सध्या ४००० बी रोपांसाठी (७८६) जर्मिनेटरची प्रक्रिया करून टाकले आहे. त्याला पुर्ण तंत्रज्ञान सुरूवातीपासून वापरणार आहे

श्री. रमेश पांडुरंग नाखले सर, (M. Sc.) कारंजा लाड (बाशिम),
फोन (०७२५६) २२२४१४


आम्हाला ५ एकर पपई लागवड करायची आहे. लागवडीपुर्वी जमिनीत चुबूक काटे (विचूक) हे तण असल्याने तणनाशकाची फवारणी केली तर चालेला का? असे सरांना विचारले असता, सरांनी सांगितले तणनाशकाची फवारणी केल्यानंतर किमान १५ दिवसांच्या अगोदर लागवड करू नका. कारण त्याचा पपईच्या नाजूक रोपांवर विपरीत परिणाम होईल. तेव्हा यावर उत्तम उपाय म्हणून जे फुलोऱ्यात तण आहे. ते विळ्याने कापून काढावे व बुडखे आणि इतर लहान तण ट्रॅक्टरने नांगरून गाडून टाकावे.

या क्षेत्रासाठी ३ किमीवरून पाईपलाईन करून पाणी आणले आहे. पण ठिबकला प्रेशर येत नाही. त्यामुळे पाट पाणी देतो. सरांनी सांगितले विदर्भात उष्णाता जादा असल्याने फळावरील पपईला ५ दिवसांच्या अंतराने कमीतकमी ६० लि. पाणी लागेल. तेव्हा पाट पाणी देणे चांगले.

पुसदच्या (यवतमाळ) सुरेश पाटील यांच्या शेतावर ५ - ६ वर्षापूर्वी सरांनी सकाळी ७ वाजता भेट दिली असता तेथे ४२ डी. सें. ला पपई प्लॉटला ठिबक केले होते. या प्लॉटला पाणी कमी पडत होते. तसेच प्रतिकुल वातावरणामुळे झाडांवर रोग आला होता. सरांनी डॉ.बावसकर तंत्रज्ञान फावारायला सांगितले असता त्यांनी वापर न केल्याने शेवटी बाग वाया गेला.

रासायनिक खत आणि कोंबड खताबद्दल सरांना विचारले असता सरांनी सांगितले, पपईला शक्यतो रासायनिक खते देऊ नयेत. ओल्या पालापाचोळ्याचे आच्छादन करावे. पोल्ट्री खत तसेच शेळी. मेंढी, डुकराची लीद देऊ नये, कारण उन्हाने या खतातील अमोनिया (NH3) पिकास घटक ठरतो. जर ते वापरायचेच झाले तर १०० कि. पोल्ट्री खत संपूर्ण कुजलेल्या १ टन शेणखातात मिसळून वापरावे. निव्वळ तारेच्या पिंजऱ्यातून खाली पडलेले जसेच्या तसे कोंबडखत वापरू नये. अशा खतातील अमोनिया शेणखताने जरो आडून राहिला तरी बाष्पीभवन होऊन पपईची कोवळी पाने फाटतील व कर्दळून जातील. असाच प्रतिकुल हवामानाचा विपरित परिणाम श्री. भास्कर डुंबरे, जुन्नर, पुणे यांच्या पपईवर होऊन झाडाची पाने पिवळी पडून फळे अपक्व राहून साल मऊ पडली होती. अशी पपई डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी (न्युट्राटोन व प्रिझमसह) वापरून नवीन शेंडा फुटून लागलेल्या पपईचे पोषण झाले. तसेच नवीन फुलकळी व मालही लागला.