५० 'सिद्धीविनायक' शेवग्यापासून वर्षाला ४० हजार !
श्री. विनोद रमेश आटोळे,
मु. पो. कळस, ता. इंदापूर, जि. पुणे,
मोबा. ९६७३२७०८०१
२ वर्षापुर्वी 'सिद्धीविनायक' शेवग्याचे १ पाकिट बी नेले होते. जुलैमध्ये त्याची बांधाने
१०' अंतरावर लागवड केली होती. रोपे लागवडीच्यावेळी जर्मिनेटरचे ड्रेंचिंग केले होते.
ही झाडे बांधावर असल्याने त्यावर कोणतीही औषधे किंवा खते वापरली नाही. येईल तेवढे
उत्पादन घेत आहे. तर हा शेवगा साधारण ७ महिन्यात चालू झाला. सुरुवातीला लहान झाडे असताना
पहिल्या बहारापासून ४ महिन्यामध्ये २० ते २५ किलोपर्यंत शेंगा मिळाल्या. शेंगा २ फूट
लांबीची एकसारखी, हिरवीगार आहे.
शेंगा बारामती मार्केटला आठवड्यातून २ - ३ वेळा माल तयार होईल त्याप्रमाणे नेतो. तेथे सुरुवातीला ८० रू./किलो भाव मिळाला. नंतर गावरान शेवगा चालू झाल्यामुळे ३० - ४० रू. भाव मिळत आहे. आतापर्यंत २ बहार झाले. यातील काही झाडे बैल मशागतीच्यावेळी मोडली, तरी सध्या ५० झाडे आहेत. या ५० झाडांपासून वर्षाला ४० हजार रू. ची शेंग विकतो. याला इतर काहीच खर्च केलेला नाही.
ग्लॅडीएटर गुलाबाची नर्सरी
आमची ग्लॅडीएटर गुलाबाची नर्सरी आहे. वर्षाला साधारण २ लाख रोपे तयार करतो. जंगली काडीची अर्धा एकर लागवड आहे. त्याच्या काड्या कटिंग करून रोपे तयार करतो. ६ महिन्यात रोप तयार होते. रोपे ३ ते ५ रू. ला जातात. रोपांची पिशवी लहान (मायक्रो बॅग) २.७५'' x ३.७५'' असते. याची काडी लागवडीच्या वेळी १० लि. पाण्यामध्ये १०० मिली जर्मिनेटरचे द्रावण तयार करून ५ ते १० मिनिटे बुडवून लावतो. जर्मिनेटरमुळे २०% जर्मिनेशनमध्ये वाढ होऊन फुटवे. लवकर फुटतात. जारवा वाढतो, त्यामुळे वाढ लवकर होते. जर्मिनेटरचा दुसरा फायदा असा की, मजुरांकडून याचे प्रमाण जरी कमी - अधिक झाले तरी त्याचा दुष्परिणाम काहीच होत नाही. चुकून जर्मिनेटरचे प्रमाण वाढले तरी डोळे लवकर फुटतात. मात्र रासायनिक औषधांचे प्रमाण वाढल्यास फुटणारे डोळे जळतात. त्यामुळे निश्चिंतपणे जर्मिनेटरचाच वापर करतो.
जर्मिनेटरच्या अनुभवातूनच हा 'सिद्धीविनायक' शेवगा जंगली गुलाब बागेच्या बांधाने लावलेला आहे आणि आता या 'सिद्धीविनायक' शेवग्याच्या अनुभवातून भगवा डाळींबासाठी डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरायचे आहे. शेवगा व गुलाबाच्या अनुभवातून डाळींबासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी
डाळींब ३०० झाडे १५ डिसेंबर २०१२ ला १४' x १०' वर लावली आहेत. याला आतापर्यंत विशेष काहीच वापरले नाही. जमीन मध्यम तांबडी आहे. झाडांची उंची ५ - ६ फूट असून खालून ४ - ४ फुटवे धरले आहेत. याची १५ एप्रिलला छाटणी करून बहर धरायचा आहे. त्यासाठी सरांचे मार्गदर्शन घेण्यास आलो आहे.
सरांनी सांगितले, "बागेचा ताण पूर्ण झाल्यावर १५ एप्रिलला छाटणी केल्यानंतर २ - २ किलो कल्पतरू सेंद्रिय खत प्रत्येक झाडाला देऊन पाणी सोडल्यावर जर्मिनेटर १ लि. आणि प्रिझम १ लि. चे १०० लि. पाण्यातून १ एकरसाठी ड्रेंचिंग करा. तासाला १४ लि. डिस्चार्च आहे. तर २ तास दिवसाड ड्रीप चालवा. पुढे हळूहळू डिस्चार्च वाढविणे. नंतर पहिली फवारणी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम प्रत्येकी १ लि. आणि प्रोटेक्टंट १ किलोची २०० लि. पाण्यातून करणे. पुढे डाळींब पुस्तकाप्रमाणे सर्व गोष्टी करणे. तसेच हवामानातील बदल जाणवल्यास आपल्या जवळच्या 'कृषीविज्ञान' केंद्राशी संपर्कात राहून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार योग्य प्रमाणात तंत्रज्ञान वापरणे.
याकरिता आज (४ मार्च २०१४) सुरूवातीच्या ३ फवारणीची औषधे घेऊन जात आहे.