हमखास भाव देणारे पीक - भेंडी
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
                                भेंडीच्या भाजीला वर्षभर भरपूर मागणी असते. महाराष्ट्रात भेंडी पिकाच्या लागवडीखाली
                                ५,३०० हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांत भेंडीची लागवड कमीअधिक प्रमाणात
                                केली जाते. पुणे, जळगाव, धुके, अहमदनगर, नाशिक आणि सातारा जिल्ह्यात भेंडीची लागवड मोठ्या
                                प्रमाणात केली जाते. भेंडीच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण पुढीलप्रमाणे
                                - पाणी - ९०%, प्रोटीन्स -१.९ %, तंतुमय  पदार्थ - १.२%, मॅग्नेशियम - ०.४ %, फॉस्फरस - ०.०६%, पोटॅशियम - ०.१%, कार्बोहायड्रेट्स - ६.४%, फॅट्स -
                                ०.२%, खनिजे - ०.७ %, कॅल्शियम - ०.०७%, लोह -०.००२%, सल्फर -०.०३%, जीवनसत्त्व 'अ'
                                - ८८ इंटरनॅशनल युनिट, जीवनसत्त्व 'क' - ०.००१, उष्मांक (कॅलरीज) -२२ %
                                
जमीन - मध्यम काळ्या किंवा पोयट्याच्या जमिनीत भेंडीची वाढ चांगली होते. हलक्या जमिनीमध्ये पिकाची वाढ जोमदार होते नसल्याने उत्पादन व दर्जामध्ये विपरीत परिणाम जाणवतो. त्यासाठी अशा जमिनीत जास्तीत - जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा. जमिनीचा सामू ६ ते ७ च्या दरम्यान असावा.
                                
हवामान : भेंडीच्या पिकाला उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. या पिकाच्या पेरणीची वेळ ही तापमानावर अवलंबून असते. तापमान १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल तर बियांची उगवण चांगली होत नाही. तसेच तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास फुलांची गळ होते. २० ते ४० अंश सेल्सिअस तापमानात हे पीक चांगले येते. अतिशय दमट हवेत या पिकावर भुरी रोगाचा उपद्रव आढळतो. ज्या ठिकाणी थंडी जास्त आणि अधिक काळ असते, अशा ठिकाणी रब्बी हंगामात हे पीक घेता येत नाही. परंतु समुद्र किनाऱ्याजवळच्या सौम्य हवामानाच्या पट्टयात हिवाळा सुरू होण्यापूर्वी पेरणी केल्यास भेंडीचे पीक घेता येते. उन्हाळ्यामधी ल हवामान भेंडीच्या वाढीस पोषक असून भेंडीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर येते.
                                
जाती १) अर्का अनामिका - आय. आय. एच. आर. बेंगलोर येथे विकसीत झाली असून खूप लोकप्रिय आहे. या जातीची झाडे उंच वाढतात. फळे गर्द हिरव्या रंगाची, गुळगुळीत व लांब असतात. फळांचे देठ लांब असल्याने काढणी करताना लवकर उरकते. पुसा सावनी व इतर प्रचलित जातींपेक्षा उत्पादन अधिक मिळते . ही जात खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य आहे.
                                
२) परभणी क्रांती - फळे व ८ ते १० सेमी लांबीची असतात. खरीप, उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य जात आहे.
                                
३) अर्का अभय - अर्का अनामिकासारखीच या जातीची फळे असून विशेष म्हणजे या जातीमध्ये फांद्या फुटत असून दोन बहार मिळतात.
                                
४) पुसा सावनी - ही जात भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथून विकसीत झाली असून फळे १० ते १५ सेमी लांब असून झाडांवर काटेरी लव असते. झाडांचे खोड, देठ आणि पानांच्या खालील बाजूस हिरवा रंग असून त्यावर तांबूस छटा आढळून येते. ही जात खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य आहे. या जातीच्या झाडांची फुले पिवळ्या रंगाची असून फुलांच्या प्रत्येक पाकळीवर देठाकडील भागावर जांभळ्या रंगाचा ठिपका असतो. सरासरी एकरी ४ ते ५ टन उत्पादन मिळते.
                                
