आल्याच्या उत्पादन निर्यातीविषयीचा जागतिक आढावा

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


दक्षिण आशियातील आले हे प्रमुख पीक आहे. जिंजीबेरेसिअी (Zingiberaceae) कुटुंबातील हे पीक आहे. आल्याचे संस्कृत नाव स्टींगवेरा (Sringavera) आहे. याचे शास्त्रीय नाव जिंजीबेर ऑफिसीनेल (Zingiber Officinale) असे आहे. हे जगातील सर्वात गरम मसाला पीक आहे.

स्वयंपाक आणि औषधामध्ये याचे महत्त्व जगभर अनन्यसाधारण आहे. विशेषकरून चीन, भारत आणि जपानमध्ये याचे औषधामध्ये अनन्य साधारणमहत्त्व आहे. भारतीय आयुवेर्दिक औषधात आल्याचा उपयोग विविध रोगामध्ये आलेल्य शारिरीक व अवयवांच्या सुजेवर प्रतिबंधात्मक व प्रभावीपणे केला जातो. आफ्रिका आणि कॅरेबियान देशामध्ये याचा प्रवेश १६ व्या शतकात झाला. महाभारतामध्ये जेवतान आल्याबरोबर मटन हळूवारपणे शिजवले गेले आहे, असा उल्लेख आहे. ११ व्या शतकातील मनसल्लासा या वादामायात आले हे टाकला स्वाद देणारे माद्यामा म्हणून उल्लेख आहे. ११ व्या शतकातील मनसल्लासा या वाडमयात आले हे ताकाला स्वाद देणारे माध्यम म्हणून उल्लेख आहे. १३ व्या शतकामध्ये ज्यावेळेस भारतावर मुस्लिमांनी राज्य केले त्यावेळेस आल्याचा वापर सढळ हस्ते केला गेला. अरब लोकांनी आल्याचा व्यापार नियंत्रण आणला. १३ व्या आणि १४ व्या शतकात आले हे महत्त्वाचे पीक गणले गेले.

आल्याची लागवड भारत, चीन, जपान. इंडोनेशिया, नायझेरिया, वेस्टइंडिया या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर होते. भारत हा मोठ्या प्रमाणात उत्पादन व आल्याचा वापर करणारा देश आहे. भारतात ओरिसा, केरळ, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, पशिचम बंगाल, सिक्कीम आणि मध्य प्रदेश या राज्यातून एकूण उत्पादनाच्या ३३ % उत्पादन होते. जागातिक बाजारपेठेत कोचिन जिंजर (NUGC) आणि कालिकत जिंजर (NUBK) या दोन भारतीय आल्याच्या जाती प्रसिद्ध आहेत. आले हे तेल. अर्क, कंद, ताजे आले या स्वरूपात असते. हलका रंग असलेल्या आल्याला लिंबासारखा सुगंध असल्याने पारंपारीक दृष्टीने त्याला मार्केटमध्ये जादा भाव मिळतो. जास्त गर्द रंग असलेले आले हे उष्ण असून तेल निर्माण करण्याकरीता याचा वापर केला जातो. ताजे आले हे आहारामध्ये वापरले जाते. एकून उत्पादनाच्या ३० % आल्याचे सुंठेत रूपांतर केले जाते. ५०% आले हे ताजे आले म्हणून वापरले जाते. तर २०% आले हे बेणे म्हणून वापरले जाते. सुंठ निर्मंत करणारे केरळ राज्य असून त्यातील अधिकतम भाग निर्यात केला जातो.

भारतातील आल्याचे क्षेत्र, हेक्टरी उत्पादन व एकूण उत्पादनाचा तक्ता (क्र. १)  
वर्ष   क्षेत्र (००० हेक्टर)   एकूण उत्पादन
(००० टन)  
एकूण उत्पादन
(किलो / हे.)  
१९९७ - ९८   ७५ .६   २५२.१   ३,३३५  
१९९८ - ९९   ७७.६   २६३.२   ३,३९२  
१९९९ - २०००   ८०.८   २८२.६   ३,४९८  
२००० -०१   ८६.२   २८८.०   ३,३४१  
२००१ -०२   ९०.८   ३१८.०   ३,५०२  
२००२-०३   ९०.८   ३१७.०   ३,५००  
२००३ - ०४   ८५.१   ३०१.९   ३,५४८  
२००४-०५   ९५.३   ३५९.०   ३,७६७  
२००५-०६   ११०.६   ३९१.०   ३,५३७  
२००६-०७   १०५.९   ३७०.०   ३,४९७  
जगात सर्वात जास्त क्षेत्र म्हणजे अंदाजे जगाज्या एकूण आले लागवडीच्या क्षेत्रापैकी ५५ % क्षेत्र हे एकट्या नायजरीयाचे आहे. जगाचे आल्याचे २००७ मधील एकूण उत्पादन १३,८७,४४५ मेट्रिक टन होते. भारताचे उत्पादन हे जगाच्या ३६% होते, तथापि अमेरिकेच्या तुलनेत ही उत्पादकता फार नगण्य आहे.

जागतिक व्यापार हा साधारण १९ कोटी डॉंलरचा आहे. यामध्ये भारताचा वाटा फक्त ६% आहे. चीनचा वाटा हा ५७% आहे. परंतु आल्याच्या तेल आणि अर्काच्या व्यापारात निर्यातीमध्ये भारताचा वाटा हा सरस असून तो ५० % आहे.

