सांगीन चार गोष्टी युक्तीच्या - पिवळा पडून फुलगळ झालेला शेवग्याचा प्लॉट डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सुधारून १ महिन्यात ६० हजार

श्री. दत्तुराव शेषराव घुले,
मु. पो. करडगाव, ता. घनसावंगी, जि. जालना.
मोबा. ९६५७९८३२१३



मी भारी काळ्या जमिनीमध्ये ८ x ८ फुटावर एकूण ६०० शेवगा लावला आहे. याची लागवड ४ जुलै २०१२ ला केली. यामध्ये ४०० झाडे अमर सिडसचा कोईमतूर वाण आहे. तर २०० झाडे सिद्धीविनायक शेवग्याची आहेत. या दोन्ही शेवग्याला फुले सारखयाच प्रमाणात लागली होती. पण ती सर्व काळी पडून जळत होती. त्यामुळे तिचे फलधारणेत रूपांतर घेण्यापुर्वीच गळून जात होती.

ही गळ थांबविण्यासाठी बाजारातील अनेक प्रकारची औषधे वापरली, तरीही काहीच फरक पडला नाही. यावेळी माझ्या मित्राने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी श्री. भगवान जैवळ यांची भेट घडविली. शेवला लागवड करताना दुकानदाराने सिद्धीविनायक शेवग्याचे बी दिले होते. त्यावेळी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी विषयी माहिती नव्हती. मात्र जैवळ यांची भेट झाल्यावर डॉ.बावसकर तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती मिळाली त्यांच्या सल्ल्यानुसार थ्राईवर, क्रॉंपशाईनर,राईपनर, प्रोटेक्टंट प्रत्येकी ५०० मिलीची १५० लि. पाण्यातून फवारणी ८- ८ दिवसांनी २ वेळा केली. तसेच जर्मिनेटर एकरी १ लि. २०० लि. पाण्यातून ठिबकमधून सोडले. तर सर्व झाडांचा पाला पिवळा पडलेला असताना जी झाडे निस्तेज होती ती झाडे १५ दिवसात सतेज हिरवीगार झाली, तसेच फुलगळ पुर्णता थांबून लहान - लहान शेंगा वाढीस लागलेल्या दिसल्या

तोडे सुरू होऊन १ महिना झाला. दररोज १ क्विंटल शेंगा काढून जवळच्या गावात दुचाकी गाडीवरून नेऊन विक्री करतो. २० रू. पासून ४० रू. किलो भाव मिळाला. आतापर्यंत ६० हजार रू. च्या शेंगा विकल्या आहेत. अजून फुलकळी व शेंगा भरपूर लागलेल्या आहेत.