आले (आद्रक) लागवड, उत्पादन, बेणे साठवण व प्रक्रिया

आल्याच्या उत्पादन निर्यातीविषयीचा जागतिक आढावा

आले उत्पादक शेतकऱ्यांच्या यशोगाथा

आले उत्पादक शेतकऱ्यांच्या यशोगाथा

'आले' न लागता आले

आल्याच्या रोगट बियाण्याची डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे उत्तम उगवण, प्लॉट निरोगी

रासायनिक खतापेक्षा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृत, हार्मोनी व कल्पतरूमुळे आल्याचा प्लॉट अनेक पटीने सरस शिवाय खर्च १५ हजार रू. कमी

पावसाने पिवळे पडून सडलेले आले निरोगी व अति उत्तम उत्पन्न !

१८ मे २००० रोजी वीस गुंठे क्षेत्रावर आले. पिकाची लागण केली होती. बेणेप्रक्रियेसाठी जर्मिनेटर एक लिटर + प्रोटेक्टंट २०० ग्रॅम + १०० लिटर पाणी या प्रमाणात मिश्रण तयार करून ...

Read more

श्री. आनंदराव माळी
मु.पो. अंबप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर. मोबा. ८८०६६२५९३०
(संदर्भ : 'कृषी विज्ञान' मासिक, मे २०१२, पान नं. ३७)

अॅड. देवीदास शंकरराव खिलारे
मु.पो. सोनवडी बु.||, ता. फलटण, जि. सातारा. मोबा. ९८२२७३०६३७
(संदर्भ : 'कृषी विज्ञान' मासिक, एप्रिल २००८, पान नं.२०)

श्री. केदा यु. सोनवणे (सेवानिवृत्त मुख्याध्यापक)
मु.पो. सटाणा, ता. सटाणा, जि. नाशिक. मोबा. ८८०५७७१९७१
(संदर्भ : 'कृषी विज्ञान' मासिक, मार्च २०१२, पान नं.११)

गावातील सडलेले आले रासायनिक औषधांच्या २३ फवारण्यानेही नादुरुस्त, आमचे मात्र सुधारलेले प्लॉट पाहून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ३ च फवारण्यात त्यांचेही आले बहरले

आले हाताच्या पंजाएवढे

सरांच्या तंत्रज्ञानाने आले लागवड

Coming Soon...

श्री. अतुल मधुकर शास्त्री
मु.पो. कसबे तडवळे, जि. उस्मानाबाद. मोबा. ९९२१५८०६९७
(संदर्भ : 'कृषी विज्ञान' मासिक, जानेवारी २००९, पान नं.३६)

श्री. दत्तात्रय बच्चू गाढवे (एम. ए.)
मु.पो. चखालेवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर.
(संदर्भ : 'कृषी विज्ञान' मासिक, मार्च २००७, पान नं. २६)

आले

आले हे त्याच नावाच्या लहान बहुवर्षायू ओषधीचे मूलक्षोड (जमिनीलगत आडवे वाढणारे मांसल खोड) आहे. हे मूलक्षोड ( आल्याचे गड्डे) शाखित असून हाताच्या पंजासारखे असतात. त्यांची बोटे जवळजवळ व एकमेकांना चिकटलेली असतात. ही वनस्पती सिटॅमिनी गणाच्या झिंजीबरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव झिंजीबर ऑफिसिनेल आहे. भारत, इंडोनेशिया, वेस्ट इंडीज, उत्तर व पश्चिम आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका या उष्णकटिबंधातील प्रदेशांत प्रामुख्याने आल्याची लागवड होते. भारतात विशेषत: दक्षिणेकडील भागात आल्याची लागवड केली जाते. दमट व उष्ण हवामानात आल्याची वाढ होत असल्यामुळे मे-जूनच्या दरम्यान आल्याची लागवड होते.

आल्याच्या मूलक्षोडाला असलेल्या डोळ्यांपासून जमिनीवर सु. ६० ते ९० सेंमी. उंच फांद्या येतात. त्यालाच खाली मुळ्या येतात. पाने साधी, लांबट, २० X १.८ सेंमी. आकाराची जिव्हिकाकार आणि रोमहीन असतात. फुले अनियमित, द्विलिंगी व पिवळट हिरवी असून मार्च-एप्रिलमध्ये कणिशावर येतात. फुलातील मोठी पाकळी जांभळट असून तिच्यावर पिवळट ठिपके असतात. फळे क्वचित येतात. लागवडीसाठी निरोगी, भरीव व कमीत कमी एक डोळा असलेले आल्याचे तुकडे बेणे म्हणून वापरतात. .

सुकविलेल्या आल्याला ‘सुंठ’ म्हणतात. सुंठ तयार करण्यासाठी आल्याच्या गडड्यांना चिकटलेली माती, मुळ्या व त्यांवरील साल काढून टाकतात. नंतर ते धुवून ७-८ दिवस वाळवितात. अशा प्रकारे सामान्य प्रतीची व भुरकट रंगाची सुंठ तयार करतात. चांगल्या प्रतीची सुंठ तयार करताना आले काही वेळ पाण्यात भिजत घालून त्यावरील साल काढून टाकतात. नंतर ती चुन्याच्या निवळीत भिजत ठेवतात. ८-१० दिवस हे आले वाळविल्यानंतर चांगल्या प्रतीची सुंठ तयार होते. उत्तम प्रतीची पांढरी व आकर्षक सुंठ बनविण्यासाठी गंधकाची धुरी देतात. .

आल्याचे रासायनिक घटक पुढीलप्रमाणे असतात: पाणी ८१ %, प्रथिने २.३० %, स्निग्ध पदार्थ १.०० %, कर्बोदके १२.२० %, तंतुमय पदार्थ २.३० % व राख १.२० %. जिंजेरॉल नावाच्या बाष्पनशील तेलामुळे आल्याला विशिष्ट चव असते. आले व सुंठ यांचा उपयोग औषधासाठी व मसाल्यासाठी फार प्राचीन काळापासून केला जात आहे. आले तिखट, उष्ण, उत्तेजक, वायुनाशक व पाचक असून पोटाच्या विकारांवर गुणकारी असते. आलेपाक आणि सुंठसाखर खोकला, पडसे, दमा, मळमळ, ओकारी इत्यादींवर गुणकारी समजतात. जिंजर बीर आणि जिंजर एल ही पेये बनविण्यासाठी आल्याचा उपयोग होतो.


Related Articles
more...

पुरस्कार