पपईस एक नंबर भाव सर्व पिकांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर

श्री. दिलीप बबनराव दौंड, मु. पो. पसरणी, ता. वाई, जि. सातारा.
मो. ९७६४७६८७६६


मी २००४ मध्ये पपई संदर्भात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, पुणे ऑफिसमध्ये माहिती घेण्यासाठी आलो असता त्यांनी पपईला थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन, प्रोटेक्टंटची माहिती दिली. पपईची पाने पिवळी पडली होती. पाऊस जास्त प्रमाणात झाल्याने झाडे उन्मळून पडत होती. त्याकरिता माहितीप्रमाणे वरील औषधे प्रत्येकी १ - १ लिटर घेऊन गेलो. त्याची लगेच पहीली फवारणी केली असता प्लॉटमध्ये सुधारणा होत असल्याचे दुसर्‍या दिवसापासून जाणवू लागले, म्हणून पुन्हा दुसरी फवारणी ३ दिवसांनी केली. आठवडाभरात पुर्ण प्लॉट पुर्ववत झाला. त्यानंतर पुन्हा सप्तामृत औषधे १ - १ लिटर आणि कल्पतरू सेंद्रिय खताच्या २ बॅगा घेऊन गेलो. फुलकळी लागताना खताचा डोस देऊन नंतर दर १५ - २० दिवसांच्या अंतराने ३ फवारण्या केल्या. तेवढ्यावर फुलकळी लागून तिची गळ न होता मालाचे पोषण झाले. हा माल विक्रीसाठी पुणे मार्केटला आणला असता फळांचा दर्जा उत्तम मिळाल्याने भाव एक नंबरचा मिळाला.

तेव्हापासून आजपर्यंत सर्व पिकांना डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरीत आहे. 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा लावला आहे. तसेच ऑक्टोबरमध्ये कांदा लागवडीसाठी ३ किलो बियाणे आणि बीजप्रक्रियेला जर्मिनेटर औषधे घेऊन गेलो. ३ किलो बी १०० मिली जर्मिनेटर + ५० ग्रॅम प्रोटेक्टंट + ३ लि. पाणी या द्रावणात ४ तास बुडवून सावलीत सुकवून टाकले असता, उगवण ९० % हून अधिक झाली. या रोपांवर २ फवारण्या सप्तामृत औषधांच्या केल्या, तर पात पिवळी पडली नाही. तेजदार रोप सव्वा महिन्यात लागवडीस आले.

आज कांद्याची लागवड चालू आहे. १० लि. पाण्यामध्ये २५० मिली जर्मिनेटर आणि १०० ग्रॅम प्रोटेक्टंट घेऊन या द्रावणात रोपे बुडवून काढून लागवड करत आहेत.

लसूण, कांदा, ऊस या पिंकासाठी आज कल्पतरू सेंद्रिय खताच्या ४ बॅगा आणि जर्मिनेटर १ लिटर घेऊन जात आहे. बाकीच औषधे शिल्लक आहेत. इतर शेजारच्या लीकांची रोपे अजून लागवडीयोग्य नसल्याने ते कांदा रोप पाहून आश्चर्य चकित होत असत.