भात पिकाचा इतिहास व विविध पिकांचे पावसानंतरचे नियोजन
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
जगातील ६ अब्ज लोकसंख्येमधील ४।। ते ५ अब्जहून अधिक लोकांचे प्रमुख अन्न भात हे आहे.
भात या महत्त्वाच्या अन्नधान्य पिकाचा इतिहास पाहिला तर भात या पिकाची उत्पत्ती कशी
झाली याची माहिती कायम धूसर किंवा अंधारात राहिली आहे. भात या पिकाचा शोध केव्हा लागला
हे आज तागायत निश्चित माहित नाही. तसे पाहता भात हे उष्ण कटीबंधातील पीक नव्हे,
परंतु ओलसर आणि आर्द्र हवामान लाभलेल्या आशिया खंडामध्ये
कोठेतरी या जंगली गवताचा (भात पिकाचा) उदय झाला असावा आणि नंतर काळाच्या ओघात या पिकाचा
प्रसार साऱ्या जगभर झाला. विचारवंतांच्या दृष्टीकोनातून भात पिकाचा उगम अनुक्रमे म्यानमार
आणि ब्रम्हदेशामध्ये असलेल्या इरावेट्टी आणि मिकॉग या नद्यांच्या सुपीक जमिनीच्या प्रदेशात
झालेला आढळतो. तर काही विचावंतांच्या तर्कानुसार भात या पिकाची उत्पत्ती
दक्षिण भारतात होऊन नंतर त्या पिकाचा प्रसार
उत्तरेत पसरला. भारतातून
नंतर या पिकाचा प्रसार अनुक्रमे चीन, कोरीया, फिलिपाईन्स येथे इ.स.पूर्व २००० वर्षापुर्वी
आणि इ.स. पूर्वे १००० वर्षापूर्वी जपान व इंडोनेशिया येथे या जंगली गवत (भात) पिकाची
आयात करीत असत.
पुर्वीच्याकाळी मानव दगड आणि लोहापासून बनविलेल्या तिक्ष्ण हत्यारापासून मांस तोडून कच्चेच खात असत. त्यानंतर जंगलात गारगोटीवर गारगोटी घासली जाऊन त्यातून ठिणगी पडली व वणवा पेटला. त्यामध्ये काही वन्यप्राणी भाजून मेले व ते मांस त्यांच्या खाण्यात आल्यावर त्याची चव कच्च्या मांसापेक्षा रुचकर लागल्याने भाजून अन्न खाण्याचा शोध लागला. ज्यावेळेस कापसाचा शोध नव्हता तेव्हा काठशेवराचा (बुढ्ढी के बाल) याचा कापूस अतिशय मुलायम असून हा शे - दिडशे वर्षापासून आखाती राष्ट्रात प्रसिद्ध आहे. म्हणजे यापासून ज्या अशा बनवितात त्यामध्ये सतत गारवा राहतो. ती उशी मऊ, मुलायम असल्याने डोक्याखाली घेतली असता डोक्याचा आकार घेते. त्यामुळे आखाती राष्ट्रात जेथे वर्षातील नऊ महिने ५० हून अधिक तापमान असते व तेथे मसालावर्गीय व मांसाहार प्रचलित असल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. तेव्हा काठशेवराच्या उश्या, गाद्या - गिर्द्या ह्या गारवा निर्माण करत असल्याने त्या आखाती राष्ट्रात वरदान ठरल्या आहेत. उन्हाळ्यात या उशा, रजया, गाद्या गारवा देतात. पण भारतात ह्या थंडीत वापरल्यास सर्दी होते. अशा या काठशेवराचा कापूस जेव्हा २ गोरगोटीवर ठेवून गारगोटीवर गारगोटी घासली की अग्नीचा शोध लागला व त्यावरून अग्नीचा वापर मानव अन्न शिजविण्यासाठी करू लागला. त्याकाळी तृणधान्यवर्गीय भात हे पीक जंगलात पडणाऱ्या पावसावर येत असत. विशेषेकरून भात हा विस्तवावर उकळलेल्या गरम पाण्यावर शिजविला जात असे व त्याकाळी हा भात नुसताच खात असतील किंवा त्याबरोबर एखाद्या पशुपक्ष्याचे मांस खात असत. भाताचे जगात सर्वात जास्त क्षेत्र आशिया खंडात आहे. भारतात बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि दक्षिण भारतात असून येथील लोकांचे मुख्य अन्न भात, सांबार व रसम आहे. दक्षिण भारतात थाळी घेऊन भात खाण्याची सवय आहे. आपल्याकडे जेवण वाढत असताना अन्न पुरेसे वाटल्यावर नको असल्यात ताटावरून हात आडवा हालवतात, तर दक्षिण भारतात ताट, प्लेट अथवा थाळीपासून आपल्या उजव्या हाताचा तळवा ज्या उंचीवर ठेवला जातो तिथपर्यंत भाताची शिग लावली पाहिजे एवढा भात वाढावा अशी पद्धत आहे. आपल्याकडील एका कुटुंबाचा भात तेथील एका माणसाचे खाद्य असते.