संकरित भेंडी -
                                
१) महाबीज ९१३ (तर्जनी) - ह्या जातीची भेंडी ४५ ते ४६ दिवसात तोडणीला येत असून पिकाचा कालावधी १०० ते ११० दिवस आहे. फळे मध्यम लांब (१० ते १२ सेमी) असून सर्वसाधारणपणे एकरी १० ते ११ क्विंटल उत्पादन मिळते.
                                
२) फुले किर्ती - महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या वाणाची शिफारस केली आहे. फळे हिरव्या रंगाची असून खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामामध्ये लागवडीसाठी योग्य जात आहे. ही जात केवडा रोगास प्रतिकारक्षम आहे.
                                
याशिवाय महिको -१० नं., दप्तरी, अंकुर ३५ ते ४०, खाजगी कंपन्यांच्या जातींपासूनही चांगले उत्पादन मिळते.
                                
एक्सपोर्टसाठीची लागवड पद्धत - ज्या भागांमध्ये ऊस लागण मोठ्या प्रमाणावर करतात त्या भागांमध्ये सरीवर १ फूट x ६ इंच अशी टोकण पद्धतीने लागण करतात. एकरी ३ - ४ किलो बी लागते. फलटण भागातील शेतकरी अशा प्रकारची लागण मोठ्या प्रमाणात करीत असून ही भेंडी एक्सपोर्ट केली जाते.
                                
खते : भेंडीला रासायनिक खताचा वापर करू नये. रासायनिक खताचे प्रमाण कमी - जास्त झाल्याने रोगाचा प्रादुर्भाव होऊन झाडांच्या वाढीवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. तेव्हा लागवडीपुर्वी शेणखत किंवा एकरी ७५ ते १०० किली कल्पतरू सेंद्रिय खत वापरावे. उगवणीनंतर १५ ते २१ दिवसांनी खुरपणी झाल्यानंतर पुन्हा एकरी २५ ते २१ दिवसांनी खुरपणी झाल्यानंतर पुन्हा एकरी २५ ते ३० किलो कल्पतरू सेंद्रिय खताचा डोस सरीतून द्यावा म्हणजे जमीन भुसभुशीत राहून भेंडीची वाढ व त्याचबरोबर फुलकळी भरपूर लागण्यास आणि माल पोसण्यास मदत होते.
                                
पाणी - जमिनीच्या मगदुराप्रमाणे व हंगामानुसार ५ ते ६ दिवसांच्या अंतराने भेंडीला पाणी द्यावे. उन्हाळ्यात ओलावा टिकून राहण्यासाठी वाळलेल्या गवताचे किंवा भाताच्या पेंढ्याचे आच्छादन दोन ओळीमध्ये घालावे त्यामुळे तणांचा बंदोबस्त होतो तसेच पाण्यातही बचत होते.
                                
कीड व रोग - भेंडी या पिकावर प्रामुख्याने मावा, तुडतुडे फांद्या व फळे पोखरणारी अळी, पंढरी माशी या किडींचा उपद्रव होतो.
                                
१) मावा - मावा ही कीड हिरव्या व काळ्या रंगाची असून प्रामुख्याने भेंडीच्या पानाच्या खालील बाजूस कोवळ्या फांद्यावर किंवा शेंड्यावर आढळते. ही कीड पाने आणि कोवळ्या फांद्यातील रस शोषून घेते. या किडीमुळे पाने आकसतात.
                                
२) तुडतुडे - ही कीड पानांच्या मागे राहून पानांतून रस शोषते. त्यामुळे पाने पिवळी पडून आतील बाजूस वळतात. पाने कमकुवत राहून झाडांची वाढ खुंटते.
                                
३) फांद्या व फळे पोखरणारी अळी - या किडीचे मादी फुलपाखरू झाडाच्या शेंड्याजवळ किंवा फळावर अंडी घालते. या अंड्यातून बाहेर आलेली अळी कोवळा शेंडा पोखरून आतील गाभा खाते. त्यामुळे शेंडा मरतो. फळे आल्यावर अळी फळे पोखरून आत प्रवेश करते आणि आतील गर खाते. त्यामुळे भेंडीच्या फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
                                
४) पांढरी माशी - या किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने केवडा रोगाची लागण वाढण्यास मदत होते.
                                
