जर्मिनेटर व सप्तामृत पपईसाठी संजीवनी

श्री. गुरूनाथ सुभाषराव बालकुदे, मु. पो. कौल खेड, ता. उदगीर, जि. लातूर.


आम्ही दरवर्षी पपई , टोमॅटो, कांदा, पत्ता कोबी, भेंडी इ. पिके घेतो. आम्ही प्रथमच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेटर टोमॅटोच्या बियांना भिजवून लावताना वापरले असता आमच्या बियाची ९०% उगवण झाली. याआधी औषध न वापरता ५० ते ६०% व्हायची. तसेच पपईचे बियाणे जर्मिनेटर च्या द्रावणात १२ तास भिजवून सुकवून लावले असता पपईचे बी ९०% उगवले. जेव्हा बी रोपासाठी टाकले तेव्हा लोक म्हणायचे की , ५०% च्या वर उगवण होणार नाही. ते खरेही आहे कारण आम्हालाही तसा अनुभव आला आहे. उगवणशक्तीसाठी जर्मिनेटर चा खर्च काढला तर औषध चार आण्याचे व फायदा हजाराचा असा आहे. एक औषध वापरून जर एवढा फायदा होतो, तर पुर्ण सप्तामृत वापरल्यास किती फायदा होईल ? म्हणून आज मी आपल्या 'कृषी विज्ञान' मासिकाची वार्षिक वर्गणी भरून वरील पिकांसाठी सप्तामृत औषधे घेतली आहेत.