कडक उन्हाळ्यात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे ७८६ पपईची ६०६२ झाडे छातीबरोबर

श्री. भटू सखाराम चौधरी, मु. पो. कुडावद, ता. शहादा, जि. नंदुरबार,
फोन - (०२५६५) २५०२२८


७८६ पपईचे ७ हजार बी लावले. ६०६२ रोपे जगली. लागवड ७ एप्रिलची तर काही २४ एप्रिलची आहे. उन्हाळ्यात पाने पिवळी पडली होती. त्यावर थ्राईवर, क्रॉंपशाईनरची फवारणी केली, मरीचे व पिवळी पडण्याचे प्रमाण कमी झाले. पपईसाठी सरांनी सांगितलेले न्युट्राटोन वापरणार आहे. काही पपई छाती एवढी तर काही त्याहून लहान आहे.

पपई नोव्हेंबरमध्ये सुरू होईल पण रमजान १ महिना अगोदर असल्यामुळे न्युट्राटोन, प्रिझम, राईपनर वापरून १ महिना लवकर काढणार आहे आणि १ लाख रू. चा संकल्प सरांनी सांगितला तो मला पार पाडायचा आहे.

पश्चिम दिशेला बांधाला लागून ८॥ एकर शेत एप्रिलमध्ये घेतले आहे. शेताच्या पश्चिमेस औदुंबराचे झाड आहे. औदुंबराच्या शेजारी पाणी असते. शेतात ७ - ८ बोअर आहे. त्यातील ४ - ५ बोअरला पाणी चांगले आहे.

बोअर एरिगेशन असले तरी आम्हाला फ्लडने पाणी द्यावे लागते. आमचा भाग आदिवासी असल्याने ठिबकाच्या नळ्या. मायक्रोट्यूब, लॅटेरल रोज चोरीला जातात आणि या वैतागापायी आम्ही दगडापेक्षा वीट मऊ म्हणून बोअरचे पाणी काढून पपई आणि केळीला पाटाने देत आहोत. आपले तंत्रज्ञान गेली दहा वर्षापासून वापरत असल्यामुळे कमी पाण्यावर देखील उत्कृष्ट पपई येईल अशी खात्री आहे.

२१ एकर आपल्या टेक्नॉंलॉजीवर कापूस केला आहे. १ महिना पावसाने उघडीप दिली आणि आज २२ / ०७/ ०४ ला सकाळी दीड तास पाऊस झाला त्यामुळे मी आपल्याला फोन केला.

वाया गेलेल्या पपईस फळे व खोडवाही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे

अकाली पाऊस, गारपीट, अती उष्ण, अति थंड हवामानामुळे फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. या काळात पपई ६ ते ७ महिन्याची असते. तेव्हा गारांच्या मुसळधार पावसाने पाने फाटतात. फळात बुरशी होते. पाने गुंडाळली जातात. वाऱ्याने छत्रीचे कापड उलटल्यावर काड्या दिसतात तशी पाने होतात. ७५ हजारापासून ते लाखो रोपायांचे नुकसान होते. अशा अवस्थेत फळे अपक्व. पपईचे तोंड निमुळते राहून पोसली जात नाही.

प्रतिकुल परिस्थितीत रोगाच्या झालेला प्रादुर्भावाने पाने जरी तुटली असली तरी त्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पंचामृत, प्रिझम, न्युट्राटोनमुळे नवीन पालवी फुटून शेतकऱ्यांच्या आशेला पालवी फुटते आणि खालची मोठी, हिरवी पाने पावसाच्या माऱ्याने फाटतात. आती उष्णतेने देठ सुकून सनकाडीच्या (तागाच्या) पिपाणीसारखे होऊन गळून पडतात. पाने फाटून गल्ल्याने हरीतद्रव्ये तयार न झाल्याने लागलेली फळे पोसत नाहीत आणि अशा रितीने २ लाखापासून ५ लाखापर्यंत नुकसान होते.

श्री भास्कर लक्ष्मण डुंबरे, मु. पो. डुंबरेमळा, ता. जुन्नर (पुणे) यांच्या प्लॉटमध्ये अशी अवस्था झाल्यानंतर पंचामृत, प्रिझम, न्युट्राटोन, कल्पतरू सेंद्रिय खत १५ ते २० दिवसात ३ ते ४ वेळा सल्ल्यानुसार वापरली तर वाया गेलेली पाने सुधारली नाहीत, मात्र फळे चांगली पोसली, तसेच नवीन सशक्त पाने शेंड्याला निघून त्याला फुले, फळे लागली. (संदर्भ - कृषी विज्ञान, जून २००५ कव्हरवरील फोटो) हा एक विज्ञानाला घडलेला चमत्कार आहे. ह्याची मुलाखत सह्याद्री वाहिनीवरून गाव शिवार या कार्यक्रमात पुणे, सोलापूर, सतार, अहमदनगर जिल्हयातून ३ ते ४ वेळा प्रक्षेपीत झाली.

तेव्हा या अनुभवांनुसार अशा परिस्थितीत आम्ही पपईसाठी सप्तामृत औषधे फवारतो. सरांनी संगितल्याप्रमाणे पहिले ४ - ४ मिलीचे दोन आणि ५ मिली (प्रति लि. पाणी) चा एक असे तीन स्प्रे घेतले की पीक पुर्णता रोगमुक्त होते आणि खात्रीशीर उत्पादन मिळते. त्यामुळे इतर औषधांवरील खर्च वाचतो.