सिद्धिविनायक शेवगा - एक्सपोर्ट मार्केट
श्री.सुरेशकुमार सलादे
मु.पो. वडनेरभैरव, ता.चांदवड, जि.नाशिक
फोन:०२५५६-२७५७६५
मो.९४२२२४६३८८
निर्यातीमध्ये पहिल्याच तोड्याचे ७० हजार रू.
नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव या गावचे प्रयोगशील तरुण शेतकरी, समाज आणि शेतकर्यांच्या विकासासाठी सातत्याने धडपडणारे कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार सुरेशकुमार सलादे यांनी एक नवा प्रयोग म्हणून आपल्या शेतात शेवगा लावला. तो प्रयोग खुप यशस्वी झाला. सलादेंनी शेवगा निर्यातही केला. त्यांची यशकथा त्यांच्याच शब्दात.
मी पत्रकार, शिक्षक, विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांचा प्रतिनिधी आहे. त्यांमुळे स्वतःच्या शेतीकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. सर्व व्यापातून मिळालाच वेळा तर शेतीकडे लक्ष अन्यथा सामाजिक कामातच दंग
महाराष्ट्र राज्यातील पहिले कृषी वाचनालय वडनेरभैरव, ता.चांदवड, जि.नाशिक येथे चार वर्षापूर्वी सुरू केले. तज्ञ व्यत्कींचे मार्गदर्शन मिळावे म्हणून व्याख्यानमाला चालविली. अनेक शेती निष्ठांची, शेतीतज्ञांची व्याख्याने आयोजित केली. त्यातच डॉ.वि.सु.बावसकर (सर) यांचेही व्याख्यान आयोजित केले. वडनेरभैरवचा द्राक्ष व टोमेटो उत्पादक शेतकरी २१ व्या शतकात पोहोचलेला शेतकरी असल्याने डॉ.बावसकर सरांच्या व्याख्यानमालेला अपेक्षेपेक्षाही जास्त गर्दी झाली. सरांनी कृषी विज्ञान मासिक माझ्या हाती दिले. आयोजकांना एक भेट म्हणून.
वेळ मिळाल्यानंतर मी ते मासिक वाचले आणि 'लावा शेतात शेवगा मोरिंगा, तुमच्या भोवती पैसा घालील पिंगा!' या घोषवाक्याने लक्ष वेधून घेतले .सरांच्या मार्गदर्शनाखाली व प्राप्त परिस्थितीनुसार मी निचरा होणाऱ्या एक एकर जमिनीत ९ x ९ फुट अंतरावरती शेवग्याची लागवड केली. दोन एकर द्राक्ष बागेसाठी ड्रीप करताना शेजारीच असणाऱ्या शेवगा शेतातही ड्रिप केले. ९ x ९ फुट असे अंतर ठेवण्याचा उद्देश हाच की जर शेवगा फेल गेलाच तर त्या ठिकाणी द्राक्ष बाव लावता यावी कारण द्रक्षबागेसाठी तेच अंतर उपयोगी ठरणार होते. ड्रिप होतेच. पण फेल जाण्याची वेळ आलीच नाही. उलट शेवगा कमी लावल्याच पश्चाताप होतो आहे.
जर्मिनेटरचा वापर बियाणापासून रोपे तयार करतानाच केला. त्यामुळे उत्तम व लवकर उगवण झाली. पांढऱ्या मुलीच्या संख्येत वाढ झाली. रोपांची वाढही जोमदार झाली. १ महिन्याने १'x १' चा खड्डा घेऊन व त्यात कल्पतरू सेंद्रिय खात व प्रोतेक्टंट चा वापर करून रोपे लावली. सरांच्या मार्गदर्शनाखाली थ्राईवर फवारले. त्यामुळे भरपुर फुटवा फुले व शेंगा लागल्या. पानांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ झाली. फुलगळ व पानगळ थांबली. वेळोवेळी क्रॉंपशाईनरचा वापर केल्याने शेंगांना चकाकी आली. मध्येच झालेल्या खराब हवामानाचा वाईट परिणाम झाला नाही. राईपनर वापरल्याने शेंगांचे वजन वाढले व विक्रमी उत्पादन मिळाले ते पण निर्यातक्षम शेवगा शेंगांचे. एका झाडावर ३०० ते ४०० शेंगा होत्या. १५ ते २० रुपये किलोने शेवगा निर्यात केला. सुमारे ७० हजार रूपेय उत्पन्न मिळाले. खर्च होता फक्त ५००० रुपय. पहिल्याच खुड्यात ७० हजार रू. मिळाले आणि लगेचच मोबाईल घेतला. द्राक्ष बागेचा खर्च पाहाता शेवगा हा खरोखरच फायदेशीर असल्याचे माझे मत झाले. शेजारी पाजारी मला हसून म्हणायचे शेतात कष्ट नकोत म्हणून टाईमपाससाठी शेवगा लावला. थोडक्यात आळशी. पण केवळ डॉ. वि.सु.बावसकर सरांच्या अनमोल मार्गदर्शनाने यश मिळाले.