जगातील आल्याचे क्षेत्र व एकून उत्पादन (तक्ता क्र.२) 
वर्ष   क्षेत्र
(००० हेक्टर)  
उत्पादन
(मेट्रीक टन)  
१९९८  ३१२,१०८   ८६४,७६०  
१९९९   ३०८,६३१   ९५२,२२२  
२०००   ३०५,६९६   ९५३,१५२  
२००१   ३१०,९२३   ९८८,९५१  
२००२   ३१७,०९९   १,००७,५०३  
२००३   ३४१,३६०   १,१०९,८३३  
२००४   ३४१,८२९   १,१४१,३१९  
२००५   ३७२,२७१   १,२६४,८९१  
२००६   ४१४,१८३   १,३३७,१८८  
२००७   ४२९,४८१   १,३८७,४४५  जगभरातून आल्याची निर्यात (तक्ता क्र. ३)  
वर्षं   एकूण निर्यात
(टन)  
किंमत (०००)  
१९९७ -९८   १,७४,१८५   १४२,३१५  
१९९८ - ९९   १५५,९८५   १०७,७८९  
१९९९ -२०००   २०४,०५५   १२२,०८४  
२००० -०१   २४३,१७३   १३१,६३२  
२००२ -०३   २९०,९९२   १२५,९२२  
२००३ -०४   ३११,४०५   १३५,६०३  
२००४ - २००५   २९१,४८४   २७७,६१९  
२००५ -०६   ३७९,६३०   ३१९,४८७  
२००६ -०७   ३८५,४०६   २५३,०९१  


प्रक्रिया केलेले आणि न प्रक्रिया केलेले (Bleached/ Unbleached), स्वच्छ आणि अस्वच्छ (Garabled / Ungarbled) तसेच तुकडा झालेले अशा आल्याचा जागतिक मार्केटमध्ये ५०% वाटा आहे. कोचिंग आले हे जगप्रसिद्ध आहे. जागतिक मार्केटमध्ये आल्याचि भरतातून ३ लाख टन निर्यात केली जाते.

भारतातील आल्याची एकूण निर्यातीची आकडेवारी (तक्ता क्र. ४)  
वर्ष   एकूण निर्यात
(टन)  
किंमत
(लाख रू.)  
१९९७ - १८   २८,२६८   ७,२६२.७३ 
१९९८ -९९   ८,६८३   ४,०५८.3२  
१९९९ - २०००   ८,९२३   ३,२५३.५५  
२००० - ०१   ६,२८८   २,६८२.०५  
२००१ -०२   ६,४६४   २,३११.४७  
२००२ - ०३   ८,४६१   २,३११.४७  
२००३ -०४   ५,०००   २,३४०.५०  
२००४ -०५   १४,९०८.१३   ५,९२९.४०  
२००५ -०६   १०,८९०.४३   ४,५८०.५९  
२००६ - ०७   ९,६६१.३४   ४,७७७.७७  
२००७ - ०८   ८,३३२.९१   ३,२९६.०८  
२००८ - ०९   ३,२२९.७०   १,५८१.७५  
आल्याची उत्पादन वाढीसाठी घ्यावयाची दक्षता

१) अधिक उत्पादन देणाऱ्या जातींचे निवड करणे.

२) लागवडीचे बेण्याचा वेळेत पुरवठा करणे.

३) उत्पन्नातील घट कमी करणे.

४) हळव्या जातींची निर्मिती करणे.

५) ताज्या आल्यावरील प्रक्रिया उद्योग वाढविणे.

६) सेंद्रिय आल्याची लागवड वाढविणे.

७) आल्यातिल उत्पादन व दर्जाच्या दृष्टीने शेती संशोधन वाढविणे.

भारताला निर्यातीमध्ये चीन, नायझेरिया व करणार्‍या १५ राष्ट्रांबरोबर भारताची निर्यात खालील थायलंडबरोबर स्पर्धा करावी लागते. जागतिक आयात टेबलमध्ये दाखविली आहे.

एकूण   निर्यात (टन) एकूण किंमत (लाख रू.)
२००७ - ०८ २००८ -०९ (एप्रिल - जून) २००७ -०८ २००८ -०९ (एप्रिल - जून)
अमेरिका   ५८८.७६   १०१.७५   ४१९.०२   ६३.६१  
बांगलादेश   ४२५४.०७   १३४६.६२   ४०८.९३   १३७.२४  
युके   ४५९.६०   १३६.०६   ३५४.७६   १२२.८७  
स्पेन   ३०५.२३   १०६.१०  २१०.२०   ११५.४३  
मोरोको   २६९.७९   ६९.००   १९४.८२   ६६.५३  
सौदी अरब   २३४.६५   ९५.८६   १८४.७९   ६०.३९  
जर्मनी   २८२.५७   १९८.५१   १७८.६९   ६६.४५  
ऑस्ट्रेलिया   १९६.२८   २०.७७   १५५.१७   १८.६२  
नेदरलेंद   २०५.५४   ६०.६४   १३९.१७   ४५.९६  
येमेन रिपब्लिक   १८०.४६   ३८.००   १२३.३७   ३६.१९  
जपान   १९७.६९   ९०.०८   १२१.२४   ११६.३२  
मलेशिया   १४४.९४   ४७.४०   ८१.७८   २४.७७  
कॅनडा   ११८.९१   २५.५९   ७९.५८   १६.४३  
बेल्झियम   ७१.६२   २.३८   ७१.८७   २.६९  
इस्त्राइल   ९२.११   ७.००   ७०.०६   ६.६१