गारपीटीने खलास झालेली केळी आणि पपईची बाग सुधारली

श्री. सय्यद मोहीयोद्दीन आळंदीकर (से. नि. नायब तहसीलदार), मु.पो. आळंदी, ता. बिलोली, जि. नांदेड
फोन नं. (०२४६३) २५५७५८


माझ्याकडे एकूण साडेअकरा एकर क्षेत्र विहीर बागायत आहे. टिश्यू कल्चर केळीसाठी जर्मिनेटर वापरले. ६' x ८' वर मृग बहाराची केळी जुनला ४ एकरमध्ये लावली होती. कल्पतरू सेंद्रिय खत प्रत्येक खोडला २०० ग्रॅम ३ वेळा वापरले. ३० पोती कल्पतरू खत नेले होते. याला १ महिन्यापासून ३ ते ४ वेळा फवारणी केली. ७ - ८ महिन्यात कमळ निघाले. गारा दिवाळीच्या वेळेस पडल्या. त्यामुळे घडांना डाग पडेल. बागवानाने बाग पहिला आणि तो म्हणाला, "बाग गाय कामसे । " अशा अवस्थेत ३ फवारण्या जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर आणि प्रोटेक्टंटच्या १५ दिवसांच्या अंतराने पंपाला प्रत्येकी ६० मिली घेऊन केल्या. २० पंप लागत होते. आश्चर्य म्हणजे डाग पडलेली केळी पूर्ण सुधारली. मग त्याचा बागवानाला पुन्हा बोलविले, तर तो म्हणाला, "गया हुआ बाग क्या देखनेका ?" परंतु मी त्यांना सांगितले एकदातरी बधून घ्या आणि माल नको असेल तर तुम्ही दिलेला अॅडव्हान्स परत करतो.

सुरुवातीला (गारा पडण्यापुर्वी) त्याने अॅडव्हान्स दिला होता. तर तो बाग परत पाहिल्यानंतर डाग पुर्ण जाऊन केळी पोसलेली पाहून तो अॅडव्हान्स परत न घेता मालच द्या म्हणाला. भाव अगोदर ३०० रू. क्विंटलचा ठरवून दिला होता. बाहेर मात्र गारपीटीने बागा गेल्याने चांगल्या मालाला ४०० ते ४५० रू. क्विंटल भाव होता. मात्र आम्ही गारपीटीपुर्वी व्यवहार केल्याने ठरल्याप्रमाणे ३०० रू, ने केळी दिली. ३० ते ४० किलोचे घड होते. गारपीट होऊनही त्याच बागेचे २॥ ते ३ लाख रू. झाले.

पपई : पपई ४ - ५ वर्षापासून करत आहे. गेल्या २- ३ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत आहे. मागच्या जूनमध्ये १ एकर पपई लावली होती. ६ ' x ८' वर लागवड ड्रीप वर केली. साध्या वाफ्याच्या हुंडीवर लागवड केली. कल्पतरू सेंदीय खताची ४ पोती २ टप्प्यात दिली. लागवडीच्यावेळी खड्ड्यात ५० - ५० ग्रॅम कल्पतरू खत दिले. गारपीटीमुळे सुई किंवा दाभण मारल्यासारखे फळावर डाग पडले होते. त्यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे २- ३ वेळा फवारली. पहिल्या फवारणीने डाग कमी झाले आणि दुसरी फवारणी १५ दिवसांनी केली तर त्याने पूर्ण डाग गेले. झाडावर ५० - ६० फळे होती. पपईचे क्षेत्र १ एकरला कमी असूनही त्यापासून १ लाख रू. झाले.

रमजान संपल्यावर माल चालू झाला. निजामाबाद, हैद्राबादला माल पाठविला. ४-५ रु. किलो ने गेला.

दुसर्‍या बहारला (पपईच्या खोडव्याला ) ५०-६० फळे आहेत. मे-जून २००५ मध्ये फुले,फळे लागती,फळे १॥ किलोची आहेत. पाने सशक्त आहेत. फुले चालूच आहेत. पाने नवीन येत आहेत. गारपीटीने पाने गळून गेली. नवीन पाने शेंड्याला फुटत आहेत. ज्यावेळेस बाग गारपीटीत सापडला तेव्हा बागेची अवस्था फार वाईट होती. तेव्हा बागवानाला केळी सोबत पपईही घेऊन जा असे सांगितले. पण तो त्यावेळेस म्हणाला, केळीच चालत नाही तर पपईचे काय करू ?

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची पूर्ण औषधे वापरत आहे. कल्पतरू खत नांदेडला मिळत नसल्याने पुण्याहून नेणार आहे. हा माल (दुसर्‍या बहाराचा) रमजानला चालू होईल. रमजानला माल निघावा म्हणून राईपनरचे प्रमाण थोडे वाढवून फवारले. आता हा माल बागवानाला न देत स्वत: मालाची विक्री करणार आहे. मागे यापुर्वी या तंत्रज्ञानाचा वापर करत नव्हतो तेव्हा पपई सपक लागत असे मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी औषधे वापरली तर पपई स्वादिष्ट व गोड लागते. घरच्या मंडळींनी ही पपई कुठली आहे, असे विचारले. त्यांना सांगितले आपल्याच शेतातील आहे.

मी कृषी विज्ञान मासिकाची वार्षिक वर्गणी भरली आहे. अंक नियमित वाचत असतो. त्यातून नवीन - नवीन प्रेरणा मिळते.