विदर्भाच्या अतिउष्ण हवामानात पपईचे यशस्वी उत्पादन
श्री. ओमप्रकाश सदाशिव महिंद्रे, मु. कळसा, ता. दिग्रज, जि. यवतमाल
फोन (०७२३४) २२३६५८, मो. ९६८९७२२४७९
६ - ७ वर्षापासून जर्मिनेटर पपईच्या उगवणीसाठी वापरत असतो. त्यामुळे उगवण चांगली मिळते.
चालूवर्षी ९७ % उगवण झाली. रोपे एप्रिल महिन्यात तयार करून, १६ मी २००९ रोजी ८' x ८'
वर लागवड केली. जमोन भारीकाळी आहे. सामू ७ असून पाण्याचा निचरा होणारी आहे. पाणी ठिबकने
देतो. ५००० झाडे ७ एकरमध्ये आहेत.
२॥ - ३ महिन्यात पपईस फुलकळी
सप्तामृताच्या १ - १ महिन्याच्या अंतराने २ फवारण्या केल्या. त्याने झाडांची वाढ जोमाने होऊन पाने हिरवीगार रुंद झाली. व्हायरसचा प्रादुर्भाव नव्हता. लागवडीनंतर २॥ - ३ महिन्यातच फुलकळी लागण्यास सुरुवात झाली. ४ - ५ महिन्यात फळे लागली. झाडावर जमिनीपासून १ ते १॥ फुटावरून फळे लागली आहेत. सध्या झाडांची उंची ६ ते ६॥ फुट असून झाडावर जवळपास २० -२५ किलो फळे तोडणीयोग्य झाली आहेत. तसेच लहान - लहान फळे वरच्या बाजूला लागतच आहेत. पहिल्या दोन फवारण्या सप्तामृताच्या ऑगस्ट २००९ पर्यंत झाल्यांनतर आता डिसेंबरपर्यंत औषधे संपल्याने फवारू शकलो नाही. त्यामुळे थोड्या प्रमाणात व्हायरस आला आहे. तसेच मध्यंतरी पाऊस जास्त झाल्याने पाने पिवळी पडली. आज (१७ /१२/ ०९) कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी पुणे येथे आलो असता पुढीला फवारण्यांसाठी सप्तामृत औषधे घेऊन जात आहे.
३ ते ५ रू. किलो भावाने एकरी १ ते १॥ लाख दिल्लीचे व्यापारी बागेतून माल खरेदी करतात
दरवर्षीच्या अनुभवानुसार एकरी १ ते १॥ लाख रू. पपईपासून या तंत्रज्ञानाने मिळतात. हे ३ ते ५ रू. किलो भाव असतान होतात. चालू वर्षी भाव ७ - ८ रू. किलो असल्याने याहून अधिक उत्पन्न मिळेल. दिल्लीचे व्यापारी बागेतून स्वत: माल तोडून नेतात. तोडणीची मजुरी, पॅकिंग, वाहतूक सर्व खर्च व्यापारी स्वत: करतात. आम्हाला एकरी एकूण सर्वसाधारण बियाण्यासह ३५ ते ४० हजार रू. खर्च येतो.
पपई १० -१२ वर्षापासून करतो. मात्र पहिले ३ - ४ वर्षे सर्वसाधारणचा उत्पन्न मिळत असे. २००३ साली पपईवर व्हायरस मोठ्या प्रमाणात आला होता. फळांवर रिंग स्पॉट आले होते. स्थानिक दुकानदार देईल ती औषधे फवारत होतो. मात्र काही फरक पडत नव्हता. तेव्हा आमचे काका माजी आमदार माधवराव पाटील यांच्या सल्ल्यानुसार सरांची भेट घेऊन सर्व प्रथम सप्तामृताच्या फवारण्या घेतल्या तर पुर्ण प्लॉट रोगमुक्त झाला. या अनुभवावरून आजही हे तंत्रज्ञान वापरात आहे. दरवर्षी अतिशय चांगला रिझल्ट मिळून हमखास उत्पादन मिळते.
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पपईची विदर्भात यशस्वी रोपवाटिका
आमच्या भागातील शेतकऱ्यांसाठी गेल्या वर्षीपासून ऑर्डर नुसार तैवान ७८६ पपईची रोपे तयार करून विकतो. गेल्यावर्षी २० हजार रोपे तयार केली. ट्रे मध्ये कोकोपीट टाकून जर्मिनेटर ची बीज - प्रक्रिया करून बी टोकातो, त्यामुळे उन्हाळ्यात ७ - ८ व्या दिवशी तर हिवाळ्यात १२ - १३ व्या दिवशी संपुर्ण उगवण झाल्याचे आढळते. रोपांवर सप्तामृताच्या २ ते ३ फवारण्या दर १० ते १२ दिवसांनी करतो. दीड महिन्यात रोपे विक्रीस येतात. १० रू/ रोप याप्रमाणे विक्री करतो.
चालूवर्षी १० हजार रोपांची ऑर्डर आली आहे. १० ते १२ गुंठ्यात ही रोपवाटिका आहे. एकूण २५ एकर क्षेत्र आहे. त्यामध्ये पपईबरोबरच कपाशी, मिरची, सोयाबीन ही पिकेही करतो. सर्व पिकांसाठी बीजप्रक्रियेस जर्मिनेटर नियमित वापरतो. त्यामुळे प्रतिकुल परिस्थितीतही उगवण उत्तम झाल्याने लागवड यशस्वी होते.