जर्मिनेटर मुळे पपईची ८०% उगवण

श्री. प्रभाकर पांडुरंग भोसले, मु. पो. भुईज, ता. वाई, जि. सातारा.


आमची ९ एकर शेती असून आम्ही टोमॅटो, ऊस , आले, हळद, पपई अशी सर्व प्रकारची पिके घेतो, परंतु पपईच्या संदर्भात आमचा अनुभव फार वेगळा आहे. तो म्हणजे एरवी तैवान पपईचे बी लावले तर जास्तीत जास्त उगवण ६०% व्हायची, परंतु आम्हाला योगायोगाने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती मिळाल्यामुळे आम्ही प्रथमच जर्मिनेटरचा बीजप्रक्रियेसाठी वापर केला. तर आम्हाला ८०% उगवण झाल्याचे आढळले शिवाय उगवण एकाच वेळी होऊन, मर न होता रोपे टवटवीत तयार झाली महणजे जागेवरच आमचे ३०% बियाणे वाचले. हे बियाणे खूप महाग आहे. त्यामुळे जर्मिनेटर चा आम्हाला चांगला फायदा झाला. खरोखरच जर्मिनेटर हे एक वरदानच आहे.