बऱ्याच शतकापूर्वी दक्षिण भारतमध्ये गरीब लोकांचे प्रमाण जास्त व रोजगार कमी असल्याने रोजगाराच्या बदल्यात तेथे भात देत असत. शक्यतो जाडा - भरडा (Coarse) भात न पॉलिश केलेला असा परंतु जीवनसत्त्वयुक्त असा बालमजूर व पालक आई वडीलांना १ ते २ शेर उकडा तांदूळ उकळून त्याची पेज सकाळी नाष्टा म्हणून घेतात. हे लोक फटाका किंवा काडीपेटीच्या कारखान्यात काम करीत असत व दुपारी राहिलेला अर्धवट शिजलेला भात पेज काढल्यानंतरचा त्यावर थोडे पाणी टाकून पुन्हा शिजवून दुपारी खात. हाच उदर निर्वाह रात्री होत असे. अशारितीने दक्षिण भारतातील भात हे 'मुख्य अन्न' आहे.
उत्तर भारतातील ४० ते ५० कोटी लोकांचे मुख्य अन्न गहू हे आहे. म्हणजे देशातील जवळजवळ ९० कोटी लोक हे भातापासून विविध प्रकारचे अन्नपदार्थ करून आपल्या जेवणात आहार म्हणून समाविष्ट करतात. तिच गत जगातील ९०% (५४० कोटी) लोक आपल्या आहारात भाताचे निरनिराळे पदार्थ (उप्पम, इडली, डोसा, उताप्पा, पापड, कुरडया) तयार करून वापरतात. अशाच प्रकारे ७ ही खंडात भाताचे पीक हे मुख्य पीक आहे. तेव्हा जगामध्ये सर्वात अधिक संशोधन भातावर होणे गरजेचे आहे. असे युनो (United Nations Organization) व जागतिक अन्न व कृषी संघटना (F.A.O. - Food and Agriculture Organization Of the United nations) या जागतिक संस्थांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी फिलीपाईन्स येथील मनीला येथे आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्राची १३ एप्रिल १९६० साली स्थापना केली. हे सारे लक्षात घेऊन भारतामध्ये ओरिसातील कटक येथे भाताचे संशोधन केंद्र ५ मार्च १९७४ साली स्थापन केले. येथे भातात असणारे पोषणमुल्य पिष्टमय पदार्थ, शर्करा व प्रथिने यामध्ये वाढ होण्यासाठी चिकाटीने प्रयत्न केला जातो. तसेच लवकर येणाऱ्या जाती, विविध हवामानात व वेगवेगळ्या जमिनीत अधिक उत्पादन देणाऱ्या जातींवर तसेच कीड, रोग अशा अनेक बाबींवर जगभर भातावर संशोधन चालते. भारतामध्ये ओरिसा, बिहार, बंगाल, उत्तरप्रदेशचा काही भाग हे पारंपारिक भात निर्मिती करणारे प्रदेश आहेत. स्वातंत्र्याच्यापुर्वी अखंड पंजाब म्हणजे आताचा पश्चिम पाकिस्तान आणि पुर्व पंजाब हे प्रामुख्याने उत्कृष्ट गहू पिकविणारे राज्य होते. स्वातंत्र्यानंतर म्हणजे २० व्या शतकाच्या ५ - ६ व्य दशकात बासमती या वाणाची निर्मिती झाली. थोडक्यात माणसाला उत्पन्नाचे स्रोत वाढतील तसे भाताचे विविध प्रकार, त्याच्या दाण्याची लांबी, जिवनसत्वे, त्याची चव, आरोग्य आणि अन्नातील प्रमुख घटक जसे पिष्टमय पदार्थ, शर्करा, जिवनसत्व यातील होणारे बदल हे संशोधनातून नवनिर्मितीकडे वळतील व मानवाची गरज भागेल.
