नागपूर, यवतमाळचे व्यापारी जागेवर पपई रोख खरेदी करत
श्री. जेठन विठ्ठलराव जोगदंड, मु. वरूड, पो. डोंगरखेड, ता. कळमनुरी, जि. हिंगोली,
मोबा. ९८२३३७३०५६
डिसेंबर २००७ मध्ये २ एकर तैवान पपई लावली होती. जमीन मुरमाड आहे. ७' x
७' वर २६०० झाडे लावली होती. पाणी विहीरीचे वाफा पद्धतीने देत होतो. वरंब्यावर झाडे
होती.
सुरूवातीला बीप्रक्रियेला ३ पाकिटांना जर्मिनेटर वापरले होते. तर १००% उगवण होऊन १८०० रोपे तयार झाली होती आणि बाकीचे रोपे विकत आणली होती. दर १५ दिवसाला सप्तामृत औषधांची फवारणी घेत होतो. पपईचे क्षेत्र अधिक असल्याने व्हायरस येऊ नये म्हणून फवारणी चुकवत नसे. ४ थ्या महिन्यात फुलकळी लागली. ५ व्हा महिन्यात फळधारणा होऊन ७ व्या महिन्यात तोड चालू झाला. फुलकळी अवस्थेत थ्राईवर, क्रॉंपशाईनर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. २५० लि. पाणी याप्रमाणे चौथी फवारणी केल्याने फुलगळ झाली नाही. फुलांचे प्रमाण वाढले. व्हायरस किंवा इतर कोणताही प्रादुर्भाव झाला नाही. फलधारणेच्या वेळी वरीलप्रमाणेच (पाचवी) फवारणी केली. त्यामुळे प्लॉट रोगमुक्त राहून फळधारणा चांगली झाली. पुढे माल पोसण्यासाठी थ्राईवर, क्रॉंपशाईनर, सोबत राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. २५० लि. पाणी याप्रमाणे सहावी फवारणी केली. तर फळांचे पोषण होऊन फळे टवटवीत मिळाली . पहिल्या तोड्याला २ टन निघाला. नंतर दर १५ दिवसाला थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोनच्या २ - ३ फवारण्या वरीलप्रमाणे केल्या. तर १० - १२ व्या दिवशीच्या तोड्याला ७ - ८ टन माल निघत होता. २० - २५ तोडे झाल्यानंतर पाने झडून गेली आणि मालही कमी झाल्यावर प्लॉट काढून टाकला.
दोन एकरातून १ लाख ६५ हजार रू.
नागपूर यवतमाळचे व्यापारी बागेत येउन ते स्वत: मालाची तोडणी करून रोख पैसे (काटा पेमेंट) देऊन नेत असत. जुलैमध्ये चालू झालेला माल जानेवारी २००९ पर्यंत चालला. जागेवर सुरुवातीला ६०० रू. क्विंटल भाव मिळाला. नंतर कमी होऊन ३०० रू. पर्यंत मिळाला. दोन एकरात १ लाख ६५ हजार रू. खर्च वजा जाता झाले. एकूण खर्च २४ हजार रू. आला होता. सुरूवातीला लागवडीनंतर ८ दिवसांनी १५ :१५:१५ ची एकरी एक बॅग दिली. नंतर २ महिन्यांनी डी. ए. पी. च्या २ आणि युरीयाची २ बॅग एकरी दिली. त्यानंतर फुलकळी लागल्यावर १०: २६:२६ च्या एकरी ३ बॅगा आणि फळे लागल्यावर पोटॅशच्या एकरी २ बॅगा याप्रमाणे खतांची मात्रा दिली.
जर्मिनेटर वापरून ९९% उगवण
आता चालू वर्षी २ एकर पपई करायची आहे. त्यासाठी बियाणे आणि औषधे घेण्यासाठी आज (११/१०/१०) आलो आहे. जर्मिनेटरच्या बीजप्रक्रियेमुळे वरील प्लॉटच्या वेळी (नोव्हेंबर २००७) ९९% उगवण मिळाली होती. २००६ साली आम्हाला जर्मिनेटरची माहिती नसल्याने प्रक्रिया न करता बी पिशवीत टोकले तर १० % च उगवण झाली होती.