७८६ पपईची रोपे दोन फवारण्यात १ ॥ महिन्यात ३ फूट

श्री. विनोद प्रल्हादराव तोंडे, मु. टकारवाडी, पो. नित्रुड, ता. माजलगाव, जि. बीड,
मो. ९९२३२८१६२८


तैवान पपईची रोपे आणून त्यांची काळ्या जमिनीत ८' x ५' वर २० डिसेंबरला लागवड केली. पाणी बोअरचे ठिबकद्वारे देतो. लागवडीच्या वेळी तसेच त्यानंतर फेब्रुवारी अखेरपर्यंत खूप थंडी असल्याने रोपांची वाढ पुर्ण थांबली होती. शिवाय रोपे मरगळल्यासारखी दिसत होती.

त्यावेळी कळंब येथील श्री. काळे यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती देऊन जर्मिनेटर मुळ्यांपर्यंत (ड्रेंचिंग) जाईल असे सोडण्यास सांगितले. त्यासाठी जर्मिनेटर ५०० मिलीचे १०० लि. पाण्यात द्रावण तयार करून प्रत्येक रोपांच्या मुळाशी २५० मिली द्रावण सोडले असता पांढरी मुळी (जारवा) वाढून रोपांची अन्नग्रहण करण्याची क्षमता वाढली. त्यामुळे वाढ सुरू झाली. त्यानंतर पुन्हा २० दिवसांनी पुर्ण सप्तामृत औषधांची फवारणी केली. तर रोपे जोमाने वाढू लागली. पाने निरोगी, सशक्त, जाड तयार होऊन रुंद झाली.

लागवडीनंतर जानेवारी अखेरपर्यंत दीड महिन्याची रोपे होऊनही वाढ एक फुटापेक्षा अधिक नव्हती. तीच त्यानंतर दीड महिन्यात २ फवारण्यात तीन फुटाची झाली आहेत. या अनुभवावरून पुढील फवारण्या नियमित घेणार आहे. तसेच औषधे खरेदी करण्यासाठी आमच्या गावापासून लांब (कळंबला) जावे लागत असल्याने दिलरशीप घेण्याचा विचार आहे.