रोगट पिवळा कपाशीचा प्लॉट डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दुरुस्त, १९ क्विंटल कापूस फरदडचीही वाढ समाधानकारक
श्री. ज्ञानेश्वर गणेशराव पाचगरे, मु. पो. यावली शहीद, ता. जि. अमरावती.
मोबा.
९६३७३८५३०१
पावणेदोन एकरमध्ये अजित, बन्नी, पारस, ब्रह्मा कपाशी १८ जून २०१२ मध्ये लावली होती, पण अतिपाऊस
असल्यामुळे आणि जमीन चोपण असल्यामुळे जमिनीमध्ये पाणी साचून राहिले. त्यामुळे कपाशी पिवळी पडली. सुरुवातीला रासायनिक
स्प्रे सिलीकॉन + मोनोक्रोटोफॉसची फवारणी घेतली. तसेच मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती
पाहुण्यांकडून मिळाली. नंतर मी अमरावतीमध्ये सोनाली ट्रेडर्स ( लढ्ढाजी) यांच्याकडे
जावून माहिती घेतली व त्यानुसार पुणे ऑफिसला फोन करून सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर
लगेच अमरावती येथून जर्मिनेटर, प्रिझम, कॉटन थ्राईवर घेऊन त्यांचा स्प्रे घेतला. त्यामुळे
प्लॉटचा पिवळेपणा कमी झाला. नंतर दुसरा स्प्रे १५ दिवसाच्या अंतराने घेतला. त्यावेळी
कपाशी पुर्णपणे जागेवरती आली. त्यामुळे मला कपाशचे १९ क्विंटल उत्पादन मिळाले. तसेच
फरदड काहीही खत न टाकता जर्मिनेटर, थ्राईवर, प्रिझम आणि मोनोक्रोटोफॉस मारले. त्यामुळे
फरदड अतिशय चांगल्या प्रकारे फुटली आहे. पाते जस्त प्रमाणात आहेत. बोंडे ३० ते ४०%
सेट झाली आहेत. तर त्यांच्या फुगावणीसाठी राईपनर, न्युट्राटोन, कॉटन थ्राईवर फवारणीसाठी नेत
आहे.