चारापीक - चवळी

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


चवळी हे द्विदल वर्गातील पीक हिरव्या चाऱ्यासाठी उत्तम आहे. या पिकापासून मिळणारा पालेदार भाग पौष्टिक दृष्ट्या अतिशय उपयुक्त असतो. हा हिरवागार पाला भरपूर प्रमाणात उपलब्ध होतो. प्रथिने आणि पिष्टमय पदार्थाचे प्रमाण चवळीच्या पाऱ्यात इतर चार पिकांपेक्षा अधिक असते. कमीत कमी म्हणजे ५५ ते ६० दिवसांत तयार होऊन हिरव्या चाऱ्याचे हेक्टरी ३० टनांपर्यंत उत्पादन देणारे हे एक जनावरांच्या आवडीचे चार पीक आहे.

चवळी द्विदल वर्गातील असल्यामुळे तिच्या पिकापासून फक्त उत्तम चाराव मिळतो असे नाही. तर या पिकाच्या मुळांवर 'रायझो -बियम' जीवाणू गाठीच्या स्वरूपात नत्र साठवितात. ही नत्रस्थिरीकरणांचे प्रमाण हेक्टरी ५० किलोपर्यंत होते. त्यामुळे जमिनीची सुपीकताही वाढते. अशाप्रकारे हे दुहेरी फायद्याचे पीक आहे. वाळलेला चारा आणि सिलेज (Silage) यामध्येही याचा वापर केलेला आढळतो.

जमीन व हवामान : चवळीला चांगल्या प्रकारे निचरा होणारी जमीन अधिक सोयीस्कर असते. मध्यम प्रतीची जमीनही या पिकास लाभदायक ठरते. पिकाच्या योग्य आणि चांगल्या वाढीसाठी सुपीक जमीन सर्वोत्तम अशी असते.

चवळीला उबदार आणि दमट हवामान लागते. ५ ते ६.५ पी.एच (सामू) असलेल्या Tropical आणि Subtropical हवामानाच्या पट्ट्यात हे पीक चांगले येते.

पूर्वमशागत : एक नांगराची खोल पाळी आणि दोन कुळवाच्या पाळ्या पूर्व - मशागतीसाठी द्याव्यात आणि उपलब्धतेनुसार सेंद्रिय खतांच्या मात्रा शिफारशीप्रमाणे पूर्वमशागतीच्या वेळी देणे सोयीस्कर असते.

बियाणे आणि पेरणी : चवळीचे बी निवडताना ते इतर मिश्रणविरहित वजनदार, न फुटलेले स्वच्छ आणि रोगविरहित निवडावे. बियाण्यास जर्मिनेटर ची प्रक्रिया करावी.

बिजप्रक्रिया : १० किलो बियास १० लि. पाण्यात २५० मिली जर्मिनेटर घेऊन त्या द्रावणात बियाणे अर्धातास भिजवून नंतर सावलीत सुकवून पेरावे. म्हणजे उगवण लवकर होऊन मुळांवर नत्राच्या गाठींच्या प्रमाणात प्रचंड वाढ होते. त्यामुळे जैविक नत्र पिकास मिळून रासायनिक खतात बचत, खर्च, दुष्परिणामापासून मुक्तता होऊन पहिल्या खताच्या मात्रेत (Basal Dose) १०० % बचत होते.

हिरव्या चाऱ्याचे पीक म्हणून चवळी ही बहुधा उन्हाळी आणि खरीप हंगामात घेतली जाते. फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यात उन्हाळी चवळी घ्यावी. तर जून ते ऑगस्ट या महिन्यात खरीप चवळी घ्यावी. ५० किलो बी प्रति हेक्टरी २५ सें.मी. च्या अंतराने पाभरीने पेरावे.

