लसूणघास लागवड
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
                                सदाहरित चाऱ्याचे पीक म्हणून लसूणघास ओळखला जातो. प्रमाणशीर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या
                                फवारण्य, खत तसेच पाण्याचा नियोजनबद्ध वेळच्या वेळी वापर करून बाराही महिने ह्या पिकापासून
                                भरपूर व सतेज हिरवागार चार उपलब्ध होतो. त्यामुळे वर्षभर दुभत्या जनावरांसाठी लसूणघास
                                म्हणजे नेहमीच हिरव्यागार चाऱ्याची मेजवाणीच ठरत असते. लसूण घासामध्ये प्रथिनांचे प्रमाण
                                १७ ते २०% असते. त्याचबरोबर भरपूर फूड प्रोटिन्स मिनरल्स, व्हिटॅमीन 'ए' आणि व्हिटॅमीन
                                'डी' इ. घटक या चार्यामध्ये सामावलेले असतात. म्हणून लसूणघासास 'चारा पिकांचा राजा'
                                असे संबोधले जाते. घासामध्ये सी. पी. १८.७%, सी.एक. २५.७%, ई.ई. ३.१%, अॅश १४.८%, एन.
                                एफ. ई. ३७.०%, ई. विविध घटकांची टक्केवारी आढळून येते. लसूण घासाची उपयुक्तता विविध
                                अंगी पहावयास मिळते. कारण त्याचा हिरवा चारा म्हणून वर्षभर पुरवठा होऊ शकतो. त्याचप्रमाणे
                                वाळलेल्या अवस्थेतील अवशेषसुद्धा जनावरांना उपयुक्त ठरतात. लसूणघासाचे पीक हे जमिनीची
                                सुपिकता वाढविण्याचेही काम करते.
लसूणघासाचे उगमस्थान पाश्चिमात्य देशातील उत्तरेकडील भागामध्ये असून अगदी पौराणिक बायबल ग्रंथामध्येसुद्धा लसूणघासाचा उल्लेख केलेला आढळतो. हे चारापीक उबदार आणि थंड हवामानाच्या प्रदेशात चांगल्याप्रकारे येते. जागतिक पातळीवर ह्या पिकाच्या लागवडीसंबंधी स्पॅनियार्डसने पुढाकार घेतलेला होता. त्या अनुषंगाने पश्चिम अमेरिकेकडील काही भागातसुद्धा तसेच प्रयत्न चालू होते.
परंतु त्यानंतर इ. स. १८०५ मध्ये कॅलिफोर्नियामधील काही भागातदेखील त्याचा पुढे चांगला प्रसार होते राहिला. भारतामध्ये ते इ.स. १९०० च्या काळात नावारूपाला येऊ लागले होते आणि आता तर आपल्याकडे ते ओलीताची सोय असणाऱ्या भागात उत्तम प्रतीचा चारा म्हणून फार मोठ्या प्रमाणात लागवडीखाली येऊ लागले आहे.
जमीन व हवामान : लसूणघासाचे पीक हे वेगवेगळ्या जमिनीत घेत येते. अगदी मध्यम प्रतीच्या, वाळू मिश्रित, पोयटायुक्त जमिनीपासून ते काळ्या कसदार जमिनीपर्यंतच्या भिन्न प्रकारात या पिकाची लागवड केली जाते. भारी जमीन या पिकास अतिशय उपयुक्त ठरते. निचरायुकत जमीन यासाठी गरजेची असते. परंतु अल्काधर्मी जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी अयोग्य ठरतात. कारण अशा जमिनीत बियाची उगवणक्षमता एकसारखी होत नाही आणि त्यामुळे जमिनच्या क्षेत्रात ठिकठिकाणी लसूणघासाच्या पिकाच्या डाली/नांग्या पडतात. त्यामुळे उत्पादनात पुढे घट येण्याच्या संभव असतो. लसूणघासाचे पीक विभिन्न प्रकारच्या हवामानात येते तसेच हे पीक उबदार व थंड हवामानाच्या परदेशीतही चांगल्याप्रकारे लागवडीखाली आणता येते. परंतु थंड व कोरड्या हवामानाच्या भागात लसूणघासाचे पीक कमी जास्त प्रमाणात वाढीस लागते.
पुर्व मशागत : एकदा पेरणी केल्यानंतर हे पीक त्याच जमिनीत ३ ते ४ वर्षे राहत असल्याने पुर्व मशागतीला फार महत्त्व आहे. त्यासाठी खोलवर नांगरट करून ढेकळांचे प्रमाण अधिक असल्यास ती फोडून घेऊन उभ्या आडव्या कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. बी पेरणीपुर्वी मध्यम ते हलक्या जमिनीत एकरी ८ ते १० टन पुर्ण कुजलेले शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खत १०० ते १५० किलो द्यावे. जमीन भारी असल्यास कल्पतरू सेंद्रिय खत ५० ते ७५ किलो द्यावे. शेणखत कमी प्रमाणात उपलब्ध असल्यास कल्पतरू सेंद्रिय खताची १ ते २ बॅगा जमिनीच्या प्रकारानुसार जादा द्याव्यात.
बीजप्रक्रिया : लसूणघासाचे बी निवडताना ते भेसळ नसणारे, न फुटलेले, टपोरे, रोगमुक्त निवडावे. १ लि. पाण्यामध्ये २५ -३० मिली जर्मिनेटर घेऊन त्या द्रवाणात १ किलो बी ४ ते ५ तास भिजवून नंतर सावलीत सुकवून पेरावे.
हे पीक वार्षिक आणि बहुवार्षिक असे दोन्ही पद्धतीमध्ये घेतले जाते. लसूणघासाची पेरणी ऑक्टोबर ते डिसेंबरचा पहिला आठवडा या कालावधीत करणे फायदेशीर ठरते. एकरी सर्वसाधारणपणे ८ ते १० किलो बी पुरेसे होते. वरील पद्धतीने बीजप्रक्रिया केल्यास बियाण्यामध्ये अजून बचत होते. बी फोकूनही लसूणघास लागवडीखाली आणता येतो.
सुधारित जाती : लसूणघासाच्या सुधारित जाती म्हणून प्रामुख्याने सिरसा -९ स्थानिक, पुन -१ बी, ल्युसर्न - ९ , आर. एल. -८८, आनंद -२, आनंद -३ जातींची शिफारस करण्यात येते.
खते : लसूणघासाच्या कमी दिवसात चांगल्या उत्पादनासाठी पेरणीपुर्वी वर सांगितल्याप्रमाणे खताचा वापर करावा. नंतर पहिल्या कापणीनंतर दर कापणीस २० ते २५ किलो कल्पतरू सेंद्रिय खताचा प्रति एकरी वापर करावा. म्हणजे कापणीनंतर निघणार्या फुटव्यांची वाढ जोमाने होईल. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने लसूणघासाच्या मुळावर नत्रस्थिरीकरणाच्या गाठी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने वेगळी नत्राची मात्रा देण्याची गरज भासत नाही. वर्षानुवर्षे लसूणघासाचे पीक चाऱ्यासाठी मुबलकपणे घ्यावयाचे झाल्यास दर वर्षी ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात पालाश युक्त सेंद्रिय खत ४० किलो किंवा कल्पतरू सेंद्रिय खताची ५० किलोची १ बॅग एकरी द्यावी. म्हणजे लसूणघासाचे उत्पादन तर वाढीस लागतेच तसेच जमिनीचा पोतदेखील सुपीक राहण्यास मदत होते.
पाणी पुरवठा : लसूणघासाचे पीक हे वर्षभर हिरवा चारा पुरविणारे पीक असल्याने पाणी पुरविण्याची सोय वेळच्या वेळी करणे अतिशय महत्त्वाचे असते. लसूणघासाला साधारणपणे १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या दिल्या पाहिजेत. उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी, तर हिवाळ्यात १० ते १२ दिवसांनी पाणी द्यावे.
लसूणघासाची कमी कालावधीत अधिक वाढ होण्यासाठी तसेच चारा पौष्टिक, हिरवागार, रसरशीत तयार होण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या खालील फवारण्या द्याव्यात.
१) पहिली फवारणी : ( लसूणघास उगवून आल्यानंतर ८ - १० दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २०० मिली. + क्रॉंपशाईनर २०० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + १०० लि.पाणी.
                                
