एक्सपायर बियाण्याची ५० % उगवण

श्री. बाळू मुरलीधर डोंगरे, मु. पो. पांगरी, ता. अकोले, जि. अ. नगर,
फोन - (०२४९४) २४८०७२


तैवान ७८६ बियाची २ पाकिटे घेतली होती. बियाणे एक्सपायर झालेले होते. त्याला जर्मिनेटर वापरले, तर ५० % म्हणजे ६०० रोपे तयार झाली . बी लावताना पिशवीत पोयट्याची तांबडी माती आणि कुजलेले शेणखत टाकले. बी उगवल्यानंतर रोपे २- ३ पानावर असताना सप्तामृत औषधांची फवारणी केली. नंतर १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या केल्या. रोप तयार होण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी लागला. नंतर रोपांची लागवड जून २००३ मध्ये केली, ट्रॅक्टरची तासे मरून त्यात ६ x ६ फुटावर खड्डा करून त्यात शेणखत व सिंगल सुपर फॉस्फेट टाकले. नंतर रोपे जर्मिनेटरच्या द्रावणात भिजवून लागवड केली. लागवडीनंतर रोपांवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी १ फवारणी केली आहे.

सध्या झाडे ३ ते ३॥ फुट उंचीची झाली असून जोमदार व टवटवीत हिरवीगार आहेत. २ - ३ झाडावर पिवळटपणा आला आहे. त्यासाठी सप्तामृत ५०० मिलीचा डोस घेऊन जात आहे. ह्यामध्ये दोन फवारण्या होतील.