खतांची मात्रा : ३ ते ५ टन चांगले कुजलेले शेणखत या चारा पिकास सुरुवातीला पुरेसे होते. नत्र खतांच्या बाबतीत मात्र ते कमीच द्यावे. ५ किलोग्रॅम नत्र, ९० किलोग्रॅम स्फुरद आणि ३० किलोग्रॅम पालाश पेरणीपूर्वी प्रतिहेक्टरी द्यावे. यासाठी रासायनिक खतांपेक्ष कल्पतरू ह्या सेंद्रिय खताची मात्रा हेक्टरी २५० ते ३०० किलो द्यावी. या खतामुळे जमीन भुसभुशीत राहून ओलावा टिकवून धरला जातो. जमिनीची सुपिकता वाढून जमिनीची प्रत व पोत सुधारतो.

पेरणीनंतरची काळजी: आंतरमशागत म्हणून पेरणीनंतर घ्यावयाची काळजी पेरणीनंतर लवकरात लवकर एक खुरपणी करावी आणि चवळीच्या नवीन वेलीच्या स्वरूपात फुटणाऱ्या फुटव्यांना मोकळीक करून द्यावी. माती मुळांवर सारून द्यावी. म्हणजे त्याचा मुळांना आधार मिळण्यास चांगला फायदा होतो.

पाणी पुरवठा : उन्हाळी चवळी ला ७ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे आणि १० ते १२ दिवसाच्या अंतराने खरीप चवळीला पाणी द्यावे. काही वेळा जर अधिक पाण्याचा ताण पडला तर आणखी एखादी मध्ये पाण्याची पाळी द्यावी.

* मिश्रपिके : चवळी हे द्विदल चारापीक प्रामुख्याने मका आई ज्वारी या एकदल पिकांमध्ये 'मिश्रपीक' म्हणून घेतले जाते.

चवळी पिकाची रोग - कीड मुक्त जोमदार वाढ व फुटवे फुटून उत्तम प्रतीचा पौष्टिक चारा मिळण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.

१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली. + थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + न्युट्राटोन २५० मिली + राईपनर २५० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ४५ ते ५५ दिवसांनी) : थ्राईवर ७५० मिली.+ क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ५०० मिली + प्रिझम ५०० मिली. + न्युट्राटोन ५०० मिली + २०० लि.पाणी.

* कापणी : चवळीची पहिली कापणी पेरणीपासून ६० ते ६५ दिवसांनी केली जाते. फुलकळ्या दिसू लागताच चवळीचे पीक हिरव्या चाऱ्यासाठी म्हणून उत्तम ठरते. यापेक्षा जर उशिरा कापणी केली तर हिरवी पाने रोगट व्हायला लागतात आणि उत्पन्नावर त्याचा पुढे अनिष्ट परिणाम झाल्यावाचून राहत नाही. चवळीची दुसरी कापणी हंगामातील कालावधीवर अवलंबून असते.

पहिली कापणी झाल्यानंतर १० -१५ दिवसांच्या अंतराने पुन्हा वरीलप्रमाणे ३ फवारण्या घ्याव्यात. म्हणजे फुटवे जादा फुटून पाला हिरवागार, पौष्टिक तयार होऊन दुसऱ्या कापणीचेही उत्पादनात हमखास वाढ होते.

सुधारित वाण : चवलीचे पूर्वप्रसारित सुधारित वाण अलीकडच्या काळात सर्वत्र घेतले जातात. त्यापैकी को - १, ई.सी. ४२१६, एच.एफ.सी. ४२ -१, फॉस -१, सी १५२, नं. ९९८ इ. अनेक जाती चवळीसाठी प्रचलित आहेत.

'रशियन जायंट' ही चवळीची चाऱ्यासाठी अधिकात अधिक उत्पादन देणारी जात आहे. सी. ४२ -१६ को -१, फॉस -१ आणि एच.एफ.सी. ४२- १ हे त्या खालोखाल उत्पादन देणारे वाण आहेत. सरासरी हेक्टरी उत्पादन २० ते २५ टन असे मिळते.

उत्पादन : चवळीच्या जातीपरत्वे त्यांचे उत्पन्न सर्वसाधारणपणे हिरव्या चाऱ्यासाठी ३० ते ३५ टन प्रतिहेक्टरी असे पहावयास मिळते.