रोग -१) भुरी - भुरी हा बुरशीजन्य रोग असून या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानांवर पांढरी बुरशी वाढते आणि पाने पिवळी पडतात. नंतर पाने सुकतात व गळून पडतात. पिकामध्ये फळधारणा होत नाही.
                                
२) केवडा (यलो व्हेन मोझॅक) - हा विषाणुजन्य रोग असून या रोगग्रस्त झाडाच्या पानांच्या शिरा पिवळ्या पडतात. या रोगामुळे फळे पिवळट पांढरी होतात. त्यामुळे अशा फळांना बाजारभाव मिळत नाही.
भेंडी पिवळी पडणे - ही विकृती म्हणजे व्हायरस नव्हे काळ्या जमिनीमध्ये मुक्त चुना म्हणजे कॅल्शिअम कार्बोनेट छ (CaCo३ ) चे प्रमाण ५ ते १३ % असते. अशा जमिनीत भेंडी लावल्यास सोट्मुळांमुळे भेंडीची वाढ चांगली होते, परंतु मुक्त चुन्यामुळे भेंडी पिवळी पडते. मात्र हा व्हायरस मोझॅक नसून लाईन इन्ड्यूस्ड आयर्न क्लोरॉसिस (Lime Induced Iron Chlorosis) (LIIC ) चा Phenomenon असतो. म्हणजे विद्राव्य चुनखडीयुक्त क्षारांमुळे तसेच प्रमाण कमी झाल्यामुळे भेंडी पिवळी पडते. याचे प्रमाण नंतर हळूहळू वाढत जाते. अशा भेंडीत व्हायरस झाला असे काही कृषी विकास अधिकारी सांगतात. परंतु ते चुकीचे आहे. पुढेपुढे लोहाचे प्रमाण की झाल्यानंतर भेंडीच्या पानांच्या शिरा ह्या जाळीदार हिरव्या दिसून मँगनिजची कमतरता झाली असे म्हणता येईल. परंतु लोह, मँगनिजचा फवारा दिल्यास त्याचा पुर्णपणे उपयोग होत नाही. त्याकरिता सुरुवातीसच काळजी घेणे आवशक आहे.
                                
जय भागामध्ये मॉन्टमोरिलिओनाईट (Montmorrillonite २ : १ Lattice) ह्या चिकणमाती घटकाचे प्रमाण जास्त असते. त्या भागातील जमिनी काळ्या असतात. अशा जमिनीत ही विकृती (LIIC) दिसते. ती वरील कारणास्तव व्हायरसच असेल असे नाही.
                                
व्हायरस कसा ओळखला ?
                                
कारणे -१ ) पावसाळी हवामानामध्ये भेंडी केली असता या भेंडीसाठी नागरी खत (Town Compost) वापरले असता, कोंबडखत वापरले असता, ढगाळ हवामानात रासायनिक खतांचा मुक्त हस्ते वापर केला असता भेंडीला व्हायरस येतो.
                                
२) भेंडीवर्गीय पिकांतील पहिले पीक घेतले असेल किंवा पपई लागवड असेल तर व्हायरस येऊ शकतो.
                                
३) ढगाळ हवामानामध्ये मावा, तुडतुडे, फुलकिडे यांचे प्रमाण जास्त असेल, तसेच रासायनिक खतांचा मुक्तहस्ते वापर केला असल्यास भेंडीची पाने लुसलुशीत व मऊ होतात. अशावेळी किडी भ्रमण करीत असताना, उडत असतान नेहमी तिरपे चालत असताना पायाद्वारे पानांना छिद्रे पाडतात व ह्या किडीमुळे व्हायरसचा प्रसार होतो.
                                
