१५ गुंठ्यात २ लाख ३ हजार रू. उत्पन्न

श्री. अशोक आनंद ठोंबरे, मु. पो. वाटेगाव, ता. वाळवा, जि. सांगली.
मोबा. ९९६०७५५५४०


मी अल्पभूधारक शेतकरी असून माझ्याकडे स्वत: ची फक्त १५ गुंठे एवढीच जमीन आहे.

तरीदेखील मी दरवर्षी वेगवेगळी पिके गेऊन जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे वेगवेगळ्या पिकांबद्दल व औषधांबद्दल मी सतत माहिती गोळा करत असतो. हे करत असतानाच मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने प्रतिनिधी श्री. उमेश कापसे (मोबा.९८९०६६९०८३) भेटले. त्यांनी माझी जमीन पाहून मला पपई लागवडीबद्दल विशेष करून व्हायरस नियंत्रणाबद्दलची माहिती दिली. कारण आमच्या भागातल्या आजपर्यंतच्या बाग व्हायरसने पुर्णपणे वाया जात असल्याचे मी पाहिले होते.

म्हणून धाडसाने मी माझ्या १५ गुंठे क्षेत्रावर पपई लागवड करण्याचे ठरवले. त्याकरता ज्या नर्सरीमध्ये जर्मिनेटरचा वापर करून रोपे वाढवली जातात त्या नर्सरीमधून रोपे आणली व ५ x ५ फुटावर एक रोप अशी ६०० रोपे झीग - झॅग पद्धतीने दि.२३ - ९- २००८ रोजी लावली. दुसर्‍या दिवशी त्याला जर्मिनेटरची आळवणी घातली. त्यामुळे रोप मरीचे प्रमाण अजिबात आढळते नाही. रोपांची वाढही अतिशय चांगली दिसून येत होती. त्यानंतर २५ दिवसांनी सप्तामृताची प्रत्येकी ३० मिली प्रतिपंपास घेऊन फवारणी केली व रासायनिक खतांचा एक डोस दिला. पपई दीड महिन्यांची असताना परत एकदा साप्तामृताची एक फवारणी केली. तेवढ्यावरच झाडे कंबरेच्या वर दिसू लागली.

पाने रुंद होऊन खोडाची जाडीही वाढल्याचे दिसून आले. नंतर दीड महिन्याने प्रत्येकी ५० मिलीची आणखी एक फवारणी केली. त्यानंतर झाडांची चाध सशक्त दिसून आली, तसेच फुलकळीही झाडावर दिसायला लागली.

नंतर २ - ३ झाडांवर व्हायरस आल्यासारखे वाटायला लागल्यावर न्युट्राटोनचे प्रमाण पंपास ६० मिली घेऊन सप्तामृतासह फवारणी केली. त्यामुळे व्हायरस गेलाच, शिवाय फुलकळीचे प्रमाण वाढून फुलगळ अजिबात आढकली नाही. पुढे फळ पोसण्यासाठी दर महिन्यास एक फवारणी घेतली. तर झाडावर जमीनीपासून १ ते १॥ फुटावरूनच फळे लागून फळांचे पोषण चांगले झाले.

रमजानचा भाव जागेवर १२ ते १४ रू./ किलो

१५ मे रोजी पहिला तोडा केला. फवारणीमुळे मालाचा दर्जा व टिकाऊपणा खूप वाढला होता. त्यामुळे दलाल आमच्या मालालाच जास्त पसंती देत होता. दलाल जागेवरूनचस रासरी १२ रू. किलोने माल नेत होता.

रमजानमध्ये तर मला जागेवरच १४ रू. दर मिळाला. एकूण २२ तोडे झाले. सरासरी एका तोड्यास १.५ टन माल मिळाला. केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळेच माझ्या प्लॉटमध्ये उभट फळांचे प्रमाण जास्त राहिल्याने इतर सर्वांपेक्षा मला दरही जास्त मिळाला. तसेच मला पपईमध्ये आंतरपीक टोमॅटोचेही ३२,००० रू. मिळाले.

एकूण खर्च २२,००० रू. मला पपईसाठी आला असून एकूण उत्पन्न २ लाख ३ हजार रू. मिळाले. हे केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळेच शक्य झाले.

आता मी त्याच बागेत नवीन पपईचीच बाग धरणार आहे. कारण आता मला आपल्या टेक्नॉंलॉजीमुळे पपई उत्पादनाचे टेक्नीकच मिळाले आहे.

या कमी मला माझा पुतण्या श्री. सुनिल ठोंबरे (अॅग्री डिप्लोमा) याचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.