अशा या मानवाच्या मुख्य अन्न असलेल्या भातासाठी आम्ही 'धान थ्राईवर' ची निर्मीती केली. देशातील भाताच्या विविध जातीसाठी मग त्या पेर भात असो. लागणीच्या भात असो, सुगंधी भात असो, लांब दाण्याचा वा विविध सुगंधी जाती अथवा ज्यांना जी. आय. ही संज्ञा प्राप्त झाली आहे अशा जाती आणि विविध राज्यातील जाती यासाठी उपयुक्त आहे. त्याचे माहितीपत्रक व फवारणीपत्रक आम्ही गेल्या २ महिन्यापासून कृषी विज्ञानमध्ये समाविष्ट केले आहे ते आपण पाहिले असेलच व आपल्या भात पिकासाठी धान थ्राईवरचा व डॉ. बावसकर तंत्रज्ञानाचा वापर केला असेलच, नसल्यास भातासाठी त्याचा जरूर वापर करावा. हवामान व पावसाचे मान जर चांगले असेल व विशेषेकरून ओंबी भरताना आवश्यक असणारा पाऊस झाला आणि वेळच्यावेळी या धान थ्राईवरचा वापर केला असता चांगले उत्पादन येते. तेव्हा विशेषेकरून कोकण, कोल्हापूर, विदर्भातील भात पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनी धान/भात पिकासाठी त्याचा वापर करावा. त्याच्या प्रमाणाचा टेबल याच अंकांत पान नं. २६ - २७ वर दिला आहे. तसेच भारतातील भात पिकविणाऱ्या राज्यांनी त्याचे अवलंबन तथा अनुकरण करावे. डॉ. एम. एस. स्वामिनाथन फाऊंडेशन चेन्नई येथे प्रयोगशील संशोधन प्रक्षेत्रासाठी हे 'धान (भात) थ्राईवर' आम्ही त्यांना पाठविले आहेत.
भारताच्या विविध भागामध्ये विपुल आणि विस्तृत असा पाऊस झालेला आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत चालूवर्षी भात, कडधान्य तृणधान्ये, तेलबिया यांच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.