व्हायरसची लक्षणे - वरील सर्व परिस्थितीमध्ये भेंडीच्या झाडांची पानांची शेंड्याची वाढ झपाट्याने होऊन, शेंड्याचा रंग पोपटी होतो. तो लगेच तुटतो. पोपटी शेंड्याच्या भागावर किंचीत बारीक ठिपके असून खोड अर्धपारदर्शक (Translucent) दिसते. अशा परिस्थितीत वरील कीड गेल्यास व्हायरस झाल्याचे समजावे. प्रथम पाने पिवळी पडतात. मे महिन्याच्या शेवती रोहिणी नक्षत्रात भेंडी सापडली तर काही प्रमाणात खालील व मधली पाने पिवळी पडतात.
                                
दुसऱ्या अवस्थेमध्ये १०%,२०% नंतर ४०% अशी पाने पिवळी पडतात. अशा परिस्थितीमध्ये मात्र भेंडी संपूर्ण उपटून टाकावी. यलो व्हेन मोझॅक (Yellow Vein Mosaic - YVM) मध्ये संपूर्ण शिरा पिवळ्या होतात.
                                
भेंडीला वर्षभर भाव मिळतो. ज्यावेळी सूर्याचे संक्रांतीनंतर उत्तरायण सुरू होते. त्यावेळी उष्णता वाढल्याने भेंडीची वाढ झपाट्याने होते हे शास्त्रीय कारण बरोबर आहे. ज्यावेळी उष्णता वाढते,त्यावेळी जमीन तापते. पाणी देण्याचे प्रमाण वाढते. कळी लवकर वाढते. परंतु सभोवतालाचे वातावरण उष्ण असल्याने चौथ्या, पाचव्या दिवशी पाणी दिले तर व्हायरस येत नाही, परंतु फळ पांढरे पडू शकते. बाल्ल्यवस्थेत सप्तामृत वापरल्यास याचे प्रमाण कमी होते, तसेच वरील वातावरणात बदला भेंडी जास्त निघते. बदला भेंडी म्हणजे भेंडी ही थोडी आखुड, सरळ न येता मध्ये फुगून आतील दाणे स्पष्टपणे दिसू लागतात. अशी बदल भेंडी २० ते ३० रुपये/१० किलो व चांगली भेंडी १५ ते २० - २५ रुपये किलो दराने विकली जाते. परंतु बदल भेंडीचे प्रमाण २० ते ३० टक्के असते. ही बदला भेंडी होऊ नये म्हणून आणि कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी तसेच अधिक, दर्जेदार उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढे दिल्याप्रमाणे फवारण्य कराव्यात.
                                
व्हायरसयुक्त (Yellow Vein Mosic Chlorosis - YVM) भेंडी आणि अधिक चुनखडीमुळे भिंडी पिवळी पडणे (Lime Induced Iron Chlorosis -LIIC) यातील फरक
                                
फवारणी :
                                
१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली + स्प्लेंडर १०० मिली + १०० लि.पाणी.
                                
२) दुसरी फवारणी : (३० ते ४० दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर ३०० मिली. + क्रॉंपशाईनर ३०० मिली. + राईपनर १०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन १०० मिली. + हार्मोनी १०० मिली + स्प्लेंडर १०० मिली + १०० लि.पाणी.
                                
३) तिसरी फवारणी : (४५ ते ६० दिवसांनी ) : थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ राईपनर ३०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी २५० मिली + स्प्लेंडर २५० मिली + १५० लि.पाणी.
                                
४) चौथी फवारणी : ( वरील फवारणीनंतर दर १० ते १५ दिवसाच्या अंतराने) : थ्राईवर ५०० ते ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० ते ७५० मिली. + राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी २५० ते ३०० मिली + स्प्लेंडर १५० मिली + २०० लि. पाणी.
                                
