डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सीमारूबाचे संगोपन बहरीन येथे अमेरिकन अंबॅसेडरकडून लागवड

श्री. रत्नाकर रामचंद्र जाधव,
फलोत्पादन अधिकारी, सदूंबरे, ता. मावळ, जि. पुणे.
मोबा. ९८२३६७१९८७


सीमारुबा ग्लाऊका हे तेलबिया वर्गातील झाड असून प. पू. श्री. श्री. रविशंकर यांनी त्याचे विविध उपयोग बधून 'लक्ष्मीतरू' असे नाव दिले.Art of Living या N.G.O. संस्थेमार्फत या झाडाचे लागवडीचा संदेश सर्व जगभर पसरवण्याचे काम प. पू. श्री. श्री. रविशंकर यांचे आशीर्वादाने चालू आहे.

याच्या बिया टणक टरफलाच्या असतात. जून, जुलैमध्ये लागवड करून रोपे मिळवता येतात. बियाणाची उगवण शक्ती खूप कमी म्हणजे २० ते ३० % आढळली. उगवण शक्ती वाढवण्यास डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे 'जर्मिनेटर' औषध १ लिटर पाण्यात ३० मिली टाकून २४ तास पाण्यात बुडवून ठेवल्याने ५०% पर्यंत उगवण झाली. १ बीचे वजन १ ग्रॅम असते.

रोपे उगवून आल्यावर साधारण ३० ते ४० दिवसात ४ पानावर येतात. अशी रोपे उपटून १ लिटर पाण्यात ३० मिली जर्मिनेटर घेऊन या द्रावणात बुडवून पिशवीमध्ये लागवड केल्यास मर होत नाही. सप्तामृताची फवारणी एक महिन्याने घेतली. रोपे उत्तम वाढली.

या झाडापासून खाण्याचे तेल मिळते. कोरडवाहू क्षेत्रात तसेच पडीक जमिनीत, बांधाच्या कडेने, रस्त्याचेकडेने लागवड केल्यास निशिच्त उत्पन्न मिळून रोजगार मिळण्यास मोठा हातभार या झाडामुळे लागेल. या झाडांत औषधी गुणधर्म असून मलेरिया व पोटाचे विकारावर हे चांगले औषध आहे. या झाडापासून ५ वर्षानंतर उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते. कच्छच्या वाळवंटात याची लागवड यशस्वी झाली आहे. लागवड करण्या करिता ०.४५ x ०.४५ x ०.४५ सेमी खोलीचे खड्डे घेऊन खत, मातीने खड्डे भरून घ्यावेत. रोपाची लागवड ५ x ५ मीटर अंतरावर करावी. त्यामुळे हेक्टरी ४०० झाडे बसतात.

या झाडाची रोपे तालुका फळ रोपवाटिका, सदूंबरे येथे २००६ -०७ मध्ये तयार केली असून सदर रोपाची बहारीनमध्ये निर्यात केली आहे. निर्यात करताना सदर रोपे पिशवीतून पूर्णपणे काढून निर्जंतुक करून सप्तामृताच्या द्रावणात रोपे एक तास बुडवून ठेवली. नंतर रोपाचे मुळाभोवती कापसाची गुंडाळी केली व ती जर्मिनेटर १ लिटरला ३० मिली या द्रावणामध्ये बुडवली व निथळून काढून १० रोपाचा एक बंच व १० बंचचा एक गठ्ठा असे ४ गठ्ठे करून पॉलीथीनमध्ये पॅक करून पूठठ्याच्या वेष्टनातून निर्यात केली. दोन दिवसानंतर सदर रोपे बहारीनमध्ये मि. अे हकीम अल सूमारी, U.S. अम्बॅसेडर H.E. Joseph Adam व त्यांची पत्नी मि. यायंक मलीक त्यांचे हस्ते लागवड केली आहे. त्यांचा संदर्भसाठी पान नं.६४ वर फोटो दिला आहे.