Benefits of Kalpataru Organic Manure
रासायनिक खतांचा वापर करून जमिनी खराब, नापिक होत चालल्या आहेत व ही समस्या भेडसावत
आहे. रासायनिक खतासाठी नाप्था हा पेट्रोलियम पदार्थ लागतो. तो महाग झाल्याने रासायनिक
खतांच्या किंमतीत भरमसाठ न परवडणारी वाढ झाली आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे एका
विशिष्ट टप्प्यापर्यंतच उत्पन्नात वाढ होते व मर्यादेपेक्षा हा वापर वाढला म्हणजे उत्पन्नात
लाक्षणिक घट होऊन जमिनी कायमच्या बाद होतात. याचे उत्तम उदाहरण 'ऊस' म्हणता येईल. रासायनिक
खतावरील अधिक खर्च, अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन व म्हणावा तसा दर्जा नसतो. या विविध
कारणांमुळे प्रा. डॉ. बावसकरांनी प्रदिर्ध संशोधन करून 'कल्पतरू' नावाचे खत
निर्माण केले.
कल्पतरू वापरण्याचे फायदे
कल्पतरू वापरण्याचे फायदे
- जमीन भुसभुशीत ठेवते, त्यामुळे जमिनीमध्ये हवा आणि पाणी यांचे संतुलन राहून मुळ्यांचा जारवा वाढण्यास मदत होते. जारवा वाढल्याने गारवा निर्माण होतो.
- द्राक्षाच्या पांढर्या मुळीच्या प्रमाणात वाढ. त्यामुळे सौरजळाचा घडांना त्रास कमी होऊन कॅनॉपी वाढते. द्राक्ष घड निर्मितीमध्ये रासायनिक घटकांचा अंश कमी राहतो. म्हणून निर्यातीत अतिशय उपयुक्त.
- कमी पाण्याच्या उपलब्धतेत सर्व भाजीपाला पिकांना वरदान.
- खर्चात बचत.
- जमिनीचा पोत सुधारतो.
- कांदा, बटाटा, लसूण, भुईमूग, रताळी, गाजर, मुळा अशा जमिनीत येणार्या पिकांना पोसण्यास मदत होते.
- कल्पतरू जमिनीत वापस असताना द्यावे म्हणजे लवकर लागू पडते.
- द्राक्ष फळबागा यांना साधारण २५० ग्रॅम ते १ किलो पर्यंत वेलीभोवती (फळ झाडांभोवती) ठिबक जवळ / चरात नेहमी प्रमाणे. भाजीपाला व फळ पिकास बांगडी पद्धतीने द्यावे.
- उस पिकास सरीतून द्यावे.
- पारंपारिक फुलपिके - मोगरा, गुलाब, शेवंती, पारंपारिक तसेच संकरीत झेंडू, गुलछडी, बिजली, अॅस्टर, जाई-जुई, बेंगलोरी कागडा, लिली या पिकांसाठी कल्पतरू खत हे रासायनिक खतापेक्षा श्रेष्ठ आहे.
- पॉलीहाऊसमधील फुले (गुलाब, कार्नेशन, ढोबळी मिरची, ग्लॅडीओलस, जरबेरा) अशा सोन्याचे अंडे देणार्या फुल पिकांसाठी कल्पतरू सेंद्रिय खत हे अतिशय उपयुक्त ठरल्याचे देशभरातील शेतकर्यांनी आम्हाला कळविले आहे.
- स्टॅटीस, लास्पर, कॅन्टॉप, लेडीलेस, अबोली, डेझी, जीप्सी अशा असंख्य विदेशी फुलांसाठी तसेच सुगंधी व आयार्वेदिक वनस्पतीसाठी (शतावरी, सफेद मुसळी) कल्पतरू हे मालाची गुणवत्ता, उप्तादन व दर्जा अती उच्च दर्जाचे निर्माण होत असल्याने निर्यातीसाठी निर्माण केली जाणारी फळे, फुले, औषधे, सुगंधी द्रव्य ही मानवी जीवनास नुसती निर्धोक नसून उपयुक्त ठरली आहेत.
- तशाच प्रकारे फळबागा - डाळींब, पपई, आंबा, नारळ, काजू, स्ट्रॉबेरी, सिताफळ, रामफळ, जांभुळ, आवळा, पेरू, चिकू, लवंग, मिरी, दालचिनी, जायफळ, आले व हळद, चहा, कॉफी, ऑलस्पायसेस प्लॅन्ट , विड्याची पाने या सर्व पिकांसाठी कल्पतरू हे जमिनीचा पोत सुधारून अधिक दर्जेदार उप्तादन करण्यामध्ये सरस ठरले आहे.
- कल्पतरू हे सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, फुलझाडे, फळझाडे, तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, पारंपारिक व अपारंपरिक व्यापारी पिके, ऊस, कापूस अशा पिकांना वरदान ठरले आहे. (माहितीसाठी - कृषी विज्ञान मासिक वाचावे.)
- Organic Manure
- ಸೇಂದ್ರೀಯ ಗೊಬ್ಬರ