निर्यातीच्या दृष्टीने भेंडीसाठी घ्यावयाची काळजी
                                
एक्सपोर्टसाठी भेंडी १॥ ते २ इंच लांबीची सरळ, कोवळी, लुसलुशीत ताजी, चकाकणारी, करंगळी ते तर्जनीच्या जाडीची, कुठलाही डाग नसलेली असावी. अशी भेंडी मिळविण्यासाठी लागवड सपाट वाफ्यामध्ये फोकून दाट करावी. २ झाडांतील अंतर ६ ते ९ इंच - १२ इंच इतके असावे. भेंडीची (झाडाची) उंची २ ते २॥ फुटाची असावी. भेंडी उंच असल्यास आणि रासायनिक खत, पाणी, कोंबड खताचे प्रमाण जास्त असल्यास पाने रुंद होऊन फुल लागण्याची शक्यता कमी असून भेंडी कमी प्रमाणात येते. लागवडीपूर्वी कुजलेले सेंद्रिय खतच वापरावे.
                                
गाव खताचा वापर करू नये. त्याचा वापर केल्यास असून एक समस्या निर्माण होते ती अशी - भेंडीची लागवड जून - जुलै, नोव्हेंबर - डिसेंबर, जानेवारी - मार्च या कालावधीमध्ये केल्यास रोपांमध्ये मर होण्याची भयानक शक्यता असते. एका महिन्यामध्ये भेंडीची पूर्णपणे मर होते. ह्याला 'विल्ट' म्हणतात. ही मर होऊ नये म्हणून भेंडीवर भेंडी किंवा भेंडीवर्गीय पीक घेण्याचे टाळावे. मिरची, कांदा, लसूण यानंतर भेंडी करावी. म्हणजे मर कमी होते. भेंडीची मर होऊ नये म्हणून ३० मिली जर्मिनेटर + १० ग्रॅम प्रोटेक्टंट + १ किलो बी अर्धा लिटर पाण्यामध्ये ४ तास भिजवून नंतर पेरल्यास मर रोगास प्रतिबंध होतो.
                                
काढणी - बी लावल्यानंतर ३५ ते ४० दिवसांत फुले लागतात आणि त्यानंतर ५ ते ६ दिवसांनी फळे तोडणीस येतात. सर्वसाधारणपणे बाजारामध्ये कोवळ्या भेंडीला अधिक मागणी असते. त्यासाठी भेंडीची तोडणी दर दोन दिवसांनी करावी. फळांची तोडणी सकाळी लवकर करावी. त्यामुळे फळांना रंग व तेज टिकून राहते.
                                
उत्पादन - साधारणपणे भेंडीचे खरीप हंगामात ५ ते ६ टन तर उन्हाळी हंगामात ३ ते ४ टन उत्पादन मिळते. संकरीत वाणांचे एकरी १० टनही उत्पादन मिळते.

| व्हायरस (YVM) | लाईम इंड्यूस्ड आयर्न क्लोरॉसिस (LIIC) | 
|---|---|
| १) झपाट्याने वाढतो | १) कमी प्रमाणात व हळूहळू पसरतो | 
| २) संपूर्ण पान झपाट्याने पिवळे पडते | २) पाने पिवळी पडतात. परंतु शिरा पोपटी हिरव्या दिसतात | 
| ३) हवेत अधिक उष्णता, कोसळणारा पाऊस (रोहणी/ भाद्रपदातील) व ढगाळ हवामानात मोठ्या प्रमाणावर होतो. कारण तेव्हा फुलकिडे, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव अधिक असतो. | ३) बाराही महिने दिसू शकते | 
| ४) सर्व प्रकारच्या जमिनीत दिसतो, तसेच फेरपालटीवर भेंडी, टोमॅटो, वांगी, पपई अशी अगोदरची पिके असल्यास किंवा जवळपास असल्यास व्हायरस दिसतो | ४) काळ्या, चुनखडीयुक्त जमिनीत मोठ्या प्रमाणावर दिसते. | 
| ५) पहिल्या टप्प्यात सर्व डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरल्यास दुरुस्त होऊ शकतो. परंतु, २५% च्या पुढे व्हायरसचे प्रमाण पोचल्यास कोणत्याही उपायाने दुरुस्त होऊ शकत नाही. | ५) ही विकृत दुरुस्त होऊ शकते. | 
| ६ ) भेंडी निघत नाही, निघाल्यास आखूड व संपूर्ण पिवळी निघते. | ६) भेंडीचे उत्पन्न कमी येते. भेंडी पिवळी, पंढरी व बदला भेंडी अधिक निघते. | 