डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारणीने पपईवरील रोग आटोक्यात

श्री. राहुल संपत मोडक, मु. पो. वडकी, ता. हवेली, जि. पुणे.
मो. ९८२२३७४५२९


वडकी येथे आमची ८ एकर शेती असून त्यामध्ये ४ एकर सिताफळ बाग (१२' x १२' वर) आहे. टोमॅटो अर्धा एकर जूनमध्ये लावला आहे. बाजरी ८२०३ एक एकर आहे. कांदा पात अर्धा एकर करायची आहे. पपई १० जून २००९ रोजी ७' x ७' वर १ एकर लावली आहे.

आमचे वडील ५ - ६ वर्षापुर्वी टोमॅटोला डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरत होते. एकरी २० टन उत्पादन काढले आहे. हे उत्पादन साधारण असले तरी आमच्या भागात एक नंबरचे आहे. त्या अनुभवावरून मी चालू वर्षी पपई (७८६) एक एकर आपल्या तंत्रज्ञानाने केली आहे. ६५० रोपे मोहोळवरून आणून जूनमध्ये लागवड केली. लागवडीनंतर १ महिन्याने सप्तामृत औषधांची पहिली फवारणी केली. त्याने पपईच्या रोपांची वाढ जोमाने होऊन ४ महिन्यात प्लॉट डोक्याला लागत आहे. ३॥ - ४ महिन्यापर्यंत प्लॉट निरोगी होता. मात्र हवामानातील बदलामुळे आणि पहिली फवारणी केल्यानंतर २ - ३ महिने झाले तरी दुसरी फवारणी घेतली न गेल्याने व्हायरसचा प्रादुर्भाव (५% पर्यंत) जाणवू लागला. त्यानंतर ताबडतोब डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ऑफिसला येऊन तेथून सल्ला घेऊन सप्तामृत ५०० मिली घेऊन गेलो.

त्याची फवारणी मागील आठवड्यात १०० लि. पाण्यातून घेतली असता ४ - ५ दिवसात रोगाचे प्रमाण आटोक्यात आले आहे. पाने रुंद हिरवीगार, टवटवीत आहेत. फुलकळीतही वाढ होत आहे. लहान - लहान ४ - ५ फळे झाडावर लागली आहेत. फुलकळी ची गळ अजिबात होत नाही. आता पुढील फवारण्या वेळच्या वेळी घेणार आहे.

टोमॅटो अर्धा जूनमध्ये लावलेला आहे. सध्या माल चालू आहे. ३० - ३५ क्रेट माल तोड्याला निघाला. आत्तापर्यंत (११ सप्टेंबर) ८ - ९ टन माल निघाला असून प्लॉट निरोगी आहे. फुलकळी व माल चालू आहे. मार्केटयार्ड पुणे येथे जयभवानी यांच्या गाळ्यावर टोमॅटो विक्रीस आणतो. सध्या ५० रू. १० किलोस भाव मिळत आहे. सुरुवातीला ८० ते ११० रू. १० किलोस भाव मिळत होता.

या अनुभवावरून अर्धा एकर कांदापात डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने करत आहे.