२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर १८ ते २१ दिवसांनी) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ४०० मिली. + क्रॉंपशाईनर ४०० मिली. + राईपनर १५० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी १५० मिली + १५० लि.पाणी.
                                
३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर २८ ते ३० दिवसांनी ) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ राईपनर २५० मिली.+ प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + हार्मोनी १५० मिली + १५० लि.पाणी.
                                
वरील पद्धीतने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केल्याने लसूणघासाची पाने रुंद, हिरवीगार, लुसलुशीत होऊन लसूणघासाची काडी मऊ, रसदार पौष्टिक तयार होते. त्यामुळे असा घासा दुभत्या जनावरांना खाण्यास दिल्याने दुधाचे प्रमाण वाढते व त्यातील स्निग्धांशाचेही प्रमाण वाढते. (संदर्भासाठी याच अंकातील श्री. जगन्नाथ सुदाम पाडेकर मु. संतवाडी, पो. आळे, ता. जुन्नर, जि. पुणे यांची पान नं. १७ वरील मुलाखत पहावी.) एरवी लसूणघासाची पाने अरुंद व निस्तेज राहतात. तसेच लसूणघासाची काडी कडक राहिल्याने रसाचे प्रमाण कमी असते. असा चार फक्त घोडेच चांगला रवंथ करू शकतात.
लसूणघासाचे पीक प्रथम कापणीस साधारणपणे ४५ ते ५० दिवसात येते. फुलोऱ्यात येण्यापुर्वीच लसूण घासाची कापणी करावी. त्यानंतर वरील दुसरी फवारणी कापणीनंतर ८ दिवसांनी आणि तिसरी फवारणी कापणीनंतर १५ दिवसांनी नियमित केल्यास १८ ते २२ दिवसात कापणीयोग्य घास प्रत्येक वेळी तयार होतो.
उत्पन्न : लसूणघासाचे वार्षिक एकरी उत्पादन ४० ते ५० टन मिळते डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांचा व खतांचा वापर वरीलप्रमाणे नियमित केल्यास उत्पादनात यापेक्षाही वाढ होते तसेच सदैव पौष्टिक, हिरवागार चार मुबलक व जास्तीत जास्त प्रमाणात मिळतो.