आल्यावर २ बॅगा अशी खत मात्रा देऊन सप्तामृताची ४ फवारे केले की या तुरीला लाग भरपूर लागून दाण्यांचे पोषण होऊन गोलाकार, वजनदार, भरीव दाणे मिळाल्याने याचे डाळ हिरवी होत नाही. त्यामुळे कमी डाळीत अधिक लोकांचे जेवण होते.

तालुका, जिल्हा पातळीवर मुल्यवर्धनाची प्रक्रिया उद्योगाची ट्रेनिंग सेंटर ३० दिवसाची ते ६ महिन्याचे कोर्सेस करावेत. मुल्यवर्धनाची साखळी ही कायम झाली पाहिजे. निरुपयोगी शिक्षण न घेता व्यवहारी शिक्षण घ्यावे. येथे ट्रेनर्सला रोजगार मिळेल व ट्रेनर्स चांगले निर्माण झाल्याने चांगल्याप्रकारे व्यवसाय करतील. पैसा, खर्च याचा ताळमेळ राहील. नोकरीमध्ये मर्यादीत क्रयशक्तीमुळे सर्व गरजा पुर्ण न होता त्या पुढच्या महिन्यात बघु, त्याच्या पुढच्या महिन्यात बघु असे म्हणत कर्ज घ्यावे लागते. मात्र छोट्याछोट्या व्यवसायातून व्यवहारी फायदा मिळाल्याने त्यांना मानसिक समाधान लाभेल.