रमजानमधील ७८६ पपईचे मार्केट मिळवून दिले डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने

श्री. भास्कर लक्ष्मण डुंबरे, मु. पानसरेवाडी (ओतूर), ता. जुन्नर, जि. पुणे


पपई ७८६ ची २५ डिसेंबर २००३ मध्ये ७' x ६' वर अर्धा एकरमध्ये लागवड केली होती. जमीन मध्यम प्रतीची आहे. रोपे आपल्या पद्धतीने दीड महिन्यात तयार झाली. थंडीचा त्रास झाला नाही. सप्तामृत, कल्पतरू वापरल्याने वाढ जोमाने झाली. फवारण्या माल लागल्यावर केल्या. तर बाग रोगमुक्त राहून पाने हिरवीगार रुंद मोठी असल्याने पोषण चांगले झाले. ९ महिन्यात विक्री चालू होऊन ३ - ४ महिने तोडे चालू होते. मे. उल्हास दत्तात्रय ठिकेकर, गाळा नं. ९६५ यांनी चांगल्या भावाने (६ ते १० रू. किलो) विकला. सरांनी सांगितले न्युट्राटोनने माल चांगला लवकर फुगतो. तर वरचा माल फुगण्यासाठी न्युट्राटोन वापरले. त्याचाही उत्तम रिझल्ट मिळाला.