अधिक पाऊस पडल्यावर पिकाची घ्यावयाची काळजी व निगा
बऱ्याच ठिकाणी पूर आणि महापुराने तृणधान्य आणि कडधान्ये ही पिके पावसाने पिवळी पडली आहेत. पावसाने जमिनीतील पोकळी कमी होऊन पाणी साठले आहे. हीच गोष्ट द्विवर्षीय, बहुवर्षीय फळ पिके, खरीपातील तृणधान्य, कडधान्य, तेलबिया पिके, वार्षिक फुलपिके यांच्या देखील समस्या एकच आहेत. पाऊस जास्त झाल्याने जमितीतून पाण्याचा निचरा न झाल्याने पांढरी मुळी झाली आहे. तेव्हा त्या मुळीची वाढ होण्यासाठी आळवणीमध्ये ठिबकमधून १०० लि. पाण्यातून जर्मिनेटर १ लि. आणि २०० ते ३०० मिली हार्मोनी यांचा बुरशीजन्य व इतर जिवाणूयुक्त रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधक इलाज करावा. म्हणजे मुकी झालेली पांढरी केशाकर्षक मुळी मोकळी होऊन पाण्याचा निचरा होईल. अशारितीने सर्व पिकांमध्ये हरितद्रव्य चांगले वाढून कॅनॉपी चांगली वाढेल. त्यामुळे रोगराई प्रतिबंधात्मक स्थिती निर्माण होईल. जमिनीतील निचरा वाढल्याने सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यासाठी कल्पतरू खत फळझाडांना प्रतिझाड १ ते २ किलो ते बहूवर्षिय (१५ वर्षाच्या पुढील) उदा. आंबा झाडांना ५ किलो वापरावे व सप्तामृताची १ फवारणी घ्यावी. म्हणजे याने कॅनॉपी वाढेल व काडी तयार होईल. फुल व मोहोर निघण्यास उपयुक्त होईल. बुरशी येऊ नये म्हणून तसेच आले - हळदीचे गड्डे सडू नयेत म्हणून जर्मिनेटर १ लि., प्रिझम १ लि., कॉपरऑक्सीक्लोराईड १ लि. सोबत हार्मोनी २०० ते ३०० मिलीचा आळवणीमध्ये १०० लि. पाण्यातून वापर करावा. व फवारणीमध्ये सप्तामृतात हार्मोनी ३०० मिली घेणे.
द्राक्षाला डिसेंबरमधील निर्यात मार्कट मिळण्यासाठी अर्ली छाटणी घेतात. या अर्ली छाटणीमध्ये मात्र घड जिरतात. म्हणून छाटणी केल्यावर १२ व्या दिवशी थ्राईवर व न्युट्राटोन प्रत्येकी ५ मिली/लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारावे. म्हणजे घड जिरण्याची संभाव्य विकृती येणार नाही.
विविध प्रकारच्या १०० हून अधिक पिकांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञ आणि विक्रेते प्रतिनिधी यांना आपल्या प्लॉटवर बोलावून प्रत्येक्ष पीक पाहणी करून आणि जमल्यास त्याचे फोटो मुख्य कार्यालयास Whats app द्वारे पाठवून तसेच जमिनीचे (मातीचे) पृथ्थ:करण करून ८ दिवस अगोदर वेळ घेऊन अहवाल प्रत्यक्ष घेऊन भेट घ्यावी, म्हणजे योग्य प्रकारे मार्गदर्शन करता येईल. अशारितीने खरीप पिके लवकर येतील व रब्बी पिके वेळेवर घेता येतील.
पहाट (Dawan Of Life)
शेतकरी, विकास अधिकारी, शाश्त्रज्ञ, सेवाभावी संस्था, कृषी विकास शिक्षण, जंगल, सहकार यामधील तज्ञ मंडळींसाठी 'पहाट' या नावाने मराठीत व 'The Dawn Of Life' हे इंग्रजी सदर ७ ते १० - १२ मिनिटांचे दर गुरुवारी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या वेबसाईटवर (www.drbawasakar.com) आपणास नवनवीन अत्यंत उपयुक्त अशी व्यवहारी माहिती ही आपल्या रोजच्या कामामध्ये व व्यवहारात उपयुक्त ठरावी व देशकल्याण होण्यासाठी मुद्दाम सुरू केले आहे. ते आपण ऐकावे व त्यातील केलेल्या सुचनांचा वापर व कृषी क्षेत्रात अवलंब करावा.

खरीप लागवड (लाख हेक्टरमध्ये) | ||
पीक | २०१५-१६ | २०१६-१७ |
भात | ३३४.२६ | ३४६.३८ |
कडधान्ये | १००.५७ | १३६.०४ |
तृणधान्ये | १६७.६९ | १८०.२० |
तेलबिया | १६८.४९ | १७५.४९ |