पपईवरील किडी व रोग आणि त्यांचे नियंत्रण
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
पपईच्या किडी :
भारतात पपईच्या झाडांना किडीपासून फारसा उपद्रव होता नाही.
१) मावा : मावा कीटक लहान व हिरव्या रंगाचे असतात. हे कीटक जमावाने राहतात आणि पाने, फुले व कोवळ्या शेंड्यातील रस शोषून घेतात. या किडीमुळे विषाणू रोगाचा पपईच्या झाडावर प्रसार होतो. म्हणून या किडीचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक असते.
२) अळी : काही ठिकाणी कधी कधी Dasyses Rugo -Sellus नावाची अळी पपईच्या झाडाचे खोड पोखरते.
या दोन्ही किडींच्या नियंत्रणासाठी सप्तामृतात प्रोतेक्टंट आणि हार्मोनीचा वापर वेळापत्रकानुसार करावा.
३) लाल कोळी (Mite) : ही कीड पानांच्या खालील बाजूस जमावाने आढळते. पानांतील रस शोषून घेते. त्यामुळे पाने पिवळी पडतात. या किडीचे अस्तित्व समजते. कधीकधी झाडावरील पिकणार्या फळांच्या पृष्टभागावर ही कीड आढळते. त्यामुळे फळाची सा खडबडीत व अनैसर्गिक तपकिरी रंगाची दिसते. कीड इतकी लहान असते की, ती केवळ भिंगातून दिसते.
उपाय : गंधकाची कोरडी भुकटी पानांच्या खालच्या बाजूवर धुरळावी. तसेच प्रोतेक्टंट २ ग्रॅम आणि हर्मिनी २ मिली/ लि. पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
४) सूत्रकृमी (नेमाटोड): पपई झाडाच्या मुळ्यावर गाठी करणार्या सुत्रकृमी आणि 'रनीफोर्म' सूत्रकृमी पपईच्या झाडांचे फार नुकसान करतात.
सूत्रकृमीमुळे पपईची झाडे खुरटी वाढतात आणि त्या झाडांना फळे कमी लागतात. पपईचे मूळ पाण्यात स्वच्छ घुऊन तपासल्यास त्या मुळावर वाळूच्या कणाप्रमाणे सूत्रकृमी चिकटलेली दिसतात.
उपाय :
१) सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी रासायनिक उपाय म्हणजे प्रति हेक्टरी ३ क्विंटल इथिलीन डायब्रोमाईड जमिनीत मिसळून देणे.
२) किंवा प्रत्येक झाडाभोवतीच्या जमिनीत २० ग्रॅम फ्युराडान मिसळून द्यावे.
३) निंबोळी, करंज, एरंडी पेंड जमिनीत मिसळावी.
४) बागेत झेंडूची झाडे लावावीत.
पपईरील रोग :
पपईच्या झाडांना पायकूज किंवा बुधा सडणे, मर, करपा, भुरी व विषाणू रोगांची बाधा होते.
१) पायकूज (Foot Rot ) किंवा बुंधा सडणे (Collar Rot) : Pythium Aphanidermatum या बुरशीमुळे हा रोग होतो. तो विशेषत : ऑगस्ट, सप्टेंबर (पावसाळ्यात) ऑक्टोबर (भाद्रपद) आणि फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या महिन्यांत आढळतो. ज्या जमिनीतून पाण्याचा निचर चांगला होत नाही अशा जमिनीतील झाडांवर या रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. रोगाची बुरशी जमिनीत असते.
रोगाची लक्षणे: जमिनीच्या पृष्ठभागालगत झाडाचे खोड असते. तेथे (बुंध्यावरील) सालीवर स्पंजी व पाणी शोषलेले चट्टे दिसतात. त्याच वेळी झाडाच्या शेंड्यावरील पाने खाली वाकतात, सुकतात, पिवळी पडतात आणि अकाली गळून पडतात व रोगामुळे फार नुकसान होते.
उपाय : १) सुसळधार पाऊस सुरू होण्यापूर्वी पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोदून तयार करावे. म्हणजे बागेत अवाजवी पाणी साचून राहणार नाही. रोगाचा प्रसार होणार नाही.
२) झाडाच्या बुंध्याभोवती मातीची भर घालावी. म्हणजे सिंचनाचे पाणी बुंध्याजवळ साचणार नाही. झाडांना जास्त पाणी देऊ नये.
३) खोल आंतरमशागत करू नये.
४) रोगाची लक्षणे दिसताच रोगाची बाधा झालेला खोडावरील भाग खरडून काढावा आणि तेथे बोर्डो पेस्ट लावावी.
५) प्रतिबंधक उपाय म्हणून एक टक्का बोर्डो मिश्रण किंवा एक लिटर पाण्यात २ ग्रॅम कॉपर ऑक्सीफ्लोराईड मिसळून त्या द्रावणाची झाडाच्या बुंध्याजवळ फवारणी करावी, म्हणजे रोगाचा पुढे प्रसार होणार नाही.
६) जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम आणि हार्मोनी २०० ते २५० मिली १० लि. पाण्यातून फवारावे.
२) मर किंवा मुळ्या सडणे (Wilt or Root rot): या रोगाचे कारण Phytophthora Palmivora ही बुरशी आहे. मुळ्या सडल्याने झाडे मरतात. रोपवाटिकेत Rhizoctonia Solani आणि Fusarium Spp. या बुरशीमुळे पपईची रोपे मरतात. बुरशी जमिनीत वाढते.
उपाय : १) पेरणीपूर्वी पपईच्या बियांवर जर्मिनेटर + प्रोटेक्टंटची प्रक्रिया करावी.
२) रोपवाटिकेतील वाफे बुरशीरहित करण्यासाठी वाफ्यात वाळलेली पाने पसरून जाळावी किंवा वाफ्यात बी - पेरणीच्या दोन आठवडे आधी फार्माल्डीहाइडची फवारणी करावी आणि ताम्रयुक्त बुरशीनाशकाने वाफ्याची जमीन भिजवावी.
३) करपा (Anthracnose) : या रोगांनी बाधा Gloeosporium या बुरशीमुळे होते. या बुरशीमुळे पिकलेली फळे सडतात.
या रोगामुळे फळांच्या पृष्ठभागावर गोलाकार, तपकिरी, सपाट किंवा खोलगट चट्टे पडतात. अशीच रोगाची लक्षणे Colletotrichum glocosporioides बुरशीमुळे दिसतात. हा रोग प्रामुख्याने हिरव्या व न पिकलेल्या फळांवर आढळतो.
उपाय : १) रोगाची बाधा झालेली फळे व पानांचे देठ काढून टाकावेत.
२) हिवाळ्यात दक्षिणेकडील सूर्यकिरणांचे चटके बसून या रोगाचा प्रादुर्भाव होतो. फळे मऊ बनतात. म्हणून फळे तपकिरी रंगाच्या कागदाने झाकावीत किंवा फळाभोवती पॉलिथीन कागद गुंडाळावा.
३) खोडावर करपा रोग आढळलयास त्या भागावर आणि त्याच्या बाजूला थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५०० मिली आणि हार्मोनी २०० मिली १०० लिटर पाण्यात मिसळून त्या द्रावणाची फवारणी करावी. त्यानंतर फळे कागदाने झाकावीत.
४) भुरी (Mildew) : पपई पानावरील भुरी रोग (Oidum Caricae आणि Ovulariopsis Papayae ) या बुरशीमुले होतो. कमी तापमान व जात दमटपणा यामुळे रोगाचा प्रसार होतो.
उपाय : ५०० लिटर पाण्यात २ किलो पाण्यात मिसळणारे गंधक यांच्या द्रावणाची फवारणी १५ दिवसांच्या अंतराने पानावर करावी किंवा सप्तामृतासोबत हार्मोनी २०० ते २५० मिली १०० लि. पाण्यातून फवारावे.
५) विषाणू रोग :
१) पपया मोझाईक रोग (Mosaic) : या रोगाला पपया रिंगस्पॉर्ट व्हायरस (PRV) रोग म्हणतात. हा पपईवरील भयानक रोग असून त्यामुळे झाडे मरतात. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे अनेक विभागात पपईची लागवड करणे अवघड होते. या रोगामुळे महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार या राज्यातील पपई फळझाडांचे फार नुकसान होते.
भारताच्या उत्तर पूर्व विभागात हवामान दमट असते आणि ते विषाणू रोगाच्या प्रसाराकरिता अनुकूल असते. या रोगाने पछाडलेल्या झाडांना फळे लागत नाहीत किंवा कमी फळे लागतात.
रोगाची लक्षणे : साधारणपणे पपईच्या झाडावर पहिली फलधारणा होते आणि फळांची वाढ होते असते, त्यावेळी या रोगाची लक्षणे झाडावर दिसतात.
अ) पाने : १) झाडाच्या शेंड्याची वाढ कमी होते. सुरुवातीला शेंड्यावरील नवीन पानांच्या शिरामध्ये पिवळी चित्रीबित्री रंगसंगती दिसते. पानांच्या कडा वर वळलेल्य दिसतात.
२) नवीन पाने सपाट नसून मुरडलेली व उठावदार पृष्ठभागाची असतात. त्यांचा आकार बदलतो. पानाच्या पाळ्या अरुंद असतात. बहुतेक पानावर शिराच दिसतात.
ब) फळे : १) फळावर बांगडीच्या आकाराचे किंचित उठावदार ठिपके दिसतात. सुरूवातीला ठिपक्याचा आकार १ मिमी असतो.
२) झाडावरील वरच्या फळांची वाढ कमी होते. सामान्य फळांपेक्ष या फळांचा आकर लहान असतो. फळे वेडीवाकडी बनतात. रोगाची बाधा होण्याच्या वेळी फळे पक्व झालेली असल्यास ही लक्षणे दिसत नाहीत.
क) खोड : प्रकाशभेद्य पाण्याने भरलेले किंवा तेलकट ठिपके पानांच्या देठावर आणि खोडाच्या कोवळ्या हिरव्या भागावर दिसतात. तपकिरी ते पिवळे पुरळ खोडावर दिसतात. खोडाच्या हिरव्या भागावर आणि पानांच्या देठावर रेषा दिसतात.
नियंत्रण :
१) विषाणू बाहक मावा किटकांचे नियंत्रण : पपईच्या बागेत एखादे विषाणू रोगाची बाधा झालेले झाड आढळले तर त्या झाडावर किटकनाशकाची फवारणी करावी म्हणजे रोगाचे वाहक मावा कीटक मरतील. त्यानंतर हे झाड उपटून नष्ट करावे. पर्यायी पिके / तणे काढण्यापूर्वी त्यावर किटकनाशकाची फवारणी करावी, म्हणजे त्यावरील मावा कीटक उडून निरोगी पपईच्या झाडावर जाणार नाहीत.
२) स्वच्छता : रोगाची बाधा झालेली सर्व झाडे उपटून टाकावीत म्हणजे त्यांच्या खुंटापासून पुन्हा वाढ होणार नाही. खुंटावर फूट वाढणार नाही. पपईच्या बागेतील व परिसरातील पर्यायी यजमान झाडे काढून टाकावीत.
३) प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम ते १ किलो + १०० ते १५० लिटर पाणी फवारणे.
६) पाने मुरडणे (Leaf Curl ): या विषाणू रोगामुळे पपईच्या झाडाची पाने मुरडतात, पाने वेडीवाकडी होतात आणि पानांचा आकार लहान राहतो. पांढरी माशी या रोगाचा प्रसार करते. या विषाणू रोगाचा प्रसार हळू होतो.
उपाय : १) पांढरी माशी किडीची नियंत्रण करावे. म्हणजे रोगाच्या प्रसाराला पायबंद बसतो.
२) थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५०० मिली आणि हार्मोनी २०० मिलीची १०० लि. पाण्यातून फवारणी करावी.