रोगट पिवळा ७८६ प्लॉट डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दुरुस्त होऊन गावातील जाणकार लोक भेट देतात
श्री. गोपाळ भास्कर निकम, मु. पो. उंदीरखेडा , ता. पारोळा, जि. जळगाव.
फोन नं. (०२५८७) २२३४९०
मी ऑक्टोबर २००६ मध्ये तैवान ७८६ पपईची लागवड मध्यम काळ्या जमिनीत ५' x ६' वर केली
एकूण १००० झाडे आहेत. याला सुरुवातीला रासायनिक खते दिली होती. नंतर पपईचा प्लॉट ३
महिन्यांचा असताना झाडाची पाने पिवळसर पडून आकसू लागली. गावामध्ये
याअगोदर ज्यांनी पपई केली होती त्या शेतकऱ्यांनी बागेची पाहणी केल्यावर
ते म्हाणाले, " या बागेस व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. आता ही बाग उपटून टाकावी
लागणार, " त्यामुळे मी निराश झालो. मला वाटू लागले एवढा खर्च केलेला पाण्यात (वाया)
जातो कि काय? मात्र सुदैवाने याच काळात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या प्रतिनिधींची भेट
झाली. त्यांनी आधार देऊन हा खराब झालेला प्लॉट सुधरविण्यासाठी पंचामृत, प्रिझम, न्युट्राटोन
फवारण्यास सांगितले. त्यानुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या केल्या.
त्याने पानांचा पिवळटपणा जाऊन पाने रुंद झाली. नवीन फुट हिरवी निघाली. पुढे फुलकळी
लागून फलधारणाही चांगली झाली. त्याचे आतापर्यंत दोन तोडेही केलेत. पपई पारोळा, अमळनेर
मार्केटला विक्री केली असता, माल चांगला असल्याने भावही समाधानकारक मिळाला. आता माझा
खराब प्लॉट सुधारलेला पाहण्यासाठी गावातील जाणकार शेतकरी येत आहेत.