पपईच्या २००० झाडांचे २ लाख रुपये उत्पन्न
श्री. महादेव वासुदेव मळे, मु. पो. शिरळा (टेंभुर्णी) ता. माढा, जि. सोलापूर
आम्ही २० ऑगस्ट २००० रोजी ७८६ तैवान या जातीच्या पपईची २००० झाडांची लागवड ६ x ७ फुटावर
केली होती. जमीन मध्यम काळी आहे.
फुले लागल्यानंतर पूर्ण सप्तामृत औषधांची पहिली फवारणी केली असता फुलगळ झाली नाही. फळे एप्रिल अखेर चालू झाली. फळे चांगली मिळाली. फळांवर कोणतीही विकृती आली नाही. फळे भरपूर मिळून त्यावर चकाकीही चांगली होती. त्यानंतर परत सप्तामृत औषधांची फवारणी केली. त्यामुळे हवामान खराब असूनही झाडे व्यवस्थित होती.
आमचे मित्र श्री. आबासाहेब जगताप यांनीही पपईकरिता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे वापरली आहेत. सुरुवातीला माल आंब्याच्या हंगामात आल्यामुळे त्यांना ३ रुपये किलोप्रमाणे दर मिळाला होता. परंतु नंतर आंबा संपल्यामुळे व पाऊस नसल्याने इतर फळांना चांगला दर मिळत होता. पपईलाही ८ रूपये किलो प्रमाणे दर मिळून चांगले उत्पन्न मिळाले. उन्हाळ्यात लागलेली फळे गोल असून चवीला गोड मिळतात. तर हिवाळ्यात लागलेली फळे लांबलचक असतात असा आमचा अनुभव आहे.