डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची किमया न्यारी पपईत मधुरता ओतली भारी
श्री. रमेश पांडुरंग नाखले, (M.Sc.) कारंजालाड, जि. वाशिम.
फोन ०७२५६ -२२२४१४, मोबा. ९८२२४१४११४
वाशिम जिल्ह्यातील कारंजापासून ६ किमी वर आमची शेती आहे. शेत कारंजा - मुर्तिजापूर
रोडला जोडूनच आहे. ह्या शेतात आम्ही पाच एकरात पपई लावली होती. शेतात २.५ कि.मी. वरून
पाईपलाईन टाकून सिंचनाची सोय केली. सुरूवातीपासूनच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे सरांचे
मार्गदर्शनाखाली वापरली. १ एप्रिल २००८ ला लागवड झाली. जुलै महिन्यात फुलकळी लागली
व ऑक्टोबर २००८ मध्ये पपईची पहिली तोड झाली. त्यावेळेस पपईचा भाव ३.६० रू. प्रति किलो
होता. त्यानंतर मात्र भावामध्ये झपाट्याने घट झाली.
मार्केटींगचा अभिनव प्रयोग
पपईचा प्लॉट राज्य महामार्गाला लागून असल्यामुळे शेताचे बांधावर दुकान लावले. पहिल्या दिवशी ५०० रू. ची विक्री झाली. मात्र त्यानंतर प्रत्येक दिवसाला अगोदरच्या दिवसापेक्षा २५% वाढ होत गेली. ऐन हिवाळ्यात आमची विक्री दिवसाला ५,७०० रू. पर्यंत पोहोचली. रस्त्याने जाणारे पादचार्यापासून ट्रकपर्यंत सर्वच आमचे ग्राहक झाले. दुकानात खुर्च्या, टेबल, चाटमसाला, पिण्याचे पाणी याची व्यवस्था ठेवली. १० रू. प्रति किलो असा भाव ठेवला. पाच किलो पपई घेणार्यासाठी १ किलो बक्षीस ठेवले, परंतु भाव कमी केला नाही. बाहेरगावी माल नेणार्या ग्राहकांना सोईचे व्हावे म्हणून पॅकिंग बॉक्सची व्यवस्था ठेवली. याची परिणीती म्हणून आमची विक्री वाढतच गेली. तरीपण पाच एकराची पपई दुकानातून विकणे कठीणच. महणून मध्ये - मध्ये व्यापार्यास ट्रकने माल विकला. एकून विक्री ५,३०,००० रू. ची झाली. त्यापैकी २,८८,००० रू. ची विक्री दुकानातून झाली. महामार्गाने जाणारे टँकर जेव्हा प्लॅन्टवर भेटायचे तेव्हा ड्रायव्हर क्लिनर आमची नेलेली पपई एकमेकांना खाऊ घालायचे व हाच आमचा प्रचार असायचा. शेताजवळ एकाच वेळेस १० - १५ ट्रकची लाईन असायची. ज्यांनी पपई चाखली तेच आमचे प्रचारक झाले. ज्याला पपई आवडायची ते कारंजेकर ६ किमी अंतरावर येऊन पपई घेवून जायचे. ट्रकड्रायव्हर मंडळी एका वेळेस पाच - सात किलो पपई खायचे व परतीचे प्रवासात कुटुंबाकरीता १० - १५ किलो पपई न्यायचे. शेजारधर्म म्हणून त्यांनी शेजार्यांना पपई दिली, की पुढच्यावेळेस पपईची वाढीव मागणी यायची. पपई खाणारी पंजाबी मंडळी आमचे पपईवर जाम खुश असायचे. त्यांचे भागातील सर्वात महाग फळ त्यांना सर्वात स्वस्त मिळायचे. तुमची पपई आम्ही आतापर्यंत खाल्लेल्या पपईत मधुर व चवदार असल्याचे मत हे व्यक्त करायचे.
एकरी ६० हजार रू. नफा
मागील वर्षा विदर्भात पाऊस फारच कमी झाला. आमची सिंचन व्यवस्था ज्या तलावातून केली होती, तो फक्त २०% भरला. जिल्हाधिकाऱ्याने आदेश काढून सर्व पंपाचे कनेक्शन तोडले. पाच एकरचे पपईचे संक्रांत आली. एक महिना पपई पाण्यावाचून उभी होती. फळगळ व फुलगळ होऊ लागल्याने सप्तामृत फवारणी सरांच्या सल्ल्याने (थ्राईवर, क्रॉंपशाईनरचे प्रमाण ५ ते ६ मिली / लि. पाणी एवढे वाढवून घेऊन) केल्याने गळ थांबली. नंतर एका बोअरचे पाणी कोरड्या विहीरीत सोडणे व विहीरीत साचलेले पाणी झाडांना देणे. असा क्रम ठेवून पपई ऑगस्टपासून मार्चपर्यंत जगवली. बोअरमालक दररोज रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाणी द्यायचे. अशा तऱ्हेने विकत घेतलेल्या पाण्यावर पपईचे डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने बऱ्यापैकी उत्पन्न मिळाले. मला एकरी निव्वळ नफा ६०,००० रू. झाला. परंतु जर पाणी भरपूर असते तर फळाचे वजनामध्ये व चवीमध्ये आणखी फरक पडला असता.
परंतु अशाही संघर्षमय स्थितीत मला साथ मिळाली ती डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी. त्याबद्दल सरांचे मी